Career in digital marketing | 2021

How to Start Career In Digital Marketing In India [Update 2023]

डिजिटल मार्केटिंग हा शब्द आपल्याला २०२०/२०२१ मध्ये तरी नवीन नाहीये. आपल्या रोजच्या जीवनातल्या कितीतरी गोष्टी त्याच्याशी निगडित झाल्या आहेत. डिजिटल माध्यमातून केलं जाणारे मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग. किंवा ज्या ज्या devise ला internet ने कनेक्ट केले आहे आणि त्या इंटरनेटच्या माध्यमातून केले जाणारे मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग.

आता या गोष्टी सहज श्यक्य आहेत परंतु तुम्ही जर ९० च्या दशकामध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल कि हल्लीच्या आणि तेव्हाच्या गोष्टींमध्ये किती जास्त फरक होता ,तेव्हा आता इतके मोबाईल फोन इंटरनेट आणि digitalize गोष्टी नव्हत्या,तेव्हा जाहिराती देखील आपण T.V. वरती किंवा वर्तमान-पत्रामध्ये पाहायचो,त्यानंतर मात्र गोष्टी digitalize होत गेल्या,डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणत्या प्रकारचे करिअर तुम्ही करू शकता , त्यामध्ये तुम्ही कोणते पर्याय निवडू शकता याची सगळी माहिती तुम्हाला Career In Digital Marketing In India | Marathi Blog 2023 मध्ये वाचायला मिळेल.

आणि आता मोबाईल ,संगणक ,टॅब अश्या गोष्टींशिवाय आपला दिवस देखील जात नाही. या गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत असे म्हणता येईल. 

सर्वात प्रथम आपल्याला असा प्रश्न पडतो कि who can do digital marketing course ज्यांना टेकनॉलॉजिची आवड आहे, ज्यांना creative गोष्टी करायला आवडतात आणि ज्यांना research मध्ये देखील वेळ घालवायला आवडतो अश्या लोकांसाठी हे एक उत्तम क्षेत्र आहे असे म्हणायला हरकत नाही.best way to learn digital marketing विशेष म्हणजे हा कोर्से तुम्ही online आणि ऑफलाईन अश्या दोनीही माध्यमातून करू शकता.असंख्य अश्या career opportunities in digital marketing मध्ये उपलब्ध आहेत.

डिजिटल मार्केटिंगची गरज काय आहे ?

जेव्हा कोणताही व्यवसाय असतो,किंवा कंपनी असते,तेव्हा त्या कंपनीचे किंवा व्यवसायाचे काहीही उत्पादन असेल तर त्या वस्तूला लोकांपर्यंत योग्य तऱ्हेने पोहचवणे गरजेचे असते. आणि या ठिकाणी येते ते मार्केटिंग. 

Career In Digital Marketing In India | Marathi Blog 2021

तुम्हाला जर असा प्रश्न केला कि तुम्ही T.V. वरती जास्त वेळ घालवता कि मोबाईल वरती तर बऱ्याच लोकांचं उत्तर असे असेल कि मोबाइलला वरती . दिवसभरात आपण YouTube ,Instagram ,WhatsApp अश्या कितीतरी social नेटवर्किंग side वरती भेट देत असतो. आणि आपल्या नकळत आपण तिथे काही जाहिराती देखील बघत असतो. तर पूर्वी ज्या जाहिराती आपण  T.V. वरती किंवा वर्तमान-पत्रामध्ये बघायचो त्याच आता आपण या प्लॅटफॉर्म्स वरती बघायला लागलो असे का झाले? कारण लोकांचे या गोष्टी वापरण्याचे प्रमाण वाढले आणि व्यवसायानी त्यांचे मार्केटिंग प्लॅटफॉर्म बदलले. 

डिजिटल मार्केटिंगचे बरेच फायदे आहेत. म्हणूनच लोकं digital marketing job work from home India, marketing jobs for freshers, how to start digital marketing business in India, best companies for marketing job in India अश्या प्रकारचे प्रश्न search करत असतात.

