वर्डप्रेस म्हणजे काय? । What Is WordPress For beginners | In 2021

वर्डप्रेस म्हणजे काय? । What Is WordPress For beginners | In 2021

तुम्ही जर वर्डप्रेस शिकायला सुरुवात केली असेल ,किवा तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात . इथे वर्डप्रेस म्हणजे काय? । What Is WordPress For beginners | In 2021 या ब्लॉग मध्ये मी तुमच्या सारख्या नवीन असणाऱ्या लोकांसाठी ,वर्डप्रेस बद्दल वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल.या ब्लॉग मध्ये WordPress म्हणजे काय ,लोक त्याचा वापर कशासाठी करतात,हे प्लॅटफॉर्म मोफत आहे कि पैसे देऊन घ्यावे लागते, वापरायला सोपे आहे कि अवघड अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ब्लॉग मध्ये वाचायला मिळतील. WordPress हे जगामधील सर्वात मोठे वेबसाईट Builder म्हणून  ओळखले जाते. तिथे आपण blogging ,website creation ,E-commerce  store आणि बऱ्याच गोष्टी अगदी सहज पद्धतीने तयार करू शकतो. Blogger vs. WordPress या ब्लॉग मध्ये आपण दोघांमधील फरक आणि कोणता प्लॅटफॉर्म ब्लॉगिंग करण्यासाठी उचित आहे ते बघीतले .

तर मग करूयात सुरुवात. 

What Is WordPress ? वर्डप्रेस म्हणजे काय? 

WordPress हे एक website builder आणि content management system आहे. 

म्हणजेच तुम्हाला हवी तशी website तुम्ही WordPress वरती तयार करू शकता . 

२७ मे २००३ ला ती पहिल्यांदा release झाली. 

Matt Mullenweg आणि  Mike Little यांनी fork of b2 साठी ती प्रथम तयार केली होती. 

Matt Mullenweg :Image Source-Wikipedia
Mike Little :Image source-Wikipedia

आणि तेव्हा म्हणजे २००३ मधेच एक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून त्याची सुरुवात झाली होती. 

नंतर त्याचे website प्लॅटफॉर्म मध्ये रूपांतर झाले 

आणि आज इंटरनेट वरील सर्वात जास्त वेबसाईट या वर्डप्रेस वरती तयार केलेल्या दिसतात.

थोडक्यात सांगायचे झाले तर वर्डप्रेस हे एक असे सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला ऑनलाईन उत्पादने विकण्यासाठी , ब्लॉग ,वेबसाइट  तयार करण्यासाठी वापरू शकतो.वर्डप्रेस म्हणजे काय?।What Is WordPress For beginners | In 2021 या ब्लॉग मध्ये तुम्हाला अजूनही अश्या बऱ्याच गोष्टी वाचायला मिळतील.

पुढे मी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे ,ती म्हणजे WordPress.org आणि wordpress.com यांमधील फरक

WordPress.org आणि wordpress.com यांमधील फरक

तुम्हाला या दोघांमध्ये फारसे वेगळेपण नावावरून वाटणार नाही परंतु जरा थांबा 

प्रत्यक्षात तसे नाहीये .

इथे जेव्हाही WordPress बद्दल बोलतो तेव्हा आपण किंवा कोणीही WordPress.org  बद्दल बोलतो किंवा माहिती देत असतो . 

परंतु 

WordPress.org ही एक वेगळी सेवा आहे जी blog hosting आणि website सेवा देते. 

wordpress.com हे प्लॅटफॉर्म Matt Mullenweg यांनी सुरु केले. 

बऱ्याचदा आपल्याला सारख्या नावांमुळे गोंधळ होण्याची शक्यता असते किंवा आपल्याला त्यामधील फरक माहित नसतो. 

what is wordpress

वर्डप्रेस वापरण्याची गरज काय आहे?

वर्डप्रेस मध्ये जेव्हा आपण वेबसाइट तयार करतो तेव्हा तिथे आपल्याला Hosting आणि Domain ची गरज असते. 

याची माहिती आपण blogger vs WordPress मध्ये घेतली आहेच 

WordPress मधील सगळ्या वेबसाइटला web hosting गरजेचेच असते. 

हि अशी जागा असते जिथे तुमच्या वेबसाइटच्या files store करून ठेवल्या जातात. जेणे करून इतर users ला तुमच्या website चा फायदा होईल आणि ते सहज प्रकारे तुमच्या वेबसाईट पर्यंत येऊ शकतील. 

तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि domain आणि hosting काय आहे ?

याचे उदाहरण असे देता येईल.

डोमेन आणि होस्टींग म्हणजे काय ? । What Are Domain And Hosting?

Domain name म्हणजे तुमच्या website चा address असतो. जसा कि digitalharshu.com हा माझ्या वेबसाइट चा address आहे. 

जर  website आपले घर असेल तर webhosting हि आपण राहत असलेली जागा आहे. आणि Domain Name आपला राहत असलेला address . 

webhosting चे account चालू करण्यासाठी web Hosting Provider सह sign Up करावे लागते. 

काही तृतीय पक्ष कंपन्या देखील Hosting Solutions Provide करतात. 

कोणकोणत्या प्रकारच्या वेबसाईट तुम्ही वर्डप्रेस वरती तयार करू शकता ?

आपण अगदी जश्या कल्पना करू तश्या वेबसाइट वर्डप्रेस वरती तयार केल्या जाऊ शकतात. 

Online पैसे कमवण्यासाठी जगभरामध्ये वेबसाईट तयार केल्या जातात. 

ईकॉमर्स पासून तुमच्या छोट्या business  पर्यंतच्या वेबसाइट तयार करू शकतो. 

उदाहरण द्यायचं झालं तर 

Personal, business , e-commerce , questions Answers, Portfolio आणि अजून अश्या बऱ्याच काही. 

वर्डप्रेस कसे काम करते ?

तुम्ही वर्डप्रेस install केले कि डाव्या हाताला तुम्हाला Dashboard दिसेल 

त्यामुळे वर्डप्रेस वापरण्यास अगदी सोपे जाते. 

तिथे आपण वेबसाइट ची पेजेस तयार करू शकतो ब्लॉग तयार करू शकतो आणि  पोस्ट देखील लिहू शकतो. 

आपण तिथून theme देखील निवडू शकतो अश्या हजारो मोफत थिम वर्डप्रेस आपल्याला provide करते. 

काही paid Theme देखील उपलब्ध असतात ज्याच्यामध्ये काही advance features उपलब्ध असतात. 

आपण आपली side customize करू शकतो. म्हणजे काय?

परंतु वर्डप्रेस ची खरी ताकद आहे Plugins . 

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि Plugins म्हणजे काय?

Plugins म्हणजे काय? | what are plugins

आपल्या mobile मध्ये जसे Apps असतात,तसे Website तयार करताना plugins गरजेचे असते. 

ज्याच्यामुळे आपण नवीन features आपला website वरती आणू शकतो. 

जसे कि एखादा फॉर्म तयार करण्यासाठी किंवा तुमचा ब्लॉग तुम्हाला social media वरही  share करायचा असेल तर त्यासाठी आपण plugins वापरू शकतो. 

what is WordPress

Woo commerce सारख्या plugins चा वापर करून आपण आपल्या side ला online store मध्ये रूपांतरित करू शकतो. 

वर्डप्रेस मध्ये ५६०० पेक्षा जास्त मोफत plugins तुम्हाला पाहायला मिळतील. 

वर्डप्रेस कोणी कोणी वापरलेले आहे?

वर्डप्रेस हे जगभरामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वापरले जाणारे website builder platform आहे. 

ज्याचा वापर अनेक विद्यापीठांच्या  सरकारी कार्यालयांच्या आणि मोठ्या मोठ्या business च्या वेबसाइट तयार करण्यासाठी वापरले गेले आहे. 

उदाहरण द्यायचे झाले तर 

THE WHITE HOUSE , FACEBOOK , NEWYORK TIMES 

यांची नावे तुम्ही ऐकली असतील किंवा त्यांच्या वेबसाइट ला देखील भेट दिली असेल . 

तर या सगळ्या website वर्डप्रेस वरती तयार करण्यात आलेल्या आहेत. 

वर्डप्रेसचाच वापर वेबसाइट तयार करण्यासाठी का करायचा?

असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. 

मार्केटमध्ये हजारोंच्या संख्येने वेबसाइट तयार करण्याचे प्लॅटफॉर्म असताना आम्ही वर्डप्रेसचाच वापर का करावा ? त्याचे उत्तर तुम्हाला इथे मिळेल. 

तुम्ही या क्षेत्रांमध्ये नवीन असाल तर. 

तुम्हाला कोडींग चे शून्य ज्ञान असेल तरीही 

तुम्ही नवशिखे असाल तरीही 

किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वेबसाइट बनविण्याचा विचार करीत असाल तरीही 

तुम्ही वर्डप्रेस वरती अगदी सहज काम करू शकता.  कसे काय?

कारण वर्डप्रेस हे नवशिक्षितांसाठी आणि छोट्या मोठ्या व्यवसायांसाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म मानले जाते. 

what is WordPress

वर्डप्रेस तुम्हाला खालील गोष्टींचे स्वातंत्र देते. 

वर्डप्रेस हे कोणाच्याही मालकीचे नाहीये,जसे ब्लॉगर हे प्लॅटफॉर्म गूगल च्या मालकीचे आहे. 

ते वर्डप्रेस फाऊंडेशन च्या नॉन-प्रॉफिट संस्थेद्वारे संरक्षित आहे.

याचा अर्थ तुम्हाला ते वापरण्याचे आणि पूर्णपणे उपयोग करण्याचे स्वातंत्र्य आहे. 

तयार केलेल्या वेबसाइट वरती ,त्याच्या कन्टेन्ट वरती आपले पूर्णपणे नियंत्रण असते. 

तसेच वर्डप्रेस हे एक मोफत असे सॉफ्टवेअर आहे. वेबसाइट तयार करण्यासाठी कोणीही त्याचा वापर करू शकतो.

वर्डप्रेसचे फायदे

१. वर्डप्रेस वापरायला सोपे –

 सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत तुम्हाला त्यामधील  गोष्टी माहित नाही तोपर्यंत तुम्हाला थोडे कठीण वाटू शकते कारण तुम्ही अगदी नवीन शिकणारे असाल तर. 

परंतु एकदा का तुम्हाला त्यामधील गोष्टी समजायला सुरुवात झाली कि तुम्ही अगदी सहज पने website तयार करू शकता. 

२. वापरायला सुपिरियर –

तुम्ही वर्डप्रेस मध्ये अगदी मोफत टेम्प्लेट्स निवडू शकता 

plugin मुळे तुम्ही कोणतेही feature जोडू शकता. 

बहुतेक plugins आणि themes या मोफत पाने तुम्हाला उपलब्ध होतील 

तुम्हाला अजून advance गोष्टी हव्या असतील तर तुम्ही paid version देखील वापरू शकता. 

३. वर्डप्रेस हे बहुभाषित – 

६५ पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित आहे. 

installation च्या वेळी तुम्ही तुमची भाषा निवडू शकता. 

setting पागे मधून भाषा बदलू देखील शकता. 

plugins च्या मदतीने तुम्ही तुमचा ब्लॉग किंवा वेबसाइट विविध भाषेमध्ये देखील दाखवू शकता. 

४. कमी खर्चिक – 

तसा  विचार केला तर वर्डप्रेस साठी तुम्हाला अगदीच खूप जास्त पैसे खर्च करावे लागतात असे नाहीये. 

अगदी सुरुवातीच्या काळामध्ये डोमेन आणि होस्टिंग साठी जो खर्च येईल तेवढाच खर्च तुम्हाला असतो.

परंतु जर तुमची वेबसाईट वाढू लागली आणि त्यावरून पैसे मिळवण्यास सुरु झाली तर तुम्ही paid theme आणि plugin लावून तुमच्या वेबसाईट ला अजून सुधारित करू शकता. 

निष्कर्ष – 

वर्डप्रेस म्हणजे काय? । What Is WordPress For beginners | In 2021 या ब्लॉग मध्ये वर्डप्रेस काय आहे त्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच समजला असेल. त्यावरती तुम्ही तुमचा ब्लॉग आणि वेबसाइट किती सहजतेने बनवू शकता,वर्डप्रेस हे नवशिक्षितांसाठी किती फायद्याचे आहे आणि त्याचे किती फायदे देखील आहे. wordpress.com आणि wordpress.org यांच्या मध्ये नक्की काय फरक आहे. आणि कितीतरी मोठ्या  वेबसाईट या वर्डप्रेस वरती बनविल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला नक्कीच या ब्लॉग मधून मिळाली असेल आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. 

तुम्ही तुमचं मत आणि सल्ले मला नक्कीच खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मला पुढील पत्त्यावर मेल हि करू शकता digitalharshu@gmail.com

3 thoughts on “वर्डप्रेस म्हणजे काय? । What Is WordPress For beginners | In 2021”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!