ब्लॉगिंग का केली जाते

ब्लॉगिंग का केली जाते  । ब्लॉगिंग करण्याचे फायदे

ब्लॉग म्हणजे काय हे आपण मागच्या ब्लॉग मध्ये पहिले आहे या लेखामध्ये ब्लॉगिंग का केली जाते , ब्लॉगिंग करण्याचे फायदे काय आहेत या संदर्भात माहिती घेऊयात.

ब्लॉगिंग करण्याचा प्रत्येक माणसाचा वेगवेगळा उद्देश असतो. जसे कि काही लोक ब्लॉगिंग पैसे मिळवण्यासाठी करतात, काही लोक त्यांच्या व्यवसायाला ब्लॉगिंग च्या माध्यमातून मदत व्हावी म्हणून ब्लॉगिंग करतात.

काही लोक लेखनाची आवड आहे म्हणून ब्लॉगिंग करतात,तर काही आपले ज्ञान इतरांना मिळावे म्हणून ब्लॉगिंग करतात. एका सर्वे नुसार ५०० मिलियन वेबसाईट या ब्लॉग वेबसाईट आहेत,तर त्यामध्ये ५ ते ६ मिलियन इतक्या रोज ब्लॉग पोस्ट पब्लिश होत असतात. 

ब्लॉगिंग का केली जाते –

१. तुम्हाला असलेले ज्ञान इतरांना देण्यासाठी –  

तुम्हाला असलेले ज्ञान इतरांना देण्यासाठी | ब्लॉगिंग का केली जाते
तुम्हाला असलेले ज्ञान इतरांना देण्यासाठी

तुमची एखाद्या विषयामध्ये expertise असेल तर तुम्ही तुमचे ज्ञान ब्लॉगिंग च्या माध्यमातून इतरांना पोहचवू शकता. त्यामुळे समोरच्या लोकांना देखील याचा फायदा होतो आणि ज्ञान देखील मिळते.

ब्लॉगर कोणत्या विषयावर लिहित आहे हे महत्त्वाचे नाही कारण तो शिकण्यात आवड असलेल्या वाचकांना माहिती देत असतो. 

२. व्यवसायासाठी ब्लॉगिंग केली जाते. – 

बरेचदा  व्यवसाय वाढविण्यासाठी देखील ब्लॉगिग केले जाते. ज्यामध्ये तुम्ही तुमच्यासारख्या अजून लोकांना जोडून एक नेटवर्क तयार करू शकता याचा फायदा तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी देखील होऊ शकतो .

व्यवसायासाठी ब्लॉगिंग केली जाते
व्यवसायासाठी ब्लॉगिंग केली जाते

काही लोक ब्लॉग सुरू करतात जेणेकरून ते व्यावसायिक समवयस्कांसह त्यांच्या नेटवर्किंग संधींचा विस्तार करू शकतील. त्यांच्या ब्लॉगद्वारे, ते त्यांचे कौशल्य स्थापित करू शकतात आणि त्यांची ऑनलाइन पोहोच वाढवू शकतात. आणि त्यामधून नोकरीच्या संधी तयार होतात.

काही ब्लॉग व्यवसाय किंवा ना-नफा संस्थेला समर्थन देण्यासाठी तयार केले जातात.

ब्लॉग खरोखर ऑफर केलेल्या प्रॉडक्ट किंवा सेवांचा प्रचार करतो की नाही हा मुद्दा नाही.

ब्लॉग हा अस्तित्वात असलेल्या बाजारपेठेशी किंवा उद्योगाशी कसा जोडला जातो हे महत्त्वाचे आहे, जे ब्रँड जागरूकता वाढविण्यात आणि वेबवर ब्रँडची पोहोच वाढविण्यात मदत करते.

व्यवसाय आणि चॅरिटी ब्लॉग हे सोशल मीडिया शेअरिंग आणि वर्ड-ऑफ-माउथ मार्केटिंग सुरू करण्यासाठी उत्कृष्ट साधने आहेत.