करिअर चे पर्याय –

डिजिटल मार्केटिंगची सध्याची परिस्थिती पाहता ,तिची लोकप्रियता आणि भविष्यामध्ये असणाऱ्या या क्षेत्रामधील संधी लक्षात घेता हे खूप मोठे व्यापक आणि नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणारे असे क्षेत्र आहे ,आणि सध्याचे मार्केटिंग स्टेटस पहिले तर बऱ्याच संधी या क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत.आणि या संधीचा फायदा अनेक लोक घेताना देखील दिसत आहे. विविध माध्यमाद्वारे लोक या क्षेत्रामधील ज्ञान मिळवण्याचा प्रयन्त करताना दिसत आहे. career opportunities in digital marketing मध्ये भरपूर बघायला मिळतात.

तर या क्षेत्रांमध्ये तुम्ही फक्त नोकरीच करू शकता असे तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा इथे असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत कि ज्याच्या माध्यमामधून देखील तुम्ही तुमचे आर्थिक उत्पन्न वाढवू शकता. 

digital marketing job opportunities कोणती आहे याची यादी मी खाली दिलेली आहे. त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल.

YouTube

आता तुम्हाला असा प्रश्न पडणे सहाजीक आहे कि YouTube आणि डिजिटल मार्केटिंगचा काय संबंध आहे.

 

YouTube
Image Source – Pixabay

तर होय ,YouTube हा डिजिटल मार्केटिंग-चाच एक प्रकार आहे. दिवसभरातून कितीतरी वेळा आपण YouTube वरती भेट देत असतो. 

आणि आपल्याला हवे तसे video’s मग ते कॉमेडी education,cooking असे जे काही हवे ते पाहू शकतो. 

परंतु जे लोक हे विडिओ बनवतात ,ते देखील ज्या प्रकारचे आपले ऑडियन्स आहेत त्या प्रकारचे कन्टेन्ट तयार करणे विडिओ रेकॉर्ड करणे ,योग्य SEO चा वापर करून विडिओचे कन्टेन्ट तयार करणे ,त्यानंतर चांगला आवाज योग्य स्क्रीन या गोष्टी विचारामध्ये घेणे या सगळ्या डिजिटल मार्केटिंगशी संबंधित गोष्टी येतात. digital marketing jobs for freshers असे आपण search केले तर बरेच लोक youtube पासून देखील सुरुवात करताना तुम्हाला दिसतील.

तुम्हाला जर बोलायला विडिओ काढायला आवडत असेल तर YouTube हा एक चांगला option तुमच्या समोर उपलब्ध आहे. 

Blogging

how to start a career in marketing असा प्रश्न आपल्याला पडत असतो. त्यावेळी बरेच लोक ब्लॉगिंग च्या माध्यमातून त्यांच्या करिअर ला सुरुवात करतात. तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि तुमचे ज्ञान तुम्ही लोकांपर्यंत पोहचवू इच्छिता तर ब्लॉगिंग हा एक चांगला प्रकार आहे ,परंतु ब्लॉगिंग करताना तुम्हाला खूप पेशन्स असणे देखील तितकेच गरजेचे असते. तुम्ही ब्लॉगिंग वरती कोणत्याही प्रकारचे कन्टेन्ट नाही टाकू शकत तुम्हाला तुमचा निष ठरवून मग काम करावे लागते. ब्लॉगिंग म्हणजे काय याविषयाची माहित तुम्हाला What is Blog .यामध्ये वाचायला मिळेल.digital marketing तुम्हाला work from home म्हणून करायचे असेल तर ब्लॉगिंग हा एक चांगला पर्याय आहे.

Entrepreneur

तुम्ही जर या क्षेत्रामध्ये उत्तम काम केले तर तुम्ही तुमचे ज्ञान इतरांना देऊ शकता आणि त्याद्वारे पैसे कमवू शकता. तुम्ही तुमचे स्वतःचे इन्स्टिटयूट चालू करू शकता . तसेच इतर client देखील घेऊन काम करू शकता. एक उद्योजक म्हणून तुम्हाला बऱ्याच संधी इथे उपलब्ध होतात. 

नोकरीच्या संधी | Career In Digital Marketing In India –

बरं आता आपण बोलूयात नोकऱ्यांबद्दल . काही लोकांना नोकरी करण्यामध्ये आवड असते तर अश्या लोकांसाठी इथे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. 

Jobs Options
Image Source – Pixabay

तर ते कोणकोणते आपण पाहुयात. 

SEO EXPERT

यांचे काम व्यवसायदाराना किंवा एखाद्या client ला त्यांची वेबसाईट हि योग्य search result वरती दाखवली जाणे ,योग्य keywords चा उपयोग करून त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कन्टेन्ट योग्य लोकांपर्यंत पोहचवणे हे काम मुख्यता SEO EXPERT चे असते.

