Off Page SEO म्हणजे काय व तो कसा करावावेबसाईट व ब्लॉगसाठी SEO कसा करावा

SEO Meaning In Marathi (एस. ई. ओ.) | (Off Page SEO) म्हणजे काय?

SEO Meaning In Marathi म्हणजे काय व तो कसा करावा तर तुमची वेबसाइट तुम्हाला कोणत्याही सर्च एंजिने मध्ये सर्वात वरच्या Result मध्ये आणायची असेल तर त्यासाठी SEO {search engine optimisation } करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु SEO हा अत्यंत मोठा असा प्रकार आहे आणि SEO मध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो आणि त्यामधील एक पद्धत म्हणजे Off Page SEO हि होय.

म्हणजे नक्की किती पद्धती आहेत? परंतु येणाऱ्या ब्लॉग मध्ये याची माहिती आपण घेणार आहोत. आत्ता ऑफ पेज सीईओ म्हणजे नक्की काय? याची सविस्तर माहिती आपण या ब्लॉग मध्ये घेऊयात. 

Off Page SEO म्हणजे काय हे लक्षात आले तर त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे रँकिंग वाढवू शकता.

या ब्लॉग मध्ये Off Page SEO म्हणजे काय? आणि त्याचा उपयोग नक्की कशासाठी पडतो हे आपण पाहणार आहोत.

ऑफ पेज एसईओ म्हणजे काय?

ऑफ पेज एसईओ चा सर्वात महत्वाचा असा उपयोग म्हणजे तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉग चे रँकिंग उत्तम प्रकारे होऊन ती पहिल्या काही result मध्ये दिसते.

परंतु बऱ्याच लोकांना असे वाटत असते कि बॅकलिंकींग केली कि ऑफ पेज एसईओ झाला पण प्रत्यक्षात तसे नसते.

बॅकलिंकींग हा ऑफ पेज एसईओ चा एक प्रकार आहे. परंतु फक्त बॅकलिंकींग करणे म्हणजे ऑफ पेज एसईओ करणे असे नव्हे
त्याच सोबत ऑफ पेज एसईओ मध्ये तुमच्या वेबसाइट ची गुणवत्ता ,ऑथॉरिटी ,आणि लोकप्रियता देखील विचारामध्ये घेतली जाते.

१. तुमचा सोशल मीडीया चा वापर किती योग्य पद्धतीने होतोय
२. वेबसाईट वरील लिखाणाची गुणवत्ता किती उत्तम आहे.
३. तुम्ही फक्त ब्रँड प्रोमोशन करताय कि खरंच लोकांच्या गरजा देखील विचारात घेताय.

या गोष्टींचा बॅकेन्ड मध्ये कुठे ना कुठे गूगल विचार करतच असतो. त्यामुळे या गोष्टी तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे कराल तितकीच तुमची वेबसाइट अधिक विश्वासार्ह आणि अधिकृत दिसण्यात गूगल मदत करू शकते

ऑफ पेज सीइओ हा ऑन पेज सीइओ पेक्षा वेगळा का ठरतो
कोणत्याही वेबसाइटचा सीईओ करताना या दोनीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या ठरतात. परंतु दोघांमध्ये फरक आहे आणि तो कोणता ते आपण बघुयात

ऑन पेज सीइओ म्हणजे तुम्ही वेबसाइट वरती ज्या काही गोष्टी करता त्याला ऑन पेज सीइओ असे म्हंटले जाते. त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
१. वेबसाइट मध्ये इमेजेस टाकणे
२. इंटर्नल लिंकिंग करणे
३. कीवर्ड चा उपयोग करणे
४. कन्टेन्ट ची readability चेक करणे

तुमच्या हे लक्षात आलेच असेल कि ऑन पेज एसईओ चे काम डिरेक्टली वेबसाइट वरती होत असते, त्यामुळे तुम्ही कधीहि कोणतेही चेंजेस केले तर डिरेक्टली ते वेबसाइट वरती होत असतात.

आणि ते तुम्ही कधीही करू शकता. परंतु ऑफ पेज सीइओ चे तसे नसते तुम्हाला जर आर्टिकल सबमिशन करायचे असेल तर ज्या वेबसाइट वरती तुम्हाला करायची आहे त्याचे approval तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकत नाही.

