Wordpress.com आणि Wordpress.org या दोघांमध्ये तुम्हाला काय फरक आहे

WordPress.com आणि WordPress.org दोन्हींमधील फरक | WordPress.com आणि WordPress.org या दोघांमधून कोण योग्य ?

WordPress.com आणि  WordPress.org या दोनही प्लॅटफॉर्म्स बद्दल तुम्ही थोडेफार ऐकले असेलच. WordPress.com आणि WordPress.org दोन्हींमधील काय फरक आहे. दोनही शब्दांमध्ये  वर्डप्रेस हा शब्द जरी सारखा असला तरी दोघांच्याही शेवटच्या अक्षरावरून त्यामधील फरक आपल्या लक्षात येतो. परंतु वाटते तितके साम्य या दोन्हींमध्ये बिलकूलच नाहीये. तर मग नक्की काय फरक आहे या दोघांमध्ये तर ते तुम्हाला हा ब्लॉग वाचल्या-नंतरच लक्षात येईल . तुम्ही जेव्हा कोणताही ऑनलाईन  प्लॅटफॉर्म तुमच्या कामासाठी निवडता तेव्हा त्याबद्दल तुम्हाला चांगली माहिती असणे खूप गरजेचे ठरते. या दोघांनाही समजण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे प्रथम आपल्या डोक्यामधून हि गोष्ट काढून टाकणे कि हे दोनही प्लॅटफॉर्म एकच आहे. लोकांना बरेचदा हे दोनही प्लॅटफॉर्म सारखे वाटतात  त्यामुळे प्रत्येक व्यासपीठाकडे Individual पद्धतीने पाहणे ,खूप गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा ब्लॉगिंगचा विचार करता किंवा वेबसाइट तयार करण्याचा विचार करता तेव्हा त्यासाठी गरजेचे असते ते एक प्लॅटफॉर्म निवडणे. WordPress.com आणि WordPress.org या दोघांमध्ये तुम्हाला काय फरक आहे याची माहिती मिळेल.तुम्हाला जर ब्लॉगिंग म्हणजे काय याची माहिती हवी असेल तर तुम्ही WHAT IS BLOGGING हा ब्लॉग वाचू शकता. 

wordpress.com आणि wordpress.org यांचे फायदे आणि तोटे बघुयात.

WordPress.org चे  फायदे –

१.  वर्डप्रेस हे मोफत Open-Source आहे ,आणि वापरण्यास देखील सोपे आहे. 

२.  जी  वेबसाइट आपण तयार करतो ,तिचा पूर्ण डेटा आणि त्यावरील पूर्ण हक्क हा आपला असतो. अचानक तुमची side बंद वगैरे केली जाईल असे कधीही होणार नाही. कारण ते  वर्डप्रेसच्या अटी आणि नियमांच्या विरोधात आहे.परंतु तुमच्याकडून काही गैर काम झाले तर मात्र तसे होऊ शकते. 

३.  कोणाशीही Revenue Share न करता तुम्ही तुमच्या वेबसाइट वरती ads लावू शकता. 

४.  Google Analytics सारखी Powerful Tools तुम्ही वापरू शकता . 

५.  तुम्ही online store देखील तयार करू शकता ,त्याद्वारे digital आणि Physical Product तुम्ही विकु शकता इतकेच नाही तर वेबसाईट वरून देखील वस्तू आपण विकू शकता आणि त्याद्वारे payments देखील घेऊ शकता. 

६.  तुम्ही Membership Side तयार करून त्याद्वारे प्रीमियम कॉन्टेन्ट , कोर्सेस वगैरे विकू शकता , आणि तुमची Online Community Build-up करू शकता. 

WordPress.org चे तोटे –

१.  वेबसाइट बनवायची म्हंटलं की Web Hosting ची गरज लागतेच,जयचयमुळे आपल्या वेबसाइट वरील files संग्रहित केल्या जातात. 

ज्याची किंमत ३ ते १० डॉलर आहे. परंतु तुमची वेबसाइट जशी वाढत जाते, तसा वेबहोस्टिंग चा खर्च देखील वाढत जातो. 

२.  वेबसाइट Update करायची असल्यास ते काम आपल्याला स्वतःला करावे लागते, इथे Auto-Updating आपल्याला पाहायला मिळत नाही. 

३.  Back-up देखील आपला आपल्यालाच ठेवावा लागतो,परंतु बरीच अशी मोफत Plugins तुम्हाला मिळून जातील ज्याद्वारे तुमचे backup चे काम सोपे होऊन जाईल. 