SEM EXPERT-

जेव्हा तुम्ही नवीन website तयार करता तेव्हा लगेच त्यावर ट्रॅफिक येणे possible नसते. अश्या वेळी पैसे लावून तुम्ही पहिल्या काही result मध्ये येऊ शकता.

campain run करून, टार्गेट audience ठरवून, ठराविक location टार्गेट करूनही तुम्ही add लावू शकता. आणि या सगळ्या गोष्टी निगडित असतात त्या Search Engine Marketing.

थोडक्यात पैसे लावून तुम्ही लोकांपर्यंत पोहचू शकता.

Social Media Marketing (SMM)

Social Media म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यसमोर येते ते फेसबुक इंस्टाग्राम ,व्हाट्सअप ,ट्विटर ,लिंकडीन,आणि अजून बऱ्याच social networking sites.

आपण यांचा वापर आपल्या मनोरंजनासाठी करतो.

पण तुम्हाला माहित आहे का, कि social media marketing खूप मोठे मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म बनले आहे.या प्लॅटफॉर्म्स चा वापर करून ग्राहकांपर्यंत आपले प्रॉडक्ट पोहचवले जाते .हे प्लॅटफॉर्म्स वापरात असताना आपल्याला बऱ्याचदा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दिसतात ,तर हे एक प्रकारचे मार्केटिंग प्लॅटफॉर्म्सच आहे. तर Social Media Marketing चे कामच हे असते कि या social प्लॅटफॉर्म्सचा उपयोग करून आपल्या client च्या व्यवसायाबद्दल  माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. 

Content marketer –

एक कन्टेन्ट writer म्हणून तुम्हाला कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य असते जसे कि तुम्ही तुमचे काम कॉफी शॉप मध्ये बसून करू शकता ,तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही कामाला सुरुवात करू शकता परंतु नोकरी ही नेहमीच सोपी नसते आणि केवळ एक उत्तम लेखक असण्याव्यतिरिक्त आपल्याला यशस्वी होणे देखील तितकेच गरजेचे आहे आणि त्यासाठी काही कौशल्य एक कन्टेन्ट  writer म्हणून तुमच्याकडे असणेही गरजेचे आहे . तरच आपल्याला लवकर यश मिळू शकेल. 

कन्टेन्ट मार्केटर चे कामाचं हे असते कि जास्तीत जास्त चांगले कन्टेन्ट तयार करून आपल्या कस्टमर ला आपल्या वस्तूंकडे आकर्षित करणे. मग त्यामध्ये चांगल्या प्रकारचे कन्टेन्ट तयार करणे,त्याचे प्लांनिंग करणे,आणि योग्य वेळात ते लोकांपर्यंत पोहचवणे हे देखील तितकेच गरजेचे असते. 

 कन्टेन्ट मार्केटिंग हा एक चांगला पर्याय ठरू शकतो त्या लोकांसाठी ज्यांना लिखाणाची आवड आहे,परंतु त्याचसोबत hard work आणि  dedication या गोष्टी देखील तितक्याच इथे महत्वाच्या ठरतात. आणि याचसोबत महत्वाचे असते तुमच्या अंगी काही कौश्यल्य असणे,जसे कि SEO चे चांगले ज्ञान तुम्हाला असायला हवे,तुम्हाला चांगल्या प्रकारे research करता यायला हवा,तसेच लिखाणापेक्षा त्याच्या एडिटिंग वरती तुम्हाला बराच वेळ घालवावा लागत असेल तर त्यात काही नवीन गोष्ट नाहीये ,इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो जसे कि व्याकरण, शब्दलेखन आणि विरामचिन्हे या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या असतात. 

E-mail and SMS marketing –

या दोनही प्लॅटफॉर्म्स चा असा फायदा असतो कि आपण एकाच वेळी हजारो लोकांना इमेल्स किंवा sms पाठवू शकतो मग ते bulk द्वारे असेल ,किंवा इतर काही स्ट्रॅटिजिचा वापर करून असेल ,आता या दोन्हींमध्ये असा फरक आहे कि SMS messaging द्वारे जेव्हा आपण मार्केटिंग करतो तेव्हा तिथे आपल्याला काही लिमिटेशन्स अश्या येतात कि १६० अक्षरांचाच आपण तिथे उपयोग करू शकतो. त्याच्या अगदी विरोधी इमेल्स द्वारे आपल्यावर फारशी मर्यादा येत नाही आपण तिथे image वापरू शकतो,मोठे message पाठवू शकतो , वेगवेगळे फॉण्ड्स चा उपयोग करू शकतो. अश्या गोष्टी तिथे आपण वापरू शकतो. 

