ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवाल ? Make Money From Blogging

How Can I Make Money From Blogging In Marathi | ब्लॉगिंग मधून पैसे कसे मिळवाल ?

ब्लॉग म्हणजे काय?

त्याआधी सगळ्यांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न ? How Can I Make Money From Blogging (in Marathi)

How Can I Make Money From Blogging
How Can I Make Money From Blogging

विशिष्ठ प्रकारची माहिती लेखक आणि तज्ञ् इंटरनेट च्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहचवतात,यालाच सोप्या भाषेत ब्लॉग असं आपण म्हणू शकतो. 

ब्लॉगिंग चे किती प्रकार पडतात,लोक ब्लॉगिंग का करतात,वेबसाइट आणि ब्लॉगिंग यामध्ये काय फरक आहे, ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवाल या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला माझ्या ब्लॉगिंग इन मराठी या ब्लॉग मध्ये दिलेली आहेत. तो तुम्ही नक्की वाचा.  

ब्लॉग म्हणजे काय
ब्लॉग म्हणजे काय ?

पण आपल्या पुढे असा प्रश्न उभा राहतो कि लोक ब्लॉगिंग का करतात. ब्लॉगिंग केल्याने काय होते? त्याचे फायदे काय असतात ? आणि त्यामधून लोकांना खरंच पैसे मिळतात का? आणि मिळत असतील तर ते कसे काय?

अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला How Can I Make Money From Blogging या ब्लॉग मधून देण्याचा मी प्रयन्त केला आहे , आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही देखील स्वतःचे ब्लॉगिंग सुरु करू शकाल.  

ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवाल ? How Can I Make Money From Blogging In Marathi

जर professional ब्लॉगर चा विचार केला तर ते महिन्याला १०,००० डॉलर पर्यंत कमवतात. सरासरी विचार केला तर एक ब्लॉगर महिन्याला ३०० ते ४०० डॉलर आरामात कमवतो ,सेलिब्रेटी ब्लॉगर चा विचार केला तर महिन्याला ३०,००० ते ४०,००० डॉलर कमवतात. मागच्या काही वर्षांमध्ये ब्लॉगिंग कडे बरेच लोक हे सिरीयस करिअर म्हणून पाहायला लागले आहेत. पण ब्लॉगिंग मधून पैसे कमावणे हे इतके सोपे खरेच आहे का?

How Can I Make Money From Blogging in Marathi
How Can I Make Money From Blogging in Marathi

वरती जी काही रक्कम मी दिली आहे ती आपणही कमवू शकतो का ? असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येणे साहजिक आहे, परंतु त्याच वेळी आपण हे कसे करू शकू ,त्यासाठी कोणत्या पद्धती आहेत हे देखील आपल्याला जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. 

मी १० प्रकार सांगणार आहे ज्यांच्यामुळे तुम्ही ब्लॉगिंग मधून पैसे कमवू शकता.

१. जाहिरात {Ads } | How Can I Make Money From Blogging In Marathi –

तुम्ही कधी हे अनुभवलं आहे का,जेव्हा आपण एखादा ब्लॉग वाचत असतो तिथे मधेच Ads आपल्याला दिसतात. तर ज्या जाहिराती आपल्याला दिसत असतात, त्याचे त्या ब्लॉगर्स ला पैसे मिळत असतात. 

जाहिरात {Ads }
जाहिरात {Ads }

तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून जाहिराती लावू शकता जसे कि,

Google AdSense

mMedia

Facebook Audience Network Ads

Apple Advertising

Tabola

Yahoo Network

परंतु Google AdSense हे सगळ्यात पॉप्युलर असे माध्यम आहे. ब्लॉगर च्या केस मध्ये तुमचे अकाउंट approve झाल्यानंतर एक code कॉपी करून वेबसाईड च्या बॅकेन्ड ला पेस्ट करायचा आणि तुमच्या अकाउंट वरती जाहिराती दिसायला सुरुवात होते. जेव्हा visitor ती जाहिरात बघतो किंवा त्यावरी क्लिक करतो तेव्हा तुम्हाला काही ठराविक रक्कम मिळत असते. परंतु Google AdSense चा असा नियम आहे कि जेव्हा तुमचे १०० डॉलर जमा होतील तेव्हाच तुमचा अकाउंट ला पैसे जमा होतात. 

AdSense द्वारे पैसे कमावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. 

