blogger-vs-wordpress

Blogger vs WordPress in Marathi | Which Platform is better

वर्डप्रेस आणि ब्लॉगर ही दोनही नावे आपल्याला काही नवीन नाहीत. विशेषतः जेव्हा आपण ब्लॉगिंग सुरु करण्याचा विचार करतो,तेव्हा ही नावे आपल्याला समोर येतात आणि आपले confusion  वाढवतात. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी खूप सारे options उपलब्ध असतात,तेव्हा आपण जरा कावरे बावरे होतोच. तर Blogger vs WordPress in Marathi | Which Platform is better ब्लॉग मधून मी तुमचे हेच confusion दूर करण्याचा प्रयन्त करणार आहे. इथे मी कोणता platform ब्लॉगिंग साठी योग्य आहे त्यांचे फायदे, तोटे सांगण्याचा प्रयन्त करणार आहे,जेणे करून तुम्ही सहज ब्लॉगिंग करू शकाल आणि या दोन्ही मधला एक पर्याय निवडून तुमचे ब्लॉगिंगचे काम करू शकाल. 

Blogger vs wordpress

WordPress आणि Blogger  हे दोनही इंटरनेट वरील अत्यंत लोकप्रिय platforms आहेत. 

या दोघांवरही आपण ब्लॉगिंग करू शकतो. पण ते दोघेही वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. 

जेव्हा आपण कोणतीही गोष्ट वापरण्याचा विचार करतो तेव्हा तिचे फायदे आणि तोटे दोनीही असतात. 

या लेखामध्ये मी तुम्हाला   WordPress आणि Blogger यामधील फरक तुम्हाला सांगणार आहे. यांचे फायदे आणि तोटे सांगणार आहे. 

ज्यामुळे तुम्हाला तुमचा योग्य platform समजून घ्यायला मदत होईल. 

ब्लॉगिंग चा platform कसा निवडाल. 

WordPress आणि Blogger  ची तुलना करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. 

१. वापरायला सोपा –

तुम्हाला तुमचा ब्लॉग platform अगदी सहज पद्धतीने हाताळता यायला हवा. 

ज्याचा set Up हा पटकन तयार होईल आणि तुम्ही सहज content टाकू शकाल . 

तुमची ऑडियन्स ज्यामधून लवकर वाढेल,असा platform निवडणे गरजेचे आहे. 

२. पैसे कमवण्याचे माध्यम –

जर तुम्हाला तुमच्या ब्लॉग वरून पैसे कमवायचे असतील तर तर त्याला योग्य Monetize प्लॅटफॉर्म शी कनेक्ट करणे देखील तितके गरजेचे आहे. 

३. मदत –

जेव्हा आपण ब्लॉग तयार करायला बसतो म्हणजे त्याच designing ,त्याला Manage करताना काही technical problems येऊ शकतात. तर अश्या वेळी मदत मिळणे देखील गरजेचे असते. 

४. सहजता –

आपल्याला ब्लॉगिंग करताना अश्या प्लॅटफॉर्म ची गरज असते, आपला ब्लॉग वाढत असताना आपण त्यामध्येअधिक features आणि Resources  वापरू शकतो.

५. एकंदरीत वरती सांगितल्याप्रमाणे WordPress आणि blogger हे जगामधील सर्वाधिक वापरले जाणारे ब्लॉगिंग चे प्लॅटफॉर्म आहेत.

Buildwith  Blog Technology च्या आकडेवारीनुसार WordPress  हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय software आहे. 

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि Blogger आणि WordPress म्हणजे काय? तर Blogger vs WordPress in Marathi | Which Platform is better या लेखात तेच आपण Detail मध्ये पाहणार आहोत.

ब्लॉगर म्हणजे काय? | What Is Blogger

ब्लॉगर  हि Google ची एक विनामूल्य सेवा आहे. 

Pyra labs ने ती १९९९ मध्ये सुरु केली. आणि गुगलने ती २००३ मध्ये विकत घेतली. 

ब्लॉगर म्हणजे काय? | What Is Blogger

WordPress मध्ये आपल्याला Hosting  आणि Domain ची गरज असते,तसे ब्लॉगर मध्ये नसते. 

ते आपल्याला मोफत Hostingसेवा देते. आपण अगदी मोफत तिथे ब्लॉगिंग करू शकतो. 

तुम्हाला तिथे मोफत BlogSpot subdomain देखील मिळते. तिथे तुमच्या ब्लॉग चा address काहीसा असा दिसतो. www.yourname.blogspot.com 

WordPress म्हणजे काय ? । What Is  WordPress ?

wordpress हे जगातील सर्वात लोकप्रिय platform आहे.

त्यावरून तुम्ही Website तयार करू शकता ,ब्लॉग लिहू  शकता. 

WordPress म्हणजे काय ? । What Is  WordPress ?

wordpress मध्ये ब्लॉग किंवा  Website तयार करण्यासाठी आपल्याला Hosting आणि Domain ची गरज असते. 

Worpress तुम्ही एकदा शिकलात तर काम करायला सुरुवात करू शकता त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी developer ची गरज असतेच असे नाही.

२००३ साली WordPress सुरु झाले आणि आता ३८% website या  WordPress वरती बनविल्या जातात. 

वापरायला सोपे | Blogger vs WordPress 

ब्लॉगर- 

तुम्हाला लिखाणाची आवड आहे ,किंवा तुम्हाला असलेले एखाद्या गोष्टीतले knowledge तुम्ही लोकांसमोर मांडू इच्छिता तर ब्लॉगिंग हा एक चांगला पर्याय तुमच्यासमोर आहे. 

ब्लॉगर हे ब्लॉगिंग चे खूप साधे आणि सोपे माध्यम आहे जिथे तुम्ही काही मिनिटातच ब्लॉगिंग करू शकता. 

ज्याची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला फक्त google account असण्याची गरज आहे. 

वर्डप्रेस-

वर्डप्रेस मध्ये ब्लॉग तयार करणे हि एक सोपी आणि पटकन होणारी प्रक्रिया आहे.त्यासाठी तुम्हाला coding वगैरे चे knowledge असणे गरजेचे नसते. 

WordPress सेटअप  पूर्ण झाल्यावर आपण WordPress Theme निवडू शकता जी आपल्या ब्लॉग साठी गरजेची आहे. 

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि Theme चे काय महत्व आहे तर आपला ब्लॉग आकर्षित सुटसुटीत दिसण्यासाठी Theme मदत करत असते. 

तसेच ब्लॉग अधिक चांगला बनविण्यासाठी तुम्ही त्यामध्ये plugging टाकू शकता. 

WordPress मध्ये eliminator च्या मदतीने तुम्ही अगदी drag आणि drop करून सहजतेने काम करू शकता. 

Image ,Video  द्वारे ब्लॉग अधिक चांगला बनवू शकता. 

WordPress मध्ये तुम्ही अगदी सहजतेने तुम्हाला हवा तसा blog तयार करू शकता. 

Design –

ब्लॉगिंग मध्ये design का गरजेची असते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर,

ब्लॉग ची design जितकी जास्त आकर्षक असेल तितके visitors तुमच्या ब्लॉग वरती वेळ घालवतील. 

तुमचे ब्लॉग design  जर उत्तम असेल तर Bounce Rate  कमी होण्यास मदत होते. 

ब्लॉग जितका सुटसुटीत आणि वाचायला सोपा तितका तुम्हाला अधिक फायदा. 

Blog  Design  Option In Blogger –

 १. ब्लॉगर वरती Templates च्या design चे set हे लिमिटेड असतात,तसेच ते खूप साऱ्या ब्लॉग वरती वापरले गेलेले असतात. 

२. तुम्ही ब्लॉगर मधील templates  चे color , Layout बदलू शकता , परंतु तिथे स्वतःचे template  तयार करू शकत नाही. 

३. तिथे तुम्हाला ब्लॉगर चे खूप सारे template दिसतील परंतु quality च्या दृष्टीने उत्तम मिळणे तसे कठीणच. 

४. मर्यादित template चे option ,customization , layout मध्ये मर्यादा त्यामुळे ब्लॉगर design निवडीच्या बाबतीत मागे पडते. 

design-of-blogger-theme-of-blogger
designs-of-blogger

Blog  Design  Option In WordPress  –

१. WordPress मध्ये हजारो विनामूल्य आणि प्रिमिअम Theme उपलब्ध आहेत,त्यामुळे Theme निवडणे आपल्याला सोपे जाते. 

एवढेच नाही तर light quality theme देखील सहज उपलब्ध आहेत. 

२. wordpress.org या WordPress च्या official website वरती ७000 पेक्षा जास्त themes चा संग्रह आपल्याला  मिळू शकेल. 

Blog  Design  Option In WordPress.
designs-of-WordPress

३. जर तुम्ही appearance मध्ये गेलात तिथे theme option मध्ये blog theme म्हणून शोधले तर तुम्हाला १००० पेक्षा जास्त ब्लॉग theme मिळतील. 

४. तुम्ही Elegant  Theme, Themify, Astra यांसारख्या third  party provider कडून देखील अधिक Theme मिळवू शकता. 

५. इतकेच नाही तर कोडींग चा वापर न करता तुम्ही custom Theme तयार करू शकता. 

Help –

आपल्या ब्लॉग चा platform निवडताना आणखी एक गंभीर गोष्ट असते ती म्हणजे support. 

आपल्याला जेव्हा Help लागेल तेव्हा विश्वसनीय सहकार्य मिळणे गरजेचे असते. 

Help in Blogger –

ब्लॉगर मध्ये खूपच लिमिटेड असा support उपलब्ध आहे. 

Help in Blogger .
Help-in-blogger

तुम्ही तुमच्या ब्लॉगर च्या admin panel वरती click करून support tutorial पाहू शकता. 

ब्लॉगर हि एक मोफत service आहे,त्यामुळे Google, Individual असा कोणताही support देत नाही. 

Help in WordPress  –

WordPress मध्ये एक Active community तुमच्या support साठी उपलब्ध असते. 

support system साठी wordpress.org वरती प्रत्येक Theme साठी, plugin साठी question-answer forum आहेत. 

Help in WordPress
Help-in-WordPress

आपण काही paid theme वापरत असू तर किंवा web hosting कंपनीकडून देखील आपल्याला direct support मिळू शकतो. 

खूप साऱ्या ग्रुप्स वरती ,किवा  फ्री plugin वापरत असाल तरीही तुम्हाला support मिळू शकतो. 

Cost –

पैसे आणि संधी या दोघांच्या बाबतीत आपल्याला ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वरती किती खर्च येईल याचा विचार करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. 

Cost Of Making a Blog In Blogger –

ब्लॉगर हि संपूर्णपणे मोफत आणि विनामूल्य अशी सेवा आहे. 

तिथे आपल्याला मोफत hosting आणि Subdomain देखील मिळते. 

ब्लॉगजरच्या सर्व Theme ,Gazettes ,आणि अन्य पर्याय देखील विनामूल्य आहेत. 

     शेवटी ब्लॉगर हा पूर्णपणे मोफत प्लॅटफॉर्म आहे. परंतु successful ब्लॉग तयार करण्यासाठी बरेच features त्या प्लॅटफॉर्म मध्ये असणे गरजेचे आहे,

ब्लॉगर मध्ये त्या features चा अभाव असलेला दिसतो. 

Cost Of Making a Blog In blogger-WordPress

Cost Of Making a Blog In WordPress –

ज्या प्रकारे ब्लॉगर हि पूर्णपणे मोफत सेवा आहे तसे WordPress मध्ये नाही. 

तिथे तुम्हाला Domain आणि  Hosting खरेदी करावेच लागतात. आणि अर्थात तिथे पैसे लागतात. 

त्यानंतर जर तुमची Theme paid असेल तर ,तुम्ही कोणते Plugin paid घेतले असेल तर खर्च देखील अर्थात वाढतो. 

    परंतु जे पैसे तुम्ही लावता ते तुम्हाला परत देखील मिळतात जेव्हा तुमचा ब्लॉग Monetize व्हायला लागतो. 

Pros And Cons Of Blogger Vs WordPress –  

Pros of blogger – 

1.ब्लॉगर वरती तुम्ही  काही मिनिटामध्ये ब्लॉग तयार करू शकता. 

2.इथे तुम्हाला कोणत्याही Hosting किंवा Domain प्लॅन ची गरज नसते. 

3.तुम्ही ब्लॉगर वरती नवीन असाल तरी देखील तुम्ही त्या-वरती सहज content तयार करू शकता. 

4.अगदी मोफत पणे ब्लॉगर सेवेचा फायदा आपण घेऊ शकतो. 

pros-of-bloger
Blogger

Cons of blogger –

1. ब्लॉगर प्लॅटफॉर्म वरती काम करत असताना तुम्हाला काही मर्यादा देखील येतात. 

2. तुम्हाला हवी तशी theme किंवा अन्य गोष्टी तुम्हाला जश्या हव्या आहेत तश्या इथे मिळतीलच असे नाही. 

3. ब्लॉगर हि google कडून दिली जाणारी सेवा आहे त्यामुळे तुमच्या पेक्षा जास्त हक्क तुमच्या content चे google कडे असतात. 

4. ब्लॉग तयार करून त्यावर पोस्ट करत राहणे त्यापेक्षा जास्त आपण या प्लॅटफॉर्म वरती काही करू शकत नाही. 

Pros of WordPress   –

1. WordPress वरती देखील तुम्ही सहजपणे ब्लॉगिंग करू शकता. 

2. wordpress मध्ये काम करताना तुम्हाला coding चे knowledge असणे गरजेचे असतेच असे नाही. 

3. Elimantor च्या सहाय्याने तुम्ही अगदी सहज drag आणि drop करून तुमचा ब्लॉग किंवा website तयार करू शकता. 

4. हजारो फ्री Theme , pluggin इथे सहज उपलब्ध आहेत. 

pros-of-wordpress
WordPress

Cons of WordPress   –

1. wordpress मध्ये आपल्याला सुरुवातीस डोमेन आणि होस्टिंग साठी पैसे गुंतवावे लागतात. 

2. फ्री मध्ये देखील WordPress होस्टिंग शोधू शकता परंतु ते घेणे तितकेसे सुरक्षित नसते. 

3. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये pluginsकिंवा Overloaded content टाकले तर तुमची website slow होऊ शकते. 

4. तुमची website Hacked आणि Spammed होण्याची संभावना देखील असते. 

निष्कर्ष –

WordPress आणि Blogger हे दोनीही प्लॅटफॉर्म्स ब्लॉगिंग साठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. हे आपल्याला माहित आहे. परंतु इथे आपल्या जर एका-वरच काम करायचे असेल तर कोणता प्लॅटफॉर्म आपल्यासाठी योग्य आहे हे Blogger vs WordPress in Marathi | Which Platform is better हा लेख वाचून तुम्हाला लक्षात येईलच . परंतु त्यासोबत आपण ब्लॉग कशासाठी तयार करत आहोत हे देखील लक्षात घेणे तितकेच महत्वाचे आहे. जर तुम्हाला Personal ब्लॉग बनवायचा असेल म्हणजेच तुम्हाला काही  personal लेख किंवा stories वगैरे अश्या गोष्टी लोकां-सोबत मांडायच्या असतील तर ब्लॉगर हा प्लॅटफॉर्म कधीही उत्तम. परंतु जर तुम्हाला profesional ब्लॉग बनवायचा असेल ज्या-मधून तुम्ही पैसे कमावू शकाल तर WordPress सारखे मजबूत माध्यम असणे केव्हाही योग्य. 

तुम्ही तुमचं मत आणि सल्ले मला नक्कीच खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मला पुढील पत्त्यावर मेल हि करू शकता digitalharshu@gmail.com

2 thoughts on “Blogger vs WordPress in Marathi | Which Platform is better”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!