Email and SMS career options
Image Source – Pixabay

तर इथे मार्केटर चे असे काम येते कि चांगल्या प्रकारचे असे E-mail and SMS तयार करून ते लोकांना पाठवणे , वेगवेगळ्या ऑफर्स ,किंवा अपडेट्स ,  प्रॉडक्ट्स् मध्ये काही बदल झाले तर ते लोकांपर्यंत पोहोचवणे. 

Web Analytics –

वेब Analyst चे मुख्य काम असे असते कि वेबसाइट डेटाचे Collection, Reporting, आणि  Analysis करणे . या गोष्टी करून आपण आपल्या clients च्या पेर्फोमन्स मध्ये फरक घडवून आणू शकतो. आपल्याला आपल्या प्रतिस्पर्धकाची सगळ्या माहितीचे म्हणजे त्यांचे Demographics ,Gender ,like ,dislike ,location या सगळ्यांचे वेब analysis करू शकतो. आणि कोणत्या स्टॅटिजि आपण वापरायला हव्यात किती फायदा यामुळे होईल या सगळ्या गोष्टींची माहित web analyst त्यांच्या clients ला देतात. आणि त्यानुसार आपल्या कार्य पद्धतीमध्ये सुधारणा करतात.

Growth Hacker –

ग्रोथ हॅकर चे काम मुख्यतः बेस्ट स्ट्रॅटिजि आपल्या व्यवसायासाठी शोधून काढणे हे असते. 

जास्तीत जास्त कस्टमर मिळवून कमीत कमी खर्चामध्ये त्यांना टिकवून ठेवण्याचे काम ग्रोथ हॅकर ला करावे लागते. 

ग्रोथ हॅकर ला ग्रोथ मार्केटर देखील म्हंटले जाते परंतु ग्रोथ हॅकर फक्त मार्केटर नसतात तर ते पूर्णपणे व्यवसाय वाढविण्याच्या संबंधित धोरणांवरती लक्ष्य केंद्रित करतात. जास्तीत जास्त ग्राहकांना कमीत कमी खर्चामध्ये आपल्याकडे टिकवून ठेवणे हे काम मुख्यातः त्यांचे असते. 

ते सतत एक्सपिरिमेंट करत असतात वेगवेगळ्या मार्केटिंग आणि प्रॉडक्ट डेव्हलोपिंग टेकनिक वापरून ज्याच्यामधून  लगेच result मिळेल अश्या टेकनिक वापरणे ते प्रेफर करतात. 

तुम्हाला जर अश्या गोष्टींशी आवड असेल तर हा एक चांगला पर्याय जॉब साठी ठरू शकतो परंतु कमीत कमी तुमचे graduation तरी यासाठी पूर्ण असावे लागते. आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामधील updating गोष्टींसंदर्भात माहित ठेवणे देखील आवश्यक असते. 

Online Reputation –

Online Reputation याला e-reputation असे देखील म्हंटले जाते. 

हल्ली याचे खूप जास्त महत्व वाढलेले दिसत आहे ,कारण बऱ्याच गोष्टी जश्या डिजिटल व्हायला लागल्या आहेत जश्या या क्षेत्रामधील स्पर्धा देखील वाढलेली दिसून येते. 

आता प्रश्न असा पडतो कि ऑनलाइन रेप्युटेशन म्हणजे नक्की काय ?

ऑनलाईन प्रतिष्ठा किंवा  e-reputation  ही  कोणतीही कंपनी ,व्यक्ती ,उत्पादन ,किंवा सेवा यांची इंटरनेट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वरची सेवा असते. 

तर हे  Online Reputation कसे तयार होते. हे तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या reviews वरून त्या कंपनीची किंवा व्यवसायाचे रेप्युटेशन ठरत असते. हे कोणत्याही व्यवसायामधील सर्वात जास्त पॉवरफुल assets असतात. 

पॉसिटीव्ह online reputation हे कोणत्याही व्यवसायासाठी किंवा business growth साठी अत्यंत महत्वाची गोष्ट मानली जाते.

