what is social media marketing

सोशल मिडिया मार्केटिंग म्हणजे काय ? Social Media Marketing In Marathi

सोशल मिडिया मार्केटिंग हा शब्द आपल्याला काही नवीन नाहीये कारण आपण अगदी रोज त्याचा वापर करत असतो असा एकही दिवस जात नाही कि आपण फेसबुक,इन्स्टाग्राम चालू करत नाही. कारण या गोष्टी आपल्या जीवनाचा एवढा महत्वाचा भाग झाला आहे कि आपण आता या गोष्टी शिवाय राहू शकत नाही. social Media Marketing हा डिजिटल मार्केटिंग मधला अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. याचे उत्तर तुम्हाला सोशल मिडिया मार्केटिंग म्हणजे काय ? Social Media Marketing In Marathi ब्लॉग मध्ये वाचायला मिळेलच .

परंतु तुम्हाला माहित आहे का कि ज्या गोष्टींचा वापर आपण टाइमपास म्हणून करतो , त्या गोष्टींचा उपयोग करून लोक पैसे कमवतात , कितीतरी Business त्या गोष्टींचा उपयोगाने सोपे होतात.

कोणकोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स येतात

Facebook

Instagram

Twitter

LinkedIn

Pinterest

YouTube

Snapchat

सोशल मिडिया मार्केटिंग म्हणजे काय ? What Is Social Media Marketing In Marathi

याला SMM असे देखील म्हणले जाते. 

सोशल मिडियाचा उपयोग करून तुम्ही तुमचे मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग ध्येय मिळवू शकता . 

सोशल मिडिया मार्केटिंग मध्ये वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात कन्टेन्ट टाकून तुम्ही म्हणजे पोस्ट, विडिओ, रील्स टाकून तुम्ही तुमच्या ऑडियन्स ला एंगेज करून आपले ब्रॅण्डिंग देखील करू शकता.

सोशल मिडिया मार्केटिंगचा उपयोग कशासाठी ?

सोशल मिडिया मार्केटिंग  चा उपयोग कशासाठी ?

१. वेबसाइट वरती ट्राफिक आणण्यासाठी 

२. कस्टमर्स सोबत संवाद बिल्ड करण्यासाठी 

३. ब्रँड अवेरनेस वाढवण्यासाठी 

४. मुख्य प्रेक्षकांशी संवाद सुधारण्यासाठी 

सोशल मिडिया मार्केटिंग  चा उपयोग कशासाठी ?
सोशल मिडिया मार्केटिंग  चा उपयोग कशासाठी.

सोशल मिडिया मार्केटिंग म्हणजे काय ? What Is Social Media Marketing हि डिजिटल मार्केटिंग मध्ये वापरली जाणारी एक स्ट्रॅटिजि आहे असे म्हणावे लागेल . ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या ग्राहकांशी कनेक्ट होऊ शकता त्यांच्याशी चांगले connection तयार करून तुम्ही त्यांना तुमचे कायमचे ग्राहक बनवू शकता. इतर मार्केटिंग स्ट्रॅटिजि सारखंच प्रॉफिट मिळवणे हा मुख्य उद्देश सोशल मीडिया मार्केटिंगचा आहे. सोशल मीडिया मार्केटिंग ही ई-मेल मार्केटिंग नंतरची सर्वात जास्त लोकप्रिय आणि परिणामकारक स्ट्रॅटिजि मानली जाते.

सोशल मिडिया मार्केटिंग चा उपयोग आपल्याला करायचा असेल तर खालील गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे- 

सोशल मिडिया मार्केटिंग चा उपयोग आपल्याला करायचा असेल तर खालील गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे
सोशल मिडिया मार्केटिंग चा उपयोग आपल्याला करायचा असेल तर खालील गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे

१. स्ट्रॅटेजि – 

सर्वात महत्वाचे म्हणजे आपली उद्दिष्ट्ये कोणती आहेत? 

आपल्या व्यवसायातील उद्दीष्टे साध्य  करण्यासाठी सोशल मीडिया कशी आपल्याला मदत करू कशी मदत करू शकेल?याचा विचार करणे गरजेचे आहे. 

प्रत्येक व्यवसायाचे उद्देश हा वेगवेगळा असू शकते , जसे कि काहींना त्यांच्या वेबसाईट वरती ट्रॅफिक हवे असेल तर काहींचा उद्देश हा लोकांपर्यंत आपला ब्रँड पोहचणे असा असेल . तर अश्या वेगवेगळ्या उद्देशासाठी आपल्याला तश्या स्ट्रॅटिजि तयार करून मग काम करावे लागेल. 

2. तुम्हाला कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा उपयोग करायचा आहे – 

प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, पिंटेरेस्ट, यूट्यूब हे आहेत 

सोशल मेसेंजर प्लॅटफॉर्म्स व्हॉट्सअ‍ॅप आणि वीचॅट असे आहेत , तसेच काही छोटे प्लॅटफॉर्म देखील आहेत जसे की अँकर, टंब्लर इत्यादी 

एवढ्या सगळ्या वेगवेगळल्या प्लॅटफॉर्म्स मधून काही ठराविक प्लॅटफॉर्म निवडून तिथे आपले टार्गेट ऑडीयन्स ठरवून काम करणे फायद्याचे ठरते. 

