हॅशटॅग म्हणजे काय | What Are Hashtag | #Hashtag

हॅशटॅग म्हणजे काय | Hashtag Meaning in Marathi | 2023

Table of Contents

हॅशटॅग हा शब्द कोणाला माहित नाहीये ? जे जे लोक सोशल मीडियाचा वापर करतात त्या सगळ्यांनाच हा शब्द माहित आहे. तुम्हाला माहित आहे का कि आपण आता जो हॅशटॅग वापरतो तो एके काळी पौंड चे प्रतीक होते आणि हॅश चिन्ह {#}म्हणून वापरले जायचे. हॅशटॅग म्हणजे काय | What Are Hashtag ? #Hashtag किंवा hashtag meaning in marathi या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हवे असेल तर हा ब्लॉग नक्की वाचा.

” परंतु हॅशटॅग शब्दाचे महत्व कधीपासून इतके वाढले ? ” ज्या प्लॅटफॉर्म वरती हा शब्द जास्त वापरला जातो ते म्हणजे ट्विटर आणि यापासूनच हॅशटॅग या शब्दाचे महत्व वाढले. २००७ साली जेव्हा ट्विटर ने एका कीवर्ड ला indexing करण्यासाठी त्याचा उपयोग केला ,आणि तेव्हा पासून हॅशटॅग ने एकदम बूस्ट घेतली.आता ट्विटर या प्लॅटफॉर्म वरती त्याचे महत्व तर आहेच परंतु इतर सोशल मीडिया वरती देखील त्याचा वापर प्रचंड वाढलेला आहे.
आणि आता तर हा शब्द इतका सामान्य झाला आहे की २०१० मध्ये ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये याची भर पडली.

हॅशटॅग म्हणजे काय? किंवा Hashtag Meaning In Marathi

अधिक विस्ताराने पहायचे झाले तर, सोशल नेटवर्कींगमध्ये जेव्हा एखाद्या शब्दाच्या आधी आपण # हे चिन्ह लावतो तेव्हा त्याचा हॅशटॅग अर्थात त्या शब्दाची हायपरलिंक तयार होते. ज्यावर तुम्ही क्लिक करु शकता. असा शब्द जेव्हा जो जो कुणी त्यांच्या पोस्टमध्ये वापरतो तेव्हा त्या क्रीएट झालेल्या लिंकमध्ये त्या सर्व पोस्ट दिसू लागतात.

हॅशटॅग म्हणजे काय? Hashtag Meaning In Marathi
हॅशटॅग म्हणजे काय? Hashtag Meaning In Marathi

हॅशटॅग हा आपल्याला माहित असलेला आणि जास्त वापरात असलेला शब्द परंतु त्याला बरीच नावे आहे.
हॅशटॅगची इतर नावे अशी आहेत:

Number sign – संख्या चिन्ह

Pound – पौंड

Pound sign -पौंड चिन्ह

Hash – हॅश

octothorpe – ऑक्टोथॉर्पे

कुठे, का, आणि कसे हॅशटॅग वापरावे हे जाणून घेतल्याने आपण आपल्या सोशल मीडिया वरती जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो.

हॅशटॅगचा वापरताय – तर मग हे वाचाच !

१. हॅशटॅगची सुरुवात नेहमीच # या चिन्हाने  करतात परंतु आपण रिक्त स्थान, विरामचिन्हे किंवा चिन्हे वापरल्यास ते कार्य करणार नाहीत.

२. तुमचे ज्या कोणत्या सोशल  मीडिया साईड वरती अकाऊंट असेल ते पब्लिक करायला विसरू नका ,नाहीतर तुम्ही वापरत असलेल्या हॅशटॅगचा काहीही वापर होणार नाही. 

३. खूप लांबलचक असा हॅशटॅग तयार करू नका,तोच जर छोटा असेल तर लक्षात ठेवायला सोपा जातो. 

४. संबंधित आणि विशिष्ट हॅशटॅग वापरा. जर ते खूप अस्पष्ट असेल तर ते शोधणे कठिण असेल आणि कदाचित अन्य सोशल मीडिया वापरकर्त्यांद्वारे त्याचा वापर केला जाणार नाही.

५. हॅशटॅग वापरण्यावरती ठेखील मर्यादा ठेवा अन्यथा ते स्पॅम होण्याची शक्यता असते. 