३. ऑनलाईन पोर्टफोलिओ वाढविण्यासाठी – 

ऑनलाइन पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी इच्छुक लेखक आणि स्वतंत्र लेखकांसाठी ब्लॉगिंग हा एक उत्तम मार्ग आहे.

मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आपले लेखन कौशल्य दाखविण्यासाठी ब्लॉगिंग हा एक उत्तम मार्ग आहे. 

ऑनलाईन पोर्टफोलिओ वाढविण्यासाठी ब्लॉगिंग का केली जाते
ऑनलाईन पोर्टफोलिओ वाढविण्यासाठी

४. पैसे कमविण्यासाठी ब्लॉगिंग केली जाते – 

बरेच ब्लॉगर हे ब्लॉगिंग च्या माध्यमातून पैसे कमवत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांचा ते उपयोग करतात.

जसे कि advertising, Affiliate Marketing , Content Marketing , Teaching Programs यांसारख्या माध्यमातून बरेच ब्लॉगर हे पैसे कमावताना दिसतात.   

पैसे कमविण्यासाठी ब्लॉगिंग केली जाते
पैसे कमविण्यासाठी ब्लॉगिंग केली जाते

५. लोकांपर्यंत पोहचण्याचे माध्यम –

 बर्‍याच ब्लॉगर्सना एखाद्या समस्येबद्दल किंवा विषयाबद्दल प्रकर्षाने वाटते आणि ते एखाद्या गरजेकडे लक्ष वेधण्यासाठी त्याबद्दल लिहिण्यास प्रवृत्त होतात.

एखाद्या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष देऊन ब्लॉगर्स त्याबद्दल लिहायला लागतात.

आणि त्या प्रश्नांबद्दल लिखाणाच्या माध्यमातून आवाज उठवतात. त्यामधून लोकांना मदत करण्याची त्यांची इच्छा असते.

जे ब्लॉगर्स त्यांची आवड म्हणून ब्लॉगिंग करत असतात असे लोक जास्त काळ टिकण्याचे चान्सेस असतात. 

 लोकांपर्यंत पोहचण्याचे माध्यम
लोकांपर्यंत पोहचण्याचे माध्यम

अनेक राजकीय ब्लॉग आणि सामाजिक समस्यांचे ब्लॉग ब्लॉगर्सनी लिहिलेले आहेत जे त्यांच्या स्वत: च्या मार्गाने फरक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

असे ब्लॉग लोकांना एकत्र आणतात आणि जोडतात.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला कोणताही अन्याय दिसला आणि तुम्ही तुमच्या ब्लॉगवर त्याबद्दल आवाज उठवला तर त्यावर बरेच लोक प्रतिक्रिया देतील आणि कदाचित जनआंदोलन होऊ शकेल.

६. मनोरंजनासाठी ब्लॉग्स – 

बरेच ब्लॉग हे लोकांची मजा आणि मनोरंजन यासाठी तयार केले जातात. विनोदी ब्लॉग, ख्यातनाम मनोरंजन ब्लॉग, क्रीडा ब्लॉग, कला ब्लॉग, छंद ब्लॉग, अनेक प्रवास ब्लॉग आणि बहुतेक वैयक्तिक ब्लॉग मनोरंजनासाठी केले जातात. 

मनोरंजनासाठी ब्लॉग्स  | ब्लॉगिंग का केली जाते
मनोरंजनासाठी ब्लॉग्स

अनेक हौशी आणि व्यावसायिक पत्रकार त्यांचे रिपोर्टिंग प्रकाशित करण्यासाठी ब्लॉग सुरू करतात. ते प्रेक्षकांसोबत बातमीदार माहिती शेअर करण्याच्या उद्देशाने स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा जागतिक बातम्यांबद्दल लिहू शकतात.

