on page seo म्हणजे काय?

On Page SEO म्हणजे काय? ऑन. पेज. (एस. ई. ओ.) । What is on page SEO [2023]

On Page SEO म्हणजे काय? – जेव्हा तुम्ही तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटला रँक करण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करता तेव्हा त्याला on page seo असे म्हणतात.
मग यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो ,तर on page seo या शब्दामधे त्याचा अर्थ लपलेला आहे म्हणजे तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग च्या पेज वरती जे काही title ,description ,tags, Internal Links ,Outgoing Links ,Heading या आणि अजून बऱ्याच गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करून तुमची वेबसाईट search engine च्या रँक मध्ये जास्तीत जास्त वरती कशी येईल,याचा विचार करून काम करणे. म्हणजेच on page seo करणे.

On Page SEO करणे का गरचेजे आहे ?

१ तुम्ही ज्या विषयाशी संबंधित ब्लॉग लिहिता तेव्हा त्या विषयाची संबंधित अनेक लोकांचे ब्लॉग असणे साहजिक आहे आणि असेच वेबसाईटच्या संदर्भात देखील असते. google च्या सर्च इंजिन मध्ये जेव्हा आपण काही सर्च करतो तेव्हा पहिल्या पेज वरती जे काही result येतात तेच आपण पाहत असतो,दुसऱ्या किंवा दहाव्या पेज वरच्या result ला आपण तितकेसे महत्व देत नाही किंवा ते वाचत देखील नाही.

त्यामुळे आपला प्रयन्त असा असला पाहिजे कि पहिल्या पानावरती आपला ब्लॉग दिसायला हवा आणि तेही पहिल्या ३ result मध्ये तरच आपल्या ब्लॉग वरती ट्रॅफिक येईल आणि आपण खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचू. 

२. on page seo मध्ये अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे  कीवर्ड चा योग्य पद्धतीने वापर , users ज्या पद्धतीच्या queries त्या कीवर्ड चा वापर करून search करतात त्याच साईट्स google दाखवणे प्रेफर करतो त्यामुळे योग्य कीवर्डचा वापर अतिशय महत्वाचा ठरतो. 

३. users तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग वरती आला तर त्याला जास्तीत जास्त चांगला अनुभव देणे , आणि users experience हा चांगला असणे गरजेचे असते. 

कन्टेन्ट कश्या प्रकारचे असायला हवे ? On Page SEO म्हणजे काय?

दर्जेदार कॉन्टेन्ट पब्लिश करणे
Image Source – Pixabay

१. Unique कॉन्टेन्ट

– तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग वरचे कन्टेन्ट हे unique असले पाहिजे , त्याची भाषा हि वाचण्यास सोपी असायला हवी , कॉपी पेस्ट कन्टेन्ट नसले पाहिजे तुम्ही वापरात असलेल्या  Images ,Video ,text ,Infographics आणि कन्टेन्ट या सगळ्या गोष्टी Unique असायला हव्यात. 

२. Users ला उपयोगाचे कन्टेन्ट टाका-

जास्तीत जास्त प्रयन्त असा असायला हवा कि आपण जे कन्टेन्ट टाकत आहोत त्याचा लोकांना खरंच काही उपयोग होईल , नाहीतर बरेचदा खूप सारे ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्नामध्ये आपण त्याची quality देणं विसरून जातो आणि लोकांसाठी ते फार महत्वाचे असते. 

३. कन्टेन्ट research

– आपण जेव्हा कोणतीही माहिती ब्लॉग द्वारे देत असू तर त्या संदर्भात आपला research हा उत्तम असायला हवा ,ब्लॉग लिहिण्यागोदर तुमचे स्वतःचे त्यासंदरबातले ज्ञान खूप गरजेचे आहे. 

४. कोणत्या प्रकारचे कन्टेन्ट तुम्ही लिहिता-

1. Informational – ज्या द्वारे तुम्ही काही माहिती देत असता. 

2.Navigational – ‘फेसबुक वगैरे 

3.Transactional – ‘काही गोष्टी खरेदी कारण्याआधी लोक माहिती घेतात 

4.Commercial -‘कोणता कोर्सेस संदर्भात माहिती घेणे अश्या गोष्टी . 

अश्या कोणत्याही प्रकारामधले कन्टेन्ट तुम्ही लिहीत असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. 