हॅशटॅग म्हणजे काय? Hashtag Meaning In Marathi
हॅशटॅग म्हणजे काय? Hashtag Meaning In Marathi

हॅशटॅग का वापरावे ? | Why Use  Hashtag

viral hashtag for instagram किंवा ट्रेंडिंग काय आहे हे शोधण्यासाठी हॅशटॅग उपयुक्त आहेत. तुम्ही जर एखादा शब्द शोधत असाल आणि त्यापुढे जर # हे चिन्ह वापरले तर हॅशटॅग तयार होतो.
थोडक्यात हॅशटॅग मुळे तूम्ही त्या ठराविक गटामध्ये प्रवेश करत असता.
उदाहरणार्थ – #मराठीब्लॉग

हॅशटॅग हे फक्त एकाच भाषेतून वापरले जातात असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकिचे आहे, कारण वेगवेगळ्या म्हणजे इंग्लिश व्यतिरिक्त हिंदी गुजराती आणि मराठी भाषेतून देखील हॅशटॅग तयार केले जातात.
उदा. marathi hashtags, marathi hashtag instagram.

१. Competition -स्पर्धा

कोणत्याही व्यवसायामध्ये आपले स्पर्धक कोण आहे ते कश्या प्रकारे काम करत आहेत कोणत्या प्रकारच्या स्ट्रॅटिजिचा ते वापर करतायेत या गोष्टींबाबत आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे ठरते.
इंस्टाग्राम हे प्लॅटफॉर्म घेतले तर त्यावरून तुम्हाला तुमचा प्रतिस्पर्धक कोणता हॅशटॅग वापरत आहे त्याची टॉप पोस्ट कोणती आहे या विषयी माहिती मिळते.

उदाहरणार्थ-
याचा फायदा असा होईल कि तुम्ही तुमचा सोशल मीडिया वरती कश्या प्रकारच्या पोस्ट टाकायला हव्यात कोणत्या गोष्टी करायला नकोयेत याचा अंदाज येतो. आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या सोशल मीडिया वरती काम करू शकता.

२. Branding and Visibility – ब्रँडिंग आणि दृश्यमानता

आपला व्यवसाय जेव्हा नवींन असतो तेव्हा लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसे पोहचू यावरती काम करणे गरजेचे असते. त्यासाठी हॅशटॅग चा वापर खूप फायद्याचा ठरू शकतो. तर ते कसे काय असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे . जेव्हा आपण आपल्या व्यवसाय संबंधित एखादा हॅशटॅग तयार करतो , तेव्हा लोक जेव्हा इतर ब्रँड बद्दल शोध घेत असतात तेव्हा त्यांना सोबत आपल्या हॅशटॅग रिलेटेड पोस्ट देखील दिसू शकतात. आणि यामुळे आपल्याला नवीन ग्राहक मिळण्याचे चान्सेस जास्त असतात.
आपल्या पोस्टमध्ये सतत त्या हॅशटॅगचा समावेश केल्याने केवळ आपली दृश्यमानता वाढण्यास मदत होत नाहीपरंतु आपला ब्रँड स्थापन करण्यासाठी त्या हॅशटॅगशी आपला व्यवसाय संबद्ध करण्यास वापरकर्त्यांना मदत करते.

३. Promotion – जाहिरात

सोशल मीडिया वरती हॅशटॅग एवढा जास्त प्रचलित होण्याचे कारण मार्केटर्स आणि व्यवसायदारांना त्याचा टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहचवण्यास मदत करतात. मार्केटर्स आणि व्यावसायिक जेव्हा त्यांचा हॅशटॅग तयार करतात , तेव्हा आपल्या ब्रँड चा हॅशटॅग म्हणून त्यांचे ग्राहक तो वापरतात, तसे तुमच्या ग्राहकांच्या कॉन्टॅक्ट मधल्या लोकांपर्यंत देखील तो हॅशटॅग पोहचतो म्हणजेच इथे तुमची जाहिरात व्हायला सुरुवात झालेली असते,आणि तो हॅशटॅग र्ट्रेंडिंग मध्ये आला तर तुमचे स्पर्धक देखील तो हॅशटॅग वापरत असतात,आणि कळत नकळत तिथेही तुमची जाहिरात होत असते.