3.तुम्ही कश्या प्रकारचे कन्टेन्ट टाकू इच्छिता

कोणत्या प्रकारचे कन्टेन्ट आपल्या ऑडियन्स ला अट्रॅक्ट करेल , मग त्यामध्ये प्रतिमा, व्हिडिओ किंवा लिंक देखील असू शकतात. मग ते शैक्षणिक किंवा मनोरंजक यापैकी कोणते आहे? आणि तुमच्या सोशल मीडिया पोस्ट कश्या परफॉम करतात त्यानुसार तुम्हाला तुमची मार्केटिंग स्ट्रॅटिजि देखील बदलावी लागेल. 

4. Planning and publishing – प्लांनिंग आणि पब्लिशिंग

सोशल मिडियावरती आपण कोणत्या गोष्टी पब्लिश करायच्या याचे अगोदर चांगल्या प्रकारे प्लांनिंग असणे गरजेचे आहे. 

याचे कारण असे कि आपले प्रेक्षक कोणत्या कन्टेन्ट सोबत जास्त एंगेज होतायेत त्यांना कोणत्या प्रकारचे कन्टेन्ट आवडत आहे. त्यामध्ये देखील कोणत्या वेळेला लोक जास्त कन्टेन्ट पाहतात या सगळ्या बारीक गोष्टींची माहिती ठेवून त्यानुसार प्लांनिंग आखणे गरजेचे आहे. 

सोशल मीडिया मार्केटिंगचे काही फायदे –

सोशल मिडिया मार्केटिंग चे बरेच फायदे आहेत(benefits of using social media). सध्याच्या डिजिटल माध्यमामुळे तर त्याचे महत्व अतोनात वाढलेले दिसून येते. छोट्यातला छोटा business किंवा मोठ्यातला मोठा सोशल मिडिया शिवाय त्याला पर्याय नाहीये.

सोशल मीडिया मार्केटिंगचे काही फायदे
सोशल मीडिया मार्केटिंगचे काही फायदे

१. कमी खर्चीक

पारंपरिक मार्केटिंगच्या ज्या पद्धती होत्या त्यामध्ये खूप सारा पैसा लागतो आणि result देखील त्या तुलनेत मिळतीलच असे नाही. त्यामुळे सोशल मिडिया मार्केटिंग सारख्या माध्यमांच्या साहाय्याने आपण आपला पैसा आणि वेळ दोनीही गोष्टी वाचवून चांगला result मिळवू शकतो. 

२. मोजमाप करण्यास सोपे

सोशल मिडिया मार्केटिंगच्या साहाय्याने आपण आपण चालवलेले campaign कश्या प्रकारे चालले आहे आपला Open rate किती आहे , किती लोक interested आहे या सगळ्या गोष्टींचे मोजमाप करणे सोपे आहे.आपल्याला हवा तसा result मिळत नसेल तर आपण आपले campaign थांबवू शकतो .  

३. सोशल मीडिया

सोशल मिडिया मार्केटिंगचे सगळेच प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमचा ब्रँड अवेरनेस वाढवून द्यायला खूप मदत करते . गूगल  ऍडच्या मदतीने तुम्ही ऍड चालवून लोकांपर्यंत पोहचू शकता. त्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या  interested क्लीएन्ट पर्यंत पोहचण्यास मदत होते , आणि पुढे तुम्ही फक्त त्याच लोकांपर्यंत ऍड च्या माध्यमातून पोहचवू शकता. अश्या प्रकारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्याला आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची अनोखी संधी देतात . 

4. सबंध प्रस्थापित करण्यासाठी उपयोगी

समजा तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट Related काही पोस्ट टाकली आहे , आणि त्यावर काही लोकांच्या कंमेंट येतात तर  त्या कंमेंट वरती तुम्ही रिप्लाय करणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे यामुळे ग्राहकांचा तुमच्यावर आणि तुमच्या ब्रँड वरती विश्वास बसायला जास्त मदत होते. आणि पुढच्या वेळी इतरांच्या तुलनेत ते लोक तुमच्या ब्रॅड ला प्रेफर करतात.

५. एकाच वेळी खुप साऱ्या लोकांपर्यंत पोहचवू शकतो-

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरणारे लाखो लोक आहेत. आपल्या व्यवसायासाठी आपल्या उत्पादनांमध्ये किंवा सेवांमध्ये स्वारस्य असलेल्या लोकांपर्यंत पोहचण्याची  ही एक उत्तम संधी आहे.

एका सर्वेच्या आधारे सोशल मीडिया वापरणारे किती लोक आहे . याचा आपल्याला अंदाज येईल. 