 यशस्वी नागरिक पत्रकारिता ब्लॉग हे सहसा विशिष्ट स्थानिक सरकारच्या कृतींसारख्या अरुंद विषयावर लक्ष केंद्रित करणारे असतात. या ब्लॉगर्सना अनेकदा त्यांनी प्रकाशित केलेल्या लेखाच्या प्रकाराबद्दल उत्कटता वाटते, ज्यामुळे त्यांना दररोज नवीन लेख प्रकाशित करत राहण्यास भाग पडते. 

७. समविचारी लोकांशी सवांद साधण्यासाठी – 

जागतिक किंवा स्थानिक पातळीवर नवीन लोकांना भेटण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. ब्लॉगिंग भौगोलिक सीमांच्या पलीकडे कल्पना आणि कनेक्शन पसरवण्यास मदत करते.

समविचारी लोकांशी सवांद साधण्यासाठी
समविचारी लोकांशी सवांद साधण्यासाठी

समविचारी लोकांशी संपर्क साधण्याचा आणि काही समस्यांबद्दल तुमचे विचार शेअर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. ब्लॉगचा कंमेंट विभाग सोन्याची खाण आहे, जिथे तुम्हाला इतरांची मते, तुम्ही ज्या विषयावर लिहित आहात त्यावरील दृष्टिकोन ऐकायला मिळतात.

८. मुक्त जीवनशैली – 

ही एक अपरिचित संकल्पना नाही आणि बर्‍याच व्यक्तींना जगाचा प्रवास आणि काम करायला आवडते. ब्लॉगिंग अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला ही संधी देते, कारण तुम्ही तुमच्या गतीने कुठूनही काम करू शकता. 

मुक्त जीवनशैली
मुक्त जीवनशैली

आणि सध्या बरेच लोक या जीवनशैलीचा वापर करताना देखील दिसत आहेत. बरेचदा ज्या लोकांना भरपूर प्रवास करायचा आहे आणि पैसे देखील कमवायचे आहेत. अश्या लोकांसाठी हि खरंच सुवर्ण संधी आहे. 

९. प्रसिद्धी मिळविण्यासाठी –

जेव्हा लोक डॅरेन रोझ, अमित अग्रवाल, टिम फेरीस यांसारखे यशस्वी ब्लॉगर किंवा पैसा आणि प्रसिद्धी असलेले इतर ब्लॉगर पाहतात.

तेव्हा ते त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात.

हा एक वाईट दृष्टीकोन नाही, परंतु ते इथे विसरतात  की

हे सर्व मोठे ब्लॉगर एका दिवसामध्ये प्रसिद्ध झालेले नाहीत त्यासाठी त्यांना कितीतरी वर्ष मेहनत घ्यावी लागली आहे.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  प्रसिद्ध आणि यशस्वी ब्लॉगर ब्लॉगिंग करत आहेत कारण ही त्यांची आवड आहे.

 प्रसिद्धी मिळविण्यासाठी
प्रसिद्धी मिळविण्यासाठी

आवड हा ब्लॉगिंगचा पाया आहे. 

प्रत्येक यशामागे अनेक अडथळे येतात आणि जर तुम्हाला प्रसिद्ध ब्लॉगर बनायचे असेल,

तर तुम्हाला तेथे पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागेल हे जाणून घ्या.

कारण ब्लॉगिंग च्या क्षेत्रामध्ये बरेच पेशन्स देखील तुम्हाला ठेवावे लागतात. 

निष्कर्ष 

तर मग ब्लॉगिंग का केली जाते या तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयन्त या आर्टिकल मध्ये केला आहे,

बरेचदा लोकांना ब्लॉगिंग नक्की कश्यासाठी केली जाते याचे उत्तर सापडत नाही.

किंवा लोकांना ब्लॉगिंग करून काय फायदा आहे हे देखील समजत नाही.

तर हा लेख वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!