वेगवेगळ्या सोशल मीडिया वरती हॅशटॅगचा वापर कसा करावा. 

सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करावा ? याची माहिती मिळविण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ?व्हॉट इस सोशल मीडिया मार्केटिंग हा ब्लॉग नक्की वाचा.

१. ट्विटर 

ट्विटर या माध्यमावरती सर्वात जास्त हॅशटॅग चे महत्व आहे. 

परंतु तुम्हाला हे माहित आहे का ट्विटर वरती हॅशटॅग वापरण्याची इष्टतम संख्या : १ किंवा २ इतकीच आहे. 

आपण आपल्या ट्विट मध्ये हॅशटॅग कोठेही वापरू शकतो. जसे कि सुरुवातीला मध्ये किंवा शेवटी देखील.

खालील picture वरून तुम्हाला लक्षात येईलच इथे मी एक ट्विट केलय.. त्यामध्ये मी माझ्या ब्लॉग संदर्भात माहिती दिली आहे. आणि ब्लॉगची लिंक आणि हॅशटॅग देखील दिलेले आहेत.
इथे तुम्ही तुमच्या वेबसाइट, youtube , किंवा एखादया आर्टिकल बद्दल देखील ट्विट करून लोकांपर्यंत ती माहिती देऊ शकता.

लक्षात ठेवण्यासाठी दोन आवश्यक हॅशटॅग टिप्सः

  1. तांत्रिकदृष्ट्या, आपण ट्विटमध्ये आपल्या पसंतीनुसार अनेक हॅशटॅग वापरू शकता, २८० अक्षरांमध्ये ,परंतु ट्विटरने दोनपेक्षा जास्त न वापरण्याची शिफारस केली आहे.
  2. तुम्ही जर नवीन हॅशटॅग तयार करत असाल तर त्या संदर्भात आधी संशोधन करा , तो आधीपासून वापरलेले नाही याची खात्री करा.

२. फेसबुक

फेसबुक वरती देखील तुम्ही १ किंवा २ इतकेच हॅशटॅग वापरू शकता. 

तुम्ही तुमच्या फेसबुक पोस्ट मध्ये कोठेही हॅशटॅगचा वापर करू शकता .  

लक्षात ठेवण्यासाठी दोन आवश्यक हॅशटॅग टिप्सः

१. फेसबुक वरती बऱ्याच लोकांची प्रोफाइल हि खाजगी असल्या कारणामुळे आपल्या ब्रॅण्डसाठी वापरकर्ते कश्या प्रकारे संवाद साधत आहे हे शोधणे थोडे आव्हानात्मक ठरते. 

२. आपल्या ब्रॅण्डच्या हॅशटॅगचे परीक्षण करा फेसबुक च्या या url मध्ये facebook.com/hashtag/_____. संभाषणामध्ये कोणती सार्वजनिक प्रोफाइल सामील होत आहेत ते पहा. 

३. इंस्टाग्राम 

इंस्टाग्राम वरती तुम्ही ५ – १० हॅशटॅग वापरू शकता. तसेच आपण आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये 10 पर्यंत हॅशटॅग समाविष्ट करू शकता.इन्स्टाग्राम प्रोफाइल बायोमध्ये हॅशटॅग समाविष्ट करणे देखील शक्य आहे.

थोडक्यात इंस्टाग्राम वरती तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हॅशटॅग वापरू शकता. 

marathi instagram hashtag असे जरी तुम्ही Search केले तरी तुम्हाला बरेच result दिसायला लागतील.

लक्षात ठेवण्यासाठी दोन आवश्यक हॅशटॅग टिप्स

१. इंस्टाग्राम वरती तुम्हाला टॅग्स नावाचा एक पर्याय दिसेल तिथे तुम्ही तुम्हाला हवा असलेला हॅशटॅग शोधू शकता. त्याला follow देखील करू शकता. 

2. इंस्टाग्राम वरती जर तुमचे business अकाउंट असेल तर तुम्ही insight मध्ये जाऊन हॅशटॅग द्वारे तुम्हाला किती impressions मिळाले आहे ते पाहू  शकता.

४. पिंटरेस्ट 

यामध्ये तुम्ही २ ते ५ हॅशटॅग वापरू शकता. 