कारण तुमच्या व्यवसायाचे reputation चांगले असेल तर लोक तुमच्या ब्रँड ला प्रेफर करतात. 

त्यामुळे नक्कीच तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. 

मार्केट मध्ये तुमचे चांगले नाव होते. आणि तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते. 

आणि या सगळ्या गोष्टींमुळेच या क्षेत्रामधील नोकरीच्या संधी देखील वाढलेल्या दिसून येतात. 

डिजिटल क्षेत्रांमध्ये नोकरी करण्याचे फायदे | Career In Digital Marketing In India –

डिजिटल क्षेत्रांमध्ये नोकरी करण्याचे फायदे-

१. तुमच्या मध्ये जर शिकण्याची तयारी असेल तर डिजिटल मार्केटिंग हे असे क्षेत्र आहे कि इथे तुम्ही स्वतः शिकून देखील कामाला सुरुवात करू शकतात. 

२. जर तुम्हाला तुमचे करिअर switch करायचे असेल तर तुम्ही बऱ्याच वेळेला विचारामध्ये पडता ,कारण पुन्हा नवीन फील्ड मध्ये पडून त्यामधील स्किल शिकून पुढे जायला बराच कालावधी जातो. परंतु डिजिटल मार्केटिंग हे असे क्षेत्र आहे जिथे कमी कालावधीत तुम्ही गोष्टी शिकून कामाला सुरुवात करू शकता. 

३. हे क्षेत्र इतके झपाट्याने वाढत आहे , कारण प्रत्येक व्यवसाय हा डिजिटल मार्केटिंगशी संबंधित कुठे ना कुठे असताना दिसत आहे. त्यामुळे बऱ्याच संधी  इथे उपलब्ध होणार आहे. आणि काही वर्षांनी याचे महत्व अतोनात वाढलेले दिसून येईल. 

४. या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, तुमच्या मध्ये जर कोणते कौश्यल्य असेल तर तुम्ही नक्कीच या क्षेत्रामध्ये उतरू शकता. 

५. डिजिटल मार्केटिंग हे फील्ड पूर्णपणे creativity वरती अवलंबून आहे. 

बरेचसे जॉब्ज देखील तिथे creativity वरती अवलंबून आहेत,जसे कि writing , designing , Audio And Video  Production , आणि अजून बरेचसे. 

तुम्ही नोकरी करताना देखील creativite पद्धतीने जर एखाद्या प्रॉब्लेम चे सोल्युशन्स काढणे अपेक्षित असते. 

६. हे एकमेव असे क्षेत्र असावे इथे अत्यंत कमी वेळात तुम्ही या क्षेत्रामधील गोष्टी शिकू शकता , आणि अत्यंत चांगला भाग असा म्हणता येईल कि तुमच्या सोईनुसार आणि वेळेनुसार तुम्ही काम करू शकता. तुम्ही ऑनलाईन classes जॉईन करून एखादा ब्लॉग किंवा वेबपेज तयार करून कामाला सुरुवात करू शकता. 

डिजिटल क्षेत्रांमध्ये नोकरी करण्याचे तोटे | Career In Digital Marketing In India –

डिजिटल मार्केटिंग हे टेक्नॉलॉजीशी संबंधित असे क्षेत्र आहे. 

त्यामुळे इथे रोज नवीन बदल होणे साहजिक आहे कारण टेक्नॉलॉजी कधीही स्थिर नसते त्यामध्ये सतत नवीन बदल होत असतात अगदी रोज म्हणले तरी. 

तुम्हाला इथे तितकेच updating असणे गरजेचे असते. आणि तुम्ही थोडे फार जरी इथे दुर्लक्ष्य केले तरी स्पर्धेमधून तुम्ही केव्हाही बाहेर पडू शकता. त्यासाठी बदलत्या ट्रेडिंग नुसार आपल्याला देखील आपल्या पद्धतीमध्ये बदल करावे लागतात. 

या क्षेत्रांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे.

आणि त्यामुळेच प्रचंड मेहनत करण्याशिवाय इथेही पर्याय नाही. 

वेगवेगळे टूल्स ,आपल्या प्रतिस्पर्धकांबद्दल तितकीच माहित ,सतत नवीन येणारे अपडेट्स ,या सगळ्यांचे ज्ञान असणे देखील तितकेच गरजेचे असते. 

वेगवेगळया स्ट्रॅटिजि वापरून आपण मार्केट मध्ये कसे जास्