वर्डप्रेस चा खरा खर्च तुम्ही कश्या प्रकारची वेबसाइट तयार करता त्यावरती अवलंबून असतो. जसे कि simple blog, professional blog ,e -commerce store वगैरे ,त्याचबरोबर तुम्ही कश्या प्रकारच्या गोष्टी त्यासाठी वापरता म्हणजेच फ्री मधील वापरता कि प्रीमियम यावर देखील गोष्टी डिपेंड असतात. परंतु विशेष गोष्ट अशी कि ९९ % लोक वेबसाइट तयार करण्यासाठी वर्डप्रेस लाच प्राधान्य देतात.

wordpress.com and wordpress.org
WordPress

WordPress.com  चे  फायदे –

१. तुम्हाला जर हॉबी ब्लॉग सुरु करायचा आहे,किंवा फक्त लिखाणाची आवड म्हणून तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर WordPress.com हे एक चांगले प्लॅटफॉर्म आहे. 

२.  तुम्हाला इथे Updating किंवा Backup बद्दल काळजी करण्याची काही गरज नसते. कारण WordPress.com त्याची पूर्ण जबाबदारी घेते. 

३.  तुम्हाला तिथे ३GB पर्यंत मोफत जागा वापरायला मिळते. तुम्हाला अधिक जागेची गरज असेल तर तिथे तुम्हाला विविध पर्याय त्यांच्याकडून मिळतात ज्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात एवढेच. 

जसे कि Personal Plan हा ४८ डॉलर ला १ वर्षासाठी तुम्हाला मिळेल ज्याच्यामध्ये ६GB जागा तुम्हाला उपलब्ध होईल. 

Premium plan हा ९६ डॉलर ला तुम्हाला मिळेल १३ GB जागा तिथे मिळेल ,

Business Plan  ३०० डॉलर ला ज्याच्यामध्ये २०० GB जागा आपल्याला वापरायला मिळेल.  

WordPress.com  चे तोटे –

१. WordPress.com चा सगळ्यात मोठा तोटा हा आहे कि तुम्ही तिथे कोणत्याही प्रकारची add लावू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही जर तुमच्या ब्लॉग मधून पैसे कमविण्याचा विचार करत असाल तर ते श्यक्य नाहीये कारण WordPress.com तशी परवानगीच देत नाही. परंतु याला अपवाद असा म्हणता येईल कि तुमच्या वेबसाइट वरती खूपच ट्रॅफिक येत असेल तर तुम्ही त्यांच्या advertising program साठी aaplya करू शकता ,आणि त्यामधून जो रेव्हनूर येईल तो WordPress.com  ला देखील share करावा लागेल. 

२. तुम्ही तिथे कोणतेही plugin लावू शकत नाही , परंतु  Bussiness Plan आणि VIP Program हे pligins लावू शकतात परंतु त्यांनाही पैसे pay करून ती सेवा घ्यावी लागते. 

३. तुम्ही तिथे custome theme वापरू शकत नाही. ,तुम्ही जर त्यांचा फ्री प्लॅन घेतला असेल तर त्यामध्ये तुम्हाला काही ठराविक थिम मिळतील त्या तुम्ही वापरू शकता. परंतु Premium आणि Bussiness प्लॅन चा वापर करणारे थिम वापरू शकतात. 

यावरून आपल्या हे लक्षात येते कि फ्री version साठी त्यांच्याकडे limited customization चे पर्याय आहेत. 

४. तुम्ही कोणतेही Powerfull Tracking प्लॅटफॉर्म वापरू शकत नाही जसे कि Google Analytics ,परंतु Buaainess पालन वापरकर्ते त्याचा वापर करू शकतात. 

५. तुमच्या side चे जास्त हक्क हे wordpress.com कडे असतात,याचाच अर्थ ते तुमची side कधीही delet देखील करू शकतात,जर त्यांना असे लक्षात आले कि तुम्ही त्यांच्या नियम व अटी लक्षात घेऊन काम करत नाहीये तर. 

६. तुम्ही wordpress.com वरती कोणतीही membership side चालू करू शकत नाही. 

७. तुम्ही जोपर्यंत त्यांच्या e-commerce  प्लॅन वरती switch होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्या कोणत्याही e-commerce गोष्टींचा फायदा घेऊ शकत नाही आणि payment देखील करू शकत नाही. 

यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल कि wordpress.com हा किती जास्त limitations तुमच्या कमावरती आणू शकतो. 