तुम्ही जेव्हा एकदा पिन तयार करता तेव्हा त्या पिन मध्ये हॅशटॅग टाकू शकता . 

पिंटरेस्ट मध्ये तुम्हाला हॅशटॅग suggestions देखील येतात परंतु ते तुम्हाला फक्त मोबाईल version मध्ये दिसून येईल. 

पिटरेस्टच्या डिस्क्रिपशन्स मध्ये तुम्ही २० पेक्षा जास्त हॅशटॅग वापरू नये. 

इंस्टाग्राम वरती जर तुमचे business अकाउंट असेल तर तुम्ही insight मध्ये जाऊन हॅशटॅग द्वारे तुम्हाला किती impressions मिळाले आहे ते पाहू  शकता.

खाली काही टूल्स दिलेले आहेत जे तुम्हाला हॅशटॅग शोधण्यामध्ये मदत करतील.


सोशल मीडियाच्या या जगामध्ये हॅशटॅग अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो,
ज्याद्वारे आपण रिच आणि एंगेजमेंट एकही रुपया न घालवता मिळवू शकतो. सोशल मीडिया चे आपल्याला अनेक फायदे आहेत. पण वाईट गोष्ट अशी कि आपल्याला त्याची जाणीव नाहीये. तुम्ही असे अनेक ब्लॉगर किंवा इन्फ्लुएन्सर बघितले असतील,कि जे खूप फेमस झाले आहेत आणि ते देखील त्यांच्या creative कन्टेन्ट मुळे ,आणि त्यांनी वापरलेल्या चांगल्या हॅशटॅग मुळे . आणि फेमस असून देखील ते आपल्याला हॅशटॅग वापरताना दिसतील , सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जे तुमच्या क्रीटीव्हिटी ला बाहेर काढते.

टूल्स ची नावे पुढीलप्रमाणे-

1. Hashtagify.me

2. RiteTag

3. Tagboard

4. Twitalyzer

5. Trends map

आता आपल्याला हॅशटॅग म्हणजे काय हे लक्षात आले असेल परंतु तुम्हाला हे माहित आहेत का इंस्टाग्राम हे ट्विटर नंतर सर्वाधिक हॅशटॅगचा वापर करणारे प्लॅटफॉर्म आहे.
त्यामुळे या लेखामध्ये हॅशटॅगचा उपयोग नक्की कसा करायचा हे आपण पाहुयात.

Instagram हे प्लॅटफॉर्म कोणाला माहित नाही आपण सगळेच लोक त्याचा अगदी पुरेपूर वापर करताना दिसतो. पण तुम्ही जर एखादा business इंस्टाग्राम वरून चालवण्याचा प्रयन्त करत असाल आणि तुम्हाला तिथे हवे तसे clients मिळत नसतील तर तुम्ही कुठे तरी चुकत आहेत. आणि ते कुठे हेच मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगण्याचा प्रयन्त करणार आहे. 

इंस्टाग्राम वरून तुम्ही जितके पैसे कमावू शकता तितकेच वेगळ्या पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमचे followers वाढवत असाल, किंवा अजून काही नवीन गोष्टींचा वापर करत असाल तर इंस्टाग्राम तुमचे अकाउंट देखील बंद करू शकते. त्यामुळे आपल्याला ethical गोष्टींचा उपयोग करूनच काम करायचे आहे. 

इंस्टाग्राम हॅशटॅग का वापरले जातात? (Hashtag Meaning in Marathi )

हॅशटॅग मुळे तुमची ऑडियन्स वाढू शकते. आणि त्यामुळे तुमच्या कन्टेन्ट ला जास्त रिच मिळू शकते. तुम्ही हॅशटॅग वापरला तर तुमची पोस्ट त्या particular हॅशटॅग वरती दिसायला लागते. किंवा तुम्ही तुमच्या स्टोरी मध्ये हॅशटॅग चा वापर केला तरी देखील तो हॅशटॅग त्या particular हॅशटॅग पेज वरती दिसायला लागतो. 

Instagram हॅशटॅग मुळे तुमची एक ऑनलाईन community तयार होऊ शकते आणि त्यामुळे तुमचे ब्रॅण्डिंग जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकते. 