उत्तम प्रकारचे कन्टेन्ट तयार करा. जेव्हा तुम्ही ब्लॉगिंग द्वारे पैसे कमवण्याचा विचार करताय तेव्हा तुमचे पहिले प्राधान्य हे तुमचे कन्टेन्ट असले पाहिजे. जर तुमचे कन्टेन्ट स्ट्रॉंग असेल तर ट्रॅफिक जास्त येईल आणि त्याचा परिणाम तुमचे monetization देखील उत्तम होईल. 

कीवर्ड चा चांगल्या प्रकारे उपयोग तुम्ही तुमच्या कन्टेन्ट मध्ये करा. जर चांगले keywords तुम्ही वापरले तर तुमचा ब्लॉग सीईओ च्या search result मध्ये येईल. 

Ads चा वापर करताना योग्य Strategy चा उपयोग करून ती कुठे योग्य पद्धतीने बसेल याचाही विचार करणे तितकेच गरजेचे आहे. जर तुमची ads ब्लॉग मध्ये कुठेही दिसत असेल तर वाचणाऱ्याला त्यामुळे Irritation देखील होऊ शकते. त्यामुळे Ads Size आणि जागा यांचा विचार करणे खूप गरजेचे आहे. 

२. Affiliate Marketing | How Can I Make Money From Blogging In Marathi –

हा एक उत्तम पर्याय आहे ब्लॉगिंग च्या माध्यमातून पैसे कमवण्याचा आणि सध्या बरेच लोक त्याचा वापर करताना देखील दिसत आहे. एका ऍड वरती क्लिक करून जितके पैसे तुम्हाला मिळतील त्या पेक्ष्या जास्त पैसे एखादे प्रॉडक्ट जर तुमच्या Affiliate Marketing द्वारे कोणी घेतले तर होईल. सध्या बरेच ब्लॉगर याचा वापर करताना देखील दिसत आहे. 

Affiliate Marketing  | ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवाल
Affiliate Marketing

१. Amazon Affiliate program

२. ImpactRadius

३. Awin

४. Commission Junction

ही काही माध्यम आहे ज्यांच्या द्वारे तुम्ही affiliate marketing करू शकता. 

जेव्हाही कोणी व्यक्ती तुमच्या Affiliate link द्वारे गोष्टी विकत घेईल तेव्हा तुम्हाला त्याचे कमिशन मिळेल. साधारण ५% ते ३०% इतपर्यंत तुम्हाला कमिशन मिळू शकते. 

याशिवाय तुम्ही हि technique wix , medium ,LinkedIn यांसारख्या माध्यमातून देखील करू शकता. 

३. E-book आणि बरेच काही –

तुम्ही जर नोटीस केलं असेल तर लक्षात येईल बरेच ब्लॉगर हे स्वतःचे प्रॉडक्ट त्यांच्या ब्लॉगिंग च्या माध्यमातून विकत असतात ,जसे कि ईबुक वगैरे. 

Affiliate Marketing  | ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवाल
Affiliate Marketing | ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवाल

तुम्हाला एक विषय निवडून त्याची ईबुक तयार करायची असते आणि ती तुम्ही तुमच्या ब्लॉग च्या माध्यमातून किंवा amazon द्वारे देखील सेल करू शकता. 

१. ईबुक 

२. ऑनलाईन कोर्स 

३. वेबिनार इव्हेंट्स 

४. हॅन्डमेड क्राफ्ट 

५. टी शर्ट , स्टिकर्स आणि बरेच काही 

उदा. समजा तुमचा ब्लॉग हा फिटनेस संदर्भात असेल तर तुम्ही त्यावरून योगा मॅट ची Affiliate लिंक देऊ शकता. फिटनेस संदर्भात काही टिप्स काढून तुम्ही त्याची ईबुक ब्लॉग च्या माध्यमातून लोकांना देऊ शकता 

याद्वारे देखील बरेच लोक पैसे कमावताना दिसून येतात. 

४. Direct Advertisements | ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवाल –

Direct Advertisements | make money from blogging
Direct Advertisements

 हा देखील एक उत्तम पर्याय आहे ब्लॉग च्या माध्यमातून पैसे कमवण्याचा, एकदा का तुमचा ब्लॉग चांगला establish झाला. त्यावरती रोज उत्तम ट्रॅफिक यायला लागली तर तुम्ही डिरेक्टली ब्रँड शी कनेक्ट होऊन त्यांच्या ads तुमच्या ब्लॉग प्लॅटफॉर्म्स वरती लावू शकता किंवा तुम्ही agencies शी कनेक्ट होऊन याच प्रकारचे काम करू शकता. 