WordPress.com Vs. WordPress.org which is better?

WordPress.com आणि WordPress.org दोन्हींमधील फरक फरक काय आहे ? जर तुम्ही पर्सनल ब्लॉगर आहेत आणि तुम्ही फक्त आवड म्हणून ब्लॉगिंग करत आहात तर wordpress.com यांच्या free plan सोबत तुम्ही काम करू शकता. 

परंतु तुम्ही ब्लॉगिंग कडे profestional किंवा व्यावसायिक दृष्टीने बघत असाल तुम्ही त्याकडे एक income source म्हणून बघत असाल  wordpress.org वरती काम करायला हवे. जिथे तुम्ही तुम्हाला हवी तशी website तयार करू शकता कोणत्याही मर्यादेशिवाय . 

पैसे कसे कमावू शकता | WordPress.com आणि WordPress.org या दोघांमधून कोणते प्लॅटफॉर्म योग्य आहे.

WordPress.com हा प्लॅटफॉर्म फ्री प्लॅन साठी Adds लावण्याची परवानगी देत नाही जर तुमची वेबसाइट खूपच जास्त ट्रॅफिक देणारी असेल तर तुम्ही त्यांचा Word Ads चा प्रोग्रॅम जॉईन करू शकता. परंतु आलेल्या पैशांमधून काही वाटा हा  wordpress.com चा असेल. 

Which is better for E-commerce | wordpress.org 

मध्ये तुम्ही अगदी सहज पद्धतीने ईकॉमर्स वेबसाईट तयार करू शकता . तुम्ही तिथे Woo commerce वापरून तुमचे store तयार करू शकता त्याशिवाय ईकॉमर्स membership आणि LSM plugins देखील वापरू शकता. 

e-commerce
E-commerce

WordPress.com मध्ये वेबसाईट तयार करण्याचीच सुरुवातीची किंमत ही ५४० डॉलर एका वर्षासाठी आहे. जर तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल तर हि किंमत खूपच जास्त आहे. 

शिवाय खूप जास्त नियम आणि अटी तुम्हाला त्यांच्या ईकॉमर्स सर्विस मध्ये पाहायला मिळतील. 

wordpress.com वरून wordpress.orgकडे तुम्ही वेबसाईट शिफ्ट करू शकता का?

तर या प्रश्नाच उत्तर हो असे आहे. 

जर तुम्ही या क्षेत्रामध्ये नवीन असाल आणि तुम्ही वेबसाइट तयार केली त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये असणाऱ्या मर्यादांची जाणीव झाली आणि तुम्हाला वेबसाइट ट्रान्सफर करण्याची गरज वाटू लागली तर नक्कीच तुम्ही ती शिफ्ट करू शकता. 

निष्कर्ष –

या दोघांमधील फरक जर चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर ते एका उदाहरणाच्या साहाय्याने तुम्हाला लगेच लक्षात येईल wordpress.com किंवा wordpress.org हे स्वतःच्या मालकीचे किंवा दुसऱ्यांच्या मालकीचे घर असल्यावर जसा फरक असतो तसाच या दोनही प्लॅटफॉर्म्स  मध्येही आहे. wordpress.com हे रेंटेड घर आहे ,ज्याच्यावर खूप मर्यादा आहेत ,तुम्हाला घरामध्ये काहीही करण्याचे स्वतंत्र नसते. wordpress.org हे स्वतःच्या घरासारखे आहे ज्याचा पूर्ण कंट्रोल आपल्या हातामध्ये असतो. तुम्हाला तिथून कोणीही बाहेर काढू शकत नाही. तुम्हाला तिथे सगळं काही करण्याचे स्वतंत्र असते. जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा गोष्टींमधील वेगवेगळ्या टूल्स मधील फरक समजायला वेळ लागतो, परंतु काम करायला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चांगल्या प्रकारे ज्ञान मिळवून त्या गोष्टीला सुरुवात केली तर पुढे समस्या येत नाहीत. WordPress.com आणि WordPress.org दोन्हींमधील फरक ब्लॉग वाचून तुम्हाला या दोनही प्लॅटफॉर्म्स मधला फरक नकीच समजला असेल. 

तुम्ही तुमचं मत आणि सल्ले मला नक्कीच खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मला पुढील पत्त्यावर मेल हि करू शकता digitalharshu@gmail.com

1 thought on “WordPress.com आणि WordPress.org दोन्हींमधील फरक | WordPress.com आणि WordPress.org या दोघांमधून कोण योग्य ?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!