पॉप्युलर इंस्टाग्राम हॅशटॅग चे प्रकार ? (Hashtag Meaning in Marathi )

१. प्रॉडक्ट आणि सर्विस चे हॅशटॅग – हा हॅशटॅग तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विस describe करतो. जसे कि #handbag #makeupartis

२.Niche  हॅशटॅग – निश म्हणजे स्पेसिफिक मधले स्पेसिफिक. निश मुले तुम्ही तुमच्या business च्या स्पेसिफिक कॅटगेरी मध्ये जाता . 

३. इंडस्ट्री community इंस्टाग्राम हॅशटॅग – एका ठराविक community चा हॅशटॅग तुम्ही इंस्टाग्राम वरून काढू शकता. #beautyofinstgram #digitalproductoninstgram 

४. seasonal हॅशटॅग – यामुळे स्पेसिफिक season किंवा holiday अश्या गोष्टी तुम्ही पाहू शकता, #summerdays 

५. location हॅशटॅग – एका ठराविक ठिकाणचे लोकेशन टाकून तुम्ही तो हॅशटॅग टाकू शकता. 

६. ईमोजी हॅशटॅग – एक  स्पेसिफिक  इमोजीचा उपयोग करून देखील तुम्ही हॅशटॅग create करू शकता. 

७. Acronym हॅशटॅग – म्हणजे तुम्ही काही कोडे लेटर वापरून हॅशटॅग तयार करू शकता. #OOTD for outfit of the day, #FBF for flashback Friday, आणि #YOLO for you only live once.

या व्यतिरिक्त friends hashtag, trending reels hashtags, viral reels hashtags, love hashtag असे देखील हॅशटॅग वापरले जातात.

इंस्टाग्राम हॅशटॅग वापरण्याच्या ७ टिप्स आणि ट्रिक –

१. इंस्टाग्राम inside चा उपयोग –

जर तुमचे business अकाउंट असेल तर तुम्हाला इंस्टाग्राम inside चा option दिसेल – 

 तुम्हाला ज्या पोस्ट चा डेटा पाहायचा आहे त्यावरी क्लिक करून तुम्ही View Inside  वरती क्लिक करा. 

त्यामध्ये तुम्हाला त्या पोस्ट संदर्भात सगळा डेटा उपलब्ध होईल त्या पोस्ट ला किती impression मिळाले आहे कोणत्या हॅशटॅग वरून लोक तिथे आले आहेत. याचा फायदा तुम्हाला तुमच्या पोस्ट ला जास्त रिच मिळवून देण्यासाठी होईल.

२. इंस्टाग्राम स्टोरी मध्ये हॅशटॅग चा वापर करा –

स्टोरी मध्ये हॅशटॅग चा वापर केल्याने तुमच्या पोस्ट ला जास्त impression मिळण्याचे चान्सेस असतात.

स्टोरी मध्ये हॅशटॅग वापरण्याच्या २ पद्धती आहेत. एक तर हॅशटॅगचे स्टिकर use करा. किंवा # हा सिम्बॉल स्टोरी मध्ये use करा. 

३ . बॅन आणि spammy हॅशटॅग वापरणे टाळा-

तुम्ही तुमच्या पोस्ट मध्ये बॅन असलेले हॅशटॅग वापरले तर त्या  पोस्ट ला चांगले रिस्पॉन्स मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणजेच तुम्ही त्या हॅशटॅग वरती क्लिक केले तर तुम्हाला फक्त resent च्या काही पोस्ट मिळतील तुम्हाला त्यामागील काही दिवसांच्या पोस्ट अजिबात दिसणार नाहीत .

म्हणजेच हॅशटॅग वापरण्याच्या आधी तुम्ही तो हॅशटॅग नीट तपासून घेऊनच मग पोस्ट केला पाहिजे. बॅन हॅशटॅग चा उपयोग केल्याने impresion कमी मिळतील आणि एंगेजमेंट देखील कमीच येईल. असे हॅशटॅग वापरल्याने bots ,spammers आणि इतर इंस्टाग्राम users आकर्षित होतील ज्याचा तुमच्या कन्टेन्ट शी काहीही संबंध नसेल 

४. हॅशटॅग save करा future वापरासाठी – 

जर एखाद्या हॅशटॅग वरती तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे, असे जेव्हा वाटते तेव्हा तुम्ही तो हॅशटॅग save करून पुढील पोस्ट साठी वापरू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एकच हॅशटॅग खूप वेळा वापरू शकत नाही.