१. वाचायला सोपे 

२. त्यामधून user ला जास्तीत जास्त माहिती मिळेल. 

३. ज्या विषयांवर आधीच लिहिले गेलेले आहे त्यावरती लिहिण्यापेक्षा त्यावरती काम झालेले नाही त्यावरती माहिती देणे फायद्याचे ठरते. 

Page Title आणि Meta Description योग्य पद्धतीने लिहिणे-

तुमच्या पेजच्या नावावरून ते पेज कश्या संदर्भात आहे याची माहिती मिळायला हवी यामुळे users आणि google या दोघांनाही समजायला ते सोपे जाईल.आणि तुमचा ब्लॉग रँक होण्याचे चान्सेस इथे वाढतात. 

Page Title लिहिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल

page Title आणि meta description योग्य पद्धतीने लिहिणे-
Image Source – Pixabay

१. कीवर्ड हा title मध्ये सुरुवातीला टाका – जास्तीत जास्त असा प्रयन्त करा कि तुमचा कीवर्ड हा नावाच्या सुरुवातीला राहील ,यामुळे search engine ला मदत मिळू शकते हे समजायला कि तुमचा ब्लॉग हा कश्या संदर्भात असणार आहे. 

याचा अर्थ असा नाही कि तुम्ही कीवर्ड stuffing कराल ,जर कीवर्ड सुरुवातीला येत नसेल तर काही हरकत नाही पण at least तो तुमच्या कीवर्ड मध्ये तरी यायला हवा. 

Page Title – लिहिताना ते डिस्क्रिप्टिव्ह असणे गरजेचे आहे तसेच खूप मोठे पेज चे नाव नसावे जास्तीत जास्त ६० अक्षरांचा वापर त्यामध्ये असावा. याचे कारण असे कि तुमचे Page Title जितके लहान असाल तितके ते गूगल च्या search result मध्ये दिसण्याचे चान्स जास्त असतात. 

तुम्ही जेव्हा Page Title लिहाल तेव्हा त्यामध्ये पॉवर वर्ड चा वापर करा तसेच नंबर चा देखील वापर करणे फायद्याचे ठरेल. 

उदाहरणार्थ – भारतामधील १० बेस्ट ब्लॉगर . 

तुमचे Page Title जितके आकर्षक असेल तितकेच त्यावरती ट्रॅफिक वाढण्याचे चान्सेस असतात.

2. Meta Descriptions  –

बऱ्याच जणांचे याबाबत confusion असते कि मेटा description म्हणजे काय? किंवा ते कसे लिहायचे 

तर Meta Descriptions म्हणजे आपण गूगल वरती जेव्हा काही शोधत असतो आणिजे result येतात त्यामध्ये मेन headline च्या खाली काही माहिती येत असते तर ती आलेली माहिती म्हणजेच Meta Descriptions असते 

त्यावरून user ला या ब्लॉग मध्ये नक्की कशाची माहिती असणार आहे याची थोडी आयडिया येऊन जाते. मिनिमम २०० अक्षरांचा तुम्ही तिथे वापर करू शकता,हि तुमच्यासाठी एक चांगली संधी असते कारण तुम्ही जितकी चांगली माहिती द्याल तितके users चे तुमच्या ब्लॉग कडे येण्याचे चान्सेस जास्त असतात. 

पण इथे एक मजेशीर गोष्ट अशी आहे कि प्रत्येक वेळी google तुम्ही दिलेलच मेटा description दाखवेलच असे नाही तर तुमच्या ब्लॉग मध्ये जे जास्त उचित असे कन्टेन्ट आहे ते देखील तो users ला दाखवण्याचे चान्सेस असतात. 

Meta Descriptions मध्ये तुमचा टार्गेटेड कीवर्ड टाकायला कधीही विसरू नका ,याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो. 

3. Headings and Content Formatting

जेव्हा तुम्ही ब्लॉग तयार करता तेव्हा तिथे H1 टॅग हा असतोच ,H1 टॅग म्हणजे basically तुमच्या ब्लॉग चे heading असते. 

जर तुम्ही वर्डप्रेस वापरत असाल तर by defaultतुमचे heading हे H1 टॅग म्हणून घेतले जाते. 

