ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ? [Update 2023]

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ?Graphic design meaning in marathi [Update 2023]

सोप्या शब्दामध्ये ग्राफिक डिझाईन म्हणजे design च्या द्वारे तुम्ही समोरच्याला एखादा msg देणे. ग्राफिक म्हणजे काय (graphic meaning in marathi) तर त्याला चित्रकला असेही म्हणता येईल.

असं म्हणतात कि शब्दांपेक्षा फोटो खूप काही फील करून देतात त्यातलाच हा एक प्रकार आहे असे म्हणावे लागेल. 

designer त्यांचे कौशल्य पणाला लावून वेगवेगळे ग्राफिक्स तयार करतात, आणि मार्केटिंग सेल्स बूस्ट करायला हातभार लावतात. ग्राफिक designer व्हिज्युअल कार्याद्वारे इतरांशी कनेक्ट होण्यासाठी त्यांची design कौशल्ये वापरतात. 

ग्राफिक design ला हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे. जेव्हा माणूस गुहांमध्ये राहत होता तेव्हापासून तो चित्र , रंग यांचा वापर करत आलेला आहे. कितीतरी वर्षांच्या इतिहासाचा अंदाज आपण त्या चित्रांवरून तर लावत आलोय. अगदी अलीकडच्या काळात मुद्रण उदयोगाने ,१९२० नंतर टायपोग्राफी , लोगो निर्मिती आणि रंग या सिद्धांताचा उपयोग करण्यासाठी ग्राफिक disign  हा शब्द तयार झाला. 

जसे घराला आपण decorate करत असतो किंवा कोणत्या रंगाच्या कपड्यांचे combination कधी चांगले दिसेल याचा एक बेसिक सेन्स सगळ्यानाच असतो. तर याच कलर theory चा उपयोग ग्राफिक्स बनवणारे लोक करताना दिसतात. 

परंतु खूप creativity यांच्याकडे असावी लागते हे बाब तर खरी आहे.

ग्राफिक design चे ५ प्रकारांमध्ये विभाजन होते. 

ग्राफिक design चे ५ प्रकारांमध्ये विभाजन होते
ग्राफिक design चे ५ प्रकारांमध्ये विभाजन होते

१. प्रॉडक्ट design –

म्हणजे एखाद्या प्रॉडक्ट चे design करणे मग त्यामध्ये एखाद्या छोट्या खेळण्यापासून ते एखाद्या टूल्स पर्यंत सर्व गोष्टी येऊ शकतात. यासाठी बराच मार्केट research करणे गरजेचे असते आणि आपण आपल्या competitors चे कॉपी right क्लेम पासून वाचवून आपल्या अप्रतिम design तयार कराव्या लागतात.

२. ब्रॅंडिंग design –

यामध्ये मुख्य करून आपल्या कंपनी चे ब्रॅण्डिंग करणे हा उद्देश असतो मग त्यामध्ये designer ला कोणता message द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहचायचे आहे या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामध्ये लोगो,वेबसाईट ब्रॅण्डिंग,business कार्ड्स , लेटरहेड ,कंपनी brochures यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. 

३.  प्रिंट design –

मान्य आहे कि सगळं जग हे डिजिटल युगाकडे चालले आहे. पण अजूनदेखील मोठया मोठ्या होर्डिंग्स तयार केल्या जातात. पोस्टर्स प्रिंट केले जातात कारण हा देखील एक मार्केटिंगचाच प्रकार मानला जातो. बिलबोर्ड पासून business कार्ड पर्यंतचा प्रवास हा ग्राफिक designer शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्रिंट डेसिग्न मध्ये मुख्य करून बिलबोर्ड ,कप,स्टेशनरी सेट्स , टीशर्ट , Brochures यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. यासाठी ग्राफिक designer कडे योग्य असे लायोऊटचे ज्ञान , प्रिंट design ,कलर थेअरी यांसारख्या गोष्टी महत्वाच्या ठरतात.  

४. पब्लिशिंग design –

यामध्ये मुख्य ग्राफिक designer ला पुस्तके किंवा मॅगझिनच्या कव्हर चे design , ईबुक लेआऊट आणि त्यांचे design ,ग्राफ्स किंवा इमेजेस एखाद्या पुस्तकामध्ये टाकायच्या असतील तर या गोष्टींचा समावेश इथे होतो. designer चे मुख्य काम वाचकांना इमेजेस बघूनच गोष्टी लक्षात याव्या हे असते. 

५. ऍनिमेशन design –

यामध्ये ग्राफिक designer ला काही ठराविक सॉफ्टवेअर चे ज्ञान असावे लागते. असे कि CAD सॉफ्टवेअर ,vedio एडिटिंग सॉफ्टवेअर , यांचा उपयोग करून ते कार्टून पासून वेगवेगळ्या social मीडिया ग्राफिक्स पर्यंत गोष्टी करत असतात. हे ग्राफिक्स मुख्यतः मनोरंजनाच्या दृष्टीने बनवलेले असतात. ऍनिमेटेड designer ला ग्रुप मध्ये काम करावे लागते कारण एखाद्या कार्टून चे स्केच काढण्यापासून ते त्याचे ३d effect मध्ये ग्राफिक्स करण्यापर्यंत गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे टीम वर्क अतिशय महत्वाचे मानले जाते. 

ग्राफिक designer साठी काय पात्रता असावी लागते. 