५. workshops –

workshop | Direct Advertisements | make money from blogging
Workshop

जर तुमच्या ब्लॉग वरती चांगले ट्रॅफिक यायला सुरुवात झाली तर असे मानले जाते कि तुम्ही तुमच्या Nitch मध्ये उत्तम आहात ,आणि याचाच उपयोग करून तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन workshop घेऊ शकता, आणि विशिष्ट फी आकारून त्याद्वारे पैसे कमवू शकता. 

६. Upsell strategy | ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवाल –

Upsell strategy  | Direct Advertisements | make money from blogging
Upsell strategy | Direct Advertisements | make money from blogging

असेही काही लोक असतील कि जे तुमचे आधीचे ग्राहक असतील, म्हणजे त्यांनी तुमच्याकडून काही गोष्टी घेतल्या असतील . तुम्ही एक गोष्ट तर मान्य करत असाल कि जे तुमचे विद्यमान ग्राहक आहेत त्यांना विकणे कधीही सोपे जाते. कारण त्यांचा विश्वास हा तुमच्यावरती बसलेला असतो. 

त्यामुळे अश्या ग्राहकांसाठी काही वेगळ्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ कोर्स किंवा ईबुक तयार करून तुम्ही त्यांना विकू शकता ,जे त्यांना उपयोगाचे ठरेल. 

वैयक्तिक कोचिंग ऑफर करणे हा आणखी एक चांगला फायदा आहे.आणि सध्या बरेच लोक ते करताना देखील दिसतात.

७. service –

Service  | make money from blogging
Service

तुम्ही लोकांना कन्टेन्ट writing, SEO किंवा social media हॅन्डल अश्या सर्विस देऊ शकता.

खर तर आपल्या स्वतःच्या सेवा तयार करणे सोपे आहे.  त्यासाठी आपल्याला फक्त आपल्या ब्लॉगवर एक पृष्ठ तयार करण्याची आणि आपण देत असलेल्या सेवांची यादी करणे आवश्यक आहे.

त्या पेजची  लिंक तुमच्या ब्लॉगच्या नॅव्हबारमध्ये आणि जास्तीत जास्त लोकांना दिसेल अश्या ठळक जागी ठेवण्याची खात्री करा.तुमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याशी संपर्क साधणे आणि तुमच्या सेवांबद्दल अधिक चौकशी करणे सोपे करा.तुम्ही तुमच्या पहिल्या 2-3 क्लायंटशी व्यवहार करता तेव्हा तुमच्या सर्विस  विक्री प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी तुम्हाला  भरपूर कल्पना येतील. तश्या प्रकारे तुम्ही सुधारणा करत जा. तुम्ही पेमेंट आणि फॉलो-अप यासारख्या काही गोष्टी Automate कराल तितके जास्त चांगले राहील.  

ऑटोमेशन साठी मी स्वतः SocialNowa chatbot हे टूल वापरत आहे. मागच्या काही दिवसांपासून मी याचा खरंतर रेग्युलर वापर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम यांसारख्या बऱ्याच प्लॅटफॉर्म वरती Auto-commenting Auto Replying करू शकता.

तसेच तुमच्या वेबसाईट वरती chatbot बिल्ड करून लोकांचे प्रश्न सोडवू शकता. आणि या सगळ्या गोष्टी एका वेळी जर तुम्ही सेट केल्या तर पुन्हा त्याकडे पाहण्याची देखील गरज नाहीये. त्यामुळे इतर टूल्स पेक्षा हे टूल मी तुम्हाला Recommend करेल. 

निष्कर्ष – 

फक्त AdSense मधूनच पैसे कमावले जातात असे नाही तर वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकता.

खूप सारी वेगवेगळी माध्यमे आहेत जी तुम्ही वरती वाचलीच असतील त्यांचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. 

3 thoughts on “How Can I Make Money From Blogging In Marathi | ब्लॉगिंग मधून पैसे कसे मिळवाल ?”

  1. खूपच छान पद्धतीने तुम्ही सांगितले आहे. असेच छान छान ब्लॉग आमच्यासाठी घेऊन येत जा..🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!