तुम्ही जेव्हा तुमच्या ब्लॉग मध्ये H1 टॅग चा वापर करत असाल तर फक्त एका शब्दाचा वापर करणे टाळा आणि तुमचे heading हे जास्तीत जास्त आकर्षक कसे करता येईल याचा विचार करा . 

तसेच heading टॅग मध्ये जो क्रम असतो तो देखील समजून घ्या ,जसे कि <h१>, <h२>, <h३>,<h४>, <h५>  H1 नंतर येणाऱ्या heading ला subheading असे म्हंटले जाते subheading चा उपयोग तुम्हाला तुमचे relevant कीवर्ड वापरायला होत असतो. 

4. Image चा योग्य वापर –

१. कोणत्याही ब्लॉग मध्ये इमेजेस चा वापर हा अत्यंत महत्वाचा ठरतो ,कारण एखादी प्रतिमा बघून वापरकर्ता त्या गोष्टीला चांगल्या प्रकारे relate करू शकतो. 

तुम्ही जेव्हा image वापरता तेव्हा ती ज्या source मधून घेतली आहे त्याचा उल्लेख करणे गरजेचे ठरते. 

२. image बाबतीत जास्त काळजी घेणे गरजेचे असते ,कारण तुम्ही कुठूनही ,कोणतीही image घेऊन टाकू शकत नाही ,आणि तसे केले तर copyright बद्दल eshue  होऊ शकतो. 

३. image मध्ये ALT Tag चा उपयोग करणे फायद्याचे ठरते यावरून search engine ला understand करणे सोपे जाते हि image कश्या संदर्भात आहे.  

जेव्हा तुम्ही image डाउनलोड करता तेव्हा आहे तेच नाव न ठेवता ते बदलून तुमच्या ब्लॉग शी related ठेवण्याचा प्रयन्त करा. 

5. Internal Link – याचा अर्थ असा होतो कि तुमच्या ब्लॉग्स ला एकमेकांशी कनेक्ट करणे. 

१. याच्या मुळे search engine ला तुमच्या इतर ब्लॉग संदर्भात देखील कळते. 

२. यामुळे users जास्त time तुमच्या ब्लॉग वरती घालवण्याचे जास्त चान्सेस असतात 

३. जर users ला त्यामुळे फायदाच होणार असेल तर इंटर्नल लिंक टाकायला काहीही हरकत नाही. 

४. परंतु १५ पेक्षा जास्त इंटर्नल लिंक तुम्ही टाकू शकत नाही. 

५. इंटर्नल लिंक टाकताना जास्तीत जास्त मेन बॉडी मध्ये टाकण्याचा प्रयन्त करा. footer ला किंवा sidebar ला लिंक टाकणे तितके फायद्याचे ठरणार नाही. 

ब्लॉगचे कन्टेन्ट वाचण्यास योग्य असणे देखील गरजेचे आहे

ब्लॉगचे कन्टेन्ट वाचण्यास योग्य असणे देखील गरजेचे आहे -
Image Source – Pixabay

१. फक्त अक्षरांचा उपयोग करून तुमचे कन्टेन्ट वाचण्याचे चान्सेस कमी होतात,तर तुम्ही तिथे bold ,italic underline या गोष्टींचा उपयोग करणे गरजेचे ठरते. 

२. चांगला fond ,आणि size असणे देखील तितकेच महत्वाचे ठरते. 

३. छोट्या छोट्या paragraph मध्ये तुमची माहिती देण्याचा प्रयन्त करा. 

४. दोन paragraph मध्ये अंतर ठेवण्याचा प्रयन्त करा,जेणे करून वाचन करणाऱ्यास ते चांगले वाटेल.

निष्कर्ष –

on page seo म्हणजे काय? On Page SEO चा वापर कसा करावा. याची पूर्णपणे माहिती मिळेल जेव्हा आपण वेबसाइट बनवतो किंवा ब्लॉग वरती काम करतो तेव्हा आपला मूळ उद्देश हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे हा असतो. आणि त्यासाठी महत्वाचे ठरते ते search engine optimization,आणि त्यामध्ये देखील बरेच प्रकार पडतात आणि त्यामधला एक प्रकार म्हणजे on page seo.

तुमचे मत आणि सल्ले माझ्यासाठी महत्वाचे आहे ,ते तुम्ही कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मेल देखील करू शकता.

digitalharshu@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!