ऑफ पेज एसईओ का महत्वाचा आहे-

ऑफ-पेज एसइओ महत्वाचे आहे कारण ते सर्च इंजिन च्या निकालामध्ये मध्ये तुमची साइट किती चांगली आहे हे यावरून समजू शकते. Google चे अल्गोरिदम संबंधित शोधकर्त्यांना वेबसाइट कसे प्रदर्शित करायचे हे ठरवताना बॅकलिंक्स आणि इतर ऑफ-साइट सिग्नल विचारात घेते. या सिग्नलमध्ये हे समाविष्ट आहे:
१. Anchor text
२. सोशल सिग्नल
३. ब्रँड मेंशन
४. रेफरिंग डोमेन ऑथॉरिटी
या सगळ्या ऑफ पेज सीईओ च्या आक्टिविटी आहेत आणि हे ऑफ-साइट सिग्नल गूगल बॅकेन्ड मध्ये विचारात घेत असतो. आणि त्याचा परिणाम तुमच्या रँकिंग वरती होत असतो.
यामुळे तुमच्या वेबसाइट अथवा ब्लॉग वरती ट्रॅफिक येऊ शकते परिणामी तुमच्या वेबसाइट चे conversion आणि एंगेजमेंट दर वाढू शकतात. हे तुम्हाला ब्रँड अवेरनेस निर्माण करण्यात आणि नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात देखील मदत करू शकते.

७ महत्वाच्या टिप्स ऑफ पेज एसईओ साठी | SEO Meaning In Marathi –

ऑफ-पेज एसइओ म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे हे आता तुम्हाला समजले असेलच ,परंतु ते नक्की उपयोगात कसे आणायचे हे एक्सप्लोर करण्याची वेळ आली आहे. खाली सात टिप्स या सर्वोत्तम पद्धती आहेतज्यामुळे तुम्ही उत्तम ऑफ पेज सीइओ करू शकता.

१. उच्च-अधिकृत साइट्सवरून हाय quality बॅकलिंक्स मिळवा

लिंक बिल्डिंग हे ऑफ-पेज एसइओचे हृदय आहे. तुमच्या साइटशी लिंक करणाऱ्या अनेक उत्तम वेबसाइट्स असल्यास. गूगल ला असा संदेश मिळतो कि हि वेबसाइट दर्जेदार सामग्री देत आहे ज्याचा लोकांना आनंद होतो.

बॅकलिंक्स हे मुखतः आत्मविश्वासाचे मत आहे. तुम्हाला लिंक्ससाठी तुमच्या साइटचा ऑथोरिटी स्कोअर तपासायचा असल्यास, तुम्ही SEMrush चे बॅकलिंक अॅनालिटिक्स सारखे साधन वापरू शकता:

अर्थात, उच्च-अधिकृत साइटवरून लिंक मिळवणे हे पूर्ण करण्यापेक्षा सोपे आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे मौल्यवान, दर्जेदार सामग्री तयार आणि प्रकाशित करता तेव्हा ते मिळवण्याची शक्यता वाढते.

तुम्ही असे केल्यास, प्रकाशक आणि ब्रँड तुमच्या सामग्रीचा ऑर्गेनिकरित्या उल्लेख करू शकतात आणि लिंक करू शकतात.

तथापि, तुम्ही तृतीय-पक्ष साइट्सपर्यंत जाऊन लिंक बिल्डिंगची विनंती करून, लिंक बिल्डिंगसाठी अधिक सक्रिय दृष्टीकोन देखील घेऊ शकता.

उदाहरणार्थ, तुम्‍ही प्रभावकांना तुमच्‍या सामग्रीचा प्रचार करण्‍यासाठी आणि लिंक करण्‍यासाठी भागीदारी करू शकता. हा प्रभावशाली विपणनाचा एक प्रकार आहे,.

2. अद्वितीय कन्टेन्ट तयार करा –

तुम्ही जितके अद्वितीय कन्टेन्ट तयार कराल तितके लोक तुमच्या कन्टेन्टला उत्तम प्रतिसात देऊ शकतात,जे कन्टेन्ट टाकलं ते लोकांना उपयोगाचे ठरेल असे असावे,लोकांना एंगेज करणारे असावे,

यामुळे नैसर्गिकरित्या लिंक अधिकार तयार करण्यात मदत करू शकते. या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही तुमचे कन्टेन्ट अधिक चांगले बनवू शकता. 

१. Infographics
२. Case studies
३. White papers
४. eBooks
जर तुम्ही चांगल्या quality चे आणि आणि महत्वपूर्ण कन्टेन्ट तयार केले असेल तर लोक स्वाभाविकपणे ती लिंक आणि शेअर करू इच्छितात.आणि जितके मोठे तुमचे कन्टेन्ट असेल तितका चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळू शकतो.

3. गूगल माय बिसनेस वरती अकाउंट तयार करा

ही गुगल कडून आपल्याला मिळणारी मोफत सुविधा आहे ,अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागत नाहीत. अकाउंट तयार करून तिथे तुमचे प्रोफाइल योग्य पद्धतीने optimize करा यामुळे तुमचे organic search रँकिंग वाढायला मदत होईल. 

एकदा का तुम्ही अकाउंट सुरु केले तर तिथे तुम्ही वेबसाइट ची लिंक ऍड करू शकता  Business चे फोटो टाकू शकता, तिथून तुम्ही लोकांचे रिव्हिएव generate करू शकता.

ग्राहक तुम्हाला तिथून रेटिंग देऊ शकतात.आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला तुमच्या ऑफ पेज एसईओ साठी होतो.

4. ग्राहकांना Review देण्यासाठी प्रोस्थाहन द्या –

तुमच्या आनंदी कस्टमर्स चे Reviews जितके जास्त असतील तितके नवीन लोकांना तुमच्या सर्विस बद्दल विश्वास जास्त बसतो. या reviews मुळे तुमचे ऑफ पेज एसईओ चांगले होण्यास मदत होते.

reviews off page seo off page seo
Reviews off page SEO Off page SEO, Image – Googlehttp://business.google.com

यासाठी तुमच्या ग्राहकांना Trust pilot ,yelp आणि Google my Business वरती reviews टाकायला encourage करा. जितके genuine reviews तुमच्या side वरती असतील तितका लोकांचा विश्वास अधिक बसेल,परंतु कोणतीही अशी गोष्ट करू नका जसे कि वेगवेगळ्या fake माध्यमांद्वारे reviews मिळवणे वगैरे. कारण अश्या गोष्टी google पासून लपून राहत नाहीत,आणि कदाचित तुमचे अकाउंट देखील यामुळे बंद होऊ शकते.

5. स्ट्रॉंग असा सोशल मीडिया प्रेझेन्स तयार करा –

सध्या लोकांचा वाढता सोशल मीडिया चा वापर आपल्याला काही नवीन नाहीये. सोशल मीडिया वरती लोक त्यानां हवे असलेले प्रॉडक्ट बघतात काही प्रश्न असेल तर विचारू शकतात, आणि त्यासाठी त्यांना खूप वेळ प्रतीक्षा करण्याची देखील गरज नसते.

सध्या बरेच लोक मनोरंजनाबरोबरच सोशल मीडिया चा वापर व्यवसायासाठी करताना दिसत आहेत.
तुम्ही जर सोशल मीडिया वरती देखील तुमचे कन्टेन्ट टाकत राहिले तर तुमच्या वेबसाइट वरती direct तिथून ट्रॅफिक येऊ शकते. आणि त्यामुळे तुमचा ब्रँड अवेरनेस देखील वाढतो आणि ऑथॉरिटी देखील वाढण्यास मदत होते.

6. इन्फ्लुएंसर मार्केटिंग वापरून पहा –

 इन्फ्लुएंसर मार्केटिंग तुम्हाला ऑफ पेज सीईओ साठी उपयोगी पडू शकते.

मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असलेल्या प्रभावकांसह भागीदारी हा ब्रँड जागरूकता वाढवण्याचा आणि नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सामग्रीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो.

हे विश्वास प्रस्थापित करण्यात आणि तुमची सोशल मीडिया उपस्थिती मजबूत करण्यात मदत करू शकते.

7. गेस्ट पोस्टिंग –

ऑफ पेज सीईओ साठी हा  देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो 

बऱ्याच वेबसाइट या गेस्ट आर्टिकल साठी परवानगी देतात.

गेस्ट पोस्ट करताना त्या वेबसाइट ची डोमेन ऑथॉरिटी किती आहे हे चेक करून मगच आर्टिकल साठी विचार करा तसेच एकाच ब्लॉग वरती खूप सारे आर्टिकल पब्लिश करू नका तर इतर वेबसाइट देखील तरी करत राहा.

लिंक बिल्ड करताना quantity चा विचार करू नका तर quality चा विचार करूनच लिंक बिल्ड करा . 

निष्कर्ष –

Off Page SEO म्हणजे काय व तो कसा करावा? वेबसाईट व ब्लॉगसाठी SEO कसा करावा? या ब्लॉग मध्ये तुम्हाला ऑफपेज एसईओ म्हणजे नक्की काय आहे. याची माहिती नक्कीच समजली असेल ,आणि तुम्हाला या लेखाचा नक्कीच फायदा होईल.

1 thought on “SEO Meaning In Marathi (एस. ई. ओ.) | (Off Page SEO) म्हणजे काय?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!