YouTube: 73%

Facebook: 68%

Instagram: 35%

Pinterest: 29%

Snapchat: 27%

LinkedIn: 25%

Twitter: 24%

मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता सोशल मीडियाचा एक मोठा फायदा आहे. हे आपल्या उत्पादनांसाठी किंवा सेवा हव्या असलेल्या अधिक लीड शोधण्यासाठी आपल्या व्यवसायासाठी दार उघडते.

सोशल मिडिया मार्केटिंगचे तोटे-

जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसेच तिचे तोटे देखील असतात. आणि आपल्याला त्या गोष्टींचा देखील विचार करावा लागतो. वरती आपण सोशल मिडिया मार्केटिंगचे फायदे पहिले आता त्याचे तोटे काय आहेत हे लक्षात घेऊयात. 

1. हल्ली लोक आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी अगदी सहज पद्धतीने social Media वरती टाकत असतात. परंतु ते त्यांना आवडत नसलेले अनुभव social Media वरती देखील टाकू शकतात. आणि जर एखाद्या व्यक्तीस आपल्या व्यवसायाबद्दल चांगला अनुभव आला नसेल तर तर social Media च्या द्वारे तो इतर लोकांपर्यंत सहज पोहचवू शकतो. असे अनुभव वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती वेगवेगळ्या पद्धतीने टाकले जाऊ शकतात.

जसे कि ट्विटर सारख्या साइटवर वापरकर्ते त्यांच्या पोस्टवर कंपनीला टॅग करु शकतात, फेसबुक सारख्या माध्यमाद्वारे लोक तुमच्या व्यवसाया संबंधित पेज वरती जाऊन कंमेंट करू शकतात. आणि ज्याचा परिणाम अर्थात इतर इच्छुक असणाऱ्या लोकांवरती देखील पडू शकतो. 

तर मग या येणाऱ्या निगेटिव्ह कंमेंट ला कश्या प्रकारे सामोरे जायचे – 

हेच लोकांच्या निगेटिव्ह कंमेंट येतात अश्या वेळी त्यांच्या येणाऱ्या कंमेंट ला उत्तर द्या , प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यवसायाबद्दल चांगलाच अनुभव येईल असे नाही परंतु समस्यांकडे लक्ष वेधून घेतल्यास आपली कंपनी आणि त्याच्या मूल्यांबद्दल काही बोलू शकतो.

2. आपण जेव्हा कोणतेही कन्टेन्ट आपल्या व्यवसायासंबंधित पोस्ट करत असतो त्या वेळी आपण जे फोटो विडिओ किंवा हॅशटॅग वापरणार आहोत त्यांचा चांगल्या प्रकारे संशोधन करा . आणि मगच ते अपलोड करा . आपण असे न केल्यास कदाचित आपल्याला नेगेटिव्ह फीडबॅक ला देखील सामोरे जावे लागू शकते.

3. तुम्हाला तुमच्या campaign वरती बरेच काम करावे लागते-

social media वरती काम करताना आपल्याला सतत नवीन प्रकारचे कन्टेन्ट कसे तयार करता येईल याचा विचार करावा लागतो. त्यामध्ये मग सतत नवीन सामग्री तयार करणे, सामग्री पोस्ट करणे आणि या प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रेक्षकांसह व्यस्त असणे आवश्यक आहे.

4. Result तुम्हाला लगेचच मिळतील असे नाही –

social media वरती तुमच्या कन्टेन्ट ला लगेचच चांगली एंगेजमेंट मिळेल खूप साऱ्या लोकांपर्यंत ते पोहचेल असे नाहीये.  त्यासाठी तुम्हाला बरेच पेशन्स ठेवावे लागतात. त्यासाठी बराच वेळ देखील जावा लागतो. एकदा का तुमचे कन्टेन्ट पॉप्युलर व्हायला लागले आणि लोकांना ते आवडायला देखील लागले तर काही प्रश्नच उरत नाही. 

निष्कर्ष –

सोशल मिडिया मार्केटिंगचे या लेखामध्ये सोशल मिडियाचा आपण आपल्या व्यवसायासाठी कसा उपयोग करू शकतो आणि त्याद्वारे लोकांपर्यंत किती सहज पद्धतीने पोहचू शकतो याबद्दल माहित मिळाली असेल तसेच कोणत्याही गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच तोटे देखील आणि त्याकडे आपण कश्या प्रकारे लक्ष दिले पाहिजे याची देखील माहिती तुम्हाला सोशल मिडिया मार्केटिंग म्हणजे काय ? What Is Social Media Marketing In Marathi लेखाचे वाचन केल्यावर लक्षात येईलच.

तुम्ही तुमचं मत आणि सल्ले मला नक्कीच खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मला पुढील पत्त्यावर मेल हि करू शकता digitalharshu@gmail.com

 

 

5 thoughts on “सोशल मिडिया मार्केटिंग म्हणजे काय ? Social Media Marketing In Marathi”

  1. खूप छान. अगदी सर्व मुद्दे विचारात घेतले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!