तुम्ही जर एका ठराविक प्रकारच्या हॅशटॅग ची लिस्ट काढून ठेवली आणि ती त्या त्या पोस्ट च्या अनुषंगाने वापरली तर चांगले ठरू शकेल फक्त लक्षात ठेवा की आपण पोस्टवर वापरत असलेले प्रत्येक Instagram हॅशटॅग सामग्रीसह फिट असणे आवश्यक आहे आणि खूप रिपीट होणार नाही याची काळजी घ्या प्रत्येक पोस्टवर तुमची संपूर्ण तयार केलेली लिस्ट कॉपी पेस्ट करू नका.

५ . वापरात असलेल्या हॅशटॅग चा अर्थ समजून घ्या –

हॅशटॅग हे अनेकदा एकत्र अडकलेले शब्द असतात. एक शब्द कोठे संपतो आणि दुसरा शब्द कुठे सुरू होतो हे स्पष्ट नसल्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात.ब्रँड कधीकधी संदर्भ पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय ट्रेंडिंग हॅशटॅगवर जाण्यास खूप उत्सुक असतात.

जेव्हा संदर्भ आव्हानात्मक असतो, तेव्हा हे ब्रँडसाठी  आपत्ती निर्माण करू शकते.

६. Irrelevant हॅशटॅग चा वापर टाळा –

तुम्ही जो हॅशटॅग वापरात आहेत तो तुमच्या पोस्ट च्या related असायला पाहिजे, जेव्हा तुम्ही तुमच्या पोस्ट पेक्ष्या वेगळा हॅशटॅग वापरता, तेव्हा तुमच्या पोस्ट ला यायला हवी तितकी एंगेजमेंट मिळेलच असे नाही.

प्रत्येक पोस्ट ला individually स्वतंत्र असा हॅशटॅग निवडा. आणि तुमच्या पोस्ट शी निगडित नसलेल्या हॅशटॅग चा वापर करू नका. 

७. इंस्टाग्राम हॅशटॅग कसे शोधावेत-

आपल्यापैकी बरेच लोक जेव्हा इंस्टाग्राम वरती पोस्ट टाकतात तेव्हा हॅशटॅग च वापर नक्कीच करतात परंतु ते नक्की कोणते हॅशटॅग वापरत आहेत याचा फारसा विचार करत नाही,कित्येक लोक तर फक्त टाकायचे म्हणून हॅशटॅग टाकत असतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही खूप हॅशटॅग वापरले तर तुम्हाला खूप like मिळतात असे देखील काही नाही. त्यामुळे योग्य आणि मोजक्याच हॅशटॅग चा वापर करणे किती गरजेचे आहे हे तुम्हाला हा लेख वाचून समजेलच.

इंस्टाग्रामच्या search बार मध्ये तुम्ही # हे चिन्ह टाकून काही शोधले तर तुम्हाला त्या संबंधित बरीच माहिती समोर येईल.

यामधील काही तुमच्या कामाशी संबंधित हॅशटॅग तुम्ही वापरू शकता. 

तसेच बरेच पेड टूल्स देखील उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून देखील तुम्ही हॅशटॅग शोधू शकता. 

निष्कर्ष –

हॅशटॅग म्हणजे काय | किंवा Hashtag Meaning In Marathi | #Hashtag म्हणजे काय या ब्लॉग मध्ये हॅशटॅग म्हणजे नक्की काय प्रकरण आहे , कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर करताना ते का फायद्याचे ठरतात , आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते कसे वापरतात, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये नक्की मिळाली असेल. 

आपण सगळेच सोशल मीडियाचा बऱ्यापैकी वापर करतच असतो , पण ते प्लॅटफॉर्म्स वापरात असताना आपल्याला काही बेसिक गोष्टींची माहिती असणे देखील महत्वाचे ठरते,आणि हॅशटॅग हे त्यापैकीच एक आहे.

तुमचे मत आणि सल्ले माझ्यासाठी महत्वाचे आहे ,ते तुम्ही कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मेल देखील करू शकता.

digitalharshu@gmail.com

2 thoughts on “हॅशटॅग म्हणजे काय | Hashtag Meaning in Marathi | 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!