ग्राफिक designer साठी काय पात्रता असावी लागते.
ग्राफिक designer साठी काय पात्रता असावी लागते.

Graphic designer कोणाला म्हणावे? | graphic designer meaning in marathi

तर त्यांना ग्राफिक कलाकार म्हणूनही ओळखले जाऊ शकते, ते आपली कौशल्ये वापरून मासिके, लेबले, जाहिरात आणि चिन्हे यासारखी मीडिया उत्पादने तयार करतात.

पात्रता – यामधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप अश्या entrance exams किंवा graduate असावे लागते अश्यातला भाग अजिबात नाहीये ,तुमचं शिक्षण १० किंवा १२ झालेलं असावं तुम्ही graduation केलेलं असेल तर उत्तमच . आर्टस् ,कॉमर्स किंवा science अश्या कोणत्याही शाखेचे तुम्ही विद्यार्थी असाल तरीही काही हरकत नाही. तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करत असताना देखील हा कोर्से करू शकता. graphic design courses information in marathi तुम्हाला बऱ्याच वेबसाईट वरती मिळेल.

परंतु तुमच्यामध्ये क्रीटीव्हिटी असणे खूप गरजेचे आहे. 

स्किल्स | graphic design meaning in marathi

a) creativity 

b) HTML 

c) CSS 

d) कलर थेअरी 

e) फोटोशॉप 

f) टायपोग्राफी 

g) Time management 

काही समस्या आल्या तर ते सोडविण्याची तयारी. 

नोकरीच्या संधी | graphic design meaning in marathi

नोकरीच्या संधी
नोकरीच्या संधी

1. Telivision Industry 

2. MNC 

3. मार्केटिंग फर्म 

4. वेब designing 

5. commercial packaging 

6. Training institute 

7. मल्टि मीडिया कंपनी 

8. जाहिरात agency 

9. प्रिंटिंग अँड पब्लिशिंग इंडस्ट्री 

सॅलरी | graphic design meaning in marathi

खरंतर मागच्या काही वर्षांमध्ये ग्राफिक designer या position ला अतोनात महत्व आलेले आहे. डिजिटल माध्यमांचा वाढत वापर हे खरतर त्याचे मुख्य कारण आहे असे म्हणता येईल . कोणत्या क्षेत्राचा विचार करताना तिथे आपल्याला पैसे किती मिळतील याचा विचार आपल्या डोक्यात आल्या शिवाय राहत नाही. 

साधारण तुम्ही सुरुवात तुमच्या करिअर ची करताय तेव्हा या क्षेत्रामध्ये तुम्हाला १४५००० वार्षिक इतके उत्पन्न तुम्ही मिळवू शकता परंतु जसा तुमचा अनुभव वाढतो तसे तुमचे पैसे देखील वाढतात त्यानंतर साधारण ६२०००० पर्यंत वार्षिक रक्कम तुम्ही कमावू शकता. 

या क्षेत्राचा फायदा असा आहे कि तुम्ही freelancing काम देखील करू शकता त्यामुळे तुमचा इनकम अजून वाढतो.  

ग्राफिक designing या क्षेत्रामधले फायदे आणि तोटे –

ग्राफिक designing या क्षेत्रामधले फायदे आणि तोटे -
ग्राफिक designing या क्षेत्रामधले फायदे आणि तोटे –
फायदे

१. सध्याच्या घडीला ग्राफिक design ही एक आघाडीची फील्ड आहे, एकदा का तुम्ही तुमचे काम चांगल्या पाहतीने दाखवून दिले तर तुम्हाला बऱ्याच संधी प्राप्त होतात. 

२. पूर्णपणे क्रीटीव्हिटी वरती आधारित अशी ही फील्ड आहे, तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन ला क्रीटीव्हिटीची जोड दिली तर यासारखी दुसरी फील्ड नाही. 

३. हे काम monotonus अजिबात नाहीये, तुम्हाला रोज नव्या नव्या प्रोजेक्ट्स वरती काम करण्याची संधी इथे मिळते. 

तोटे 

१. या फील्ड मध्ये प्रचंड compititation आहे. 

२. तुम्हाला रोज नवीन क्रीटीव्हिटी दाखवून काम करावे लागते. 

३. सध्या काय ट्रेंड्स चालेले आहे त्याला ओळखून तुम्हाला काम करावे लागते.

ग्राफिक designing साठी कोणते टूल्स वापरले जातात. | Tools meaning in marathi

Youtube – digitalharshu

१. Canva 

२. Adobe Illustrator.

३. Sketch

४. Foxit PDF Editor.

५. FlippingBook.

६. Adobe Creative Cloud Express.

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न )

1. ग्राफिक design हे अवघड क्षेत्र आहे का ?

या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे creativity असणे खूप गरजेचे आहे. आणि ती जर तुमच्याकडे असेल तर याहून दुसरे भन्नाट असे क्षेत्र नाही 

2. ग्राफिक designer freelancing काम करू शकतात का?

हो तुम्ही तुमच्या ऑफीस चे काम सांभाळून काम करू शकता किंवा पूर्णपणे freelancing काम देखील करू शकता. 

3. ग्राफिक design करिअर चा चांगले पर्याय आहे का. 

जर तुमच्याकडे creativity असेल आणि रंगांचे देखील उत्तम ज्ञान तुम्हाला असेल तर हे एक उत्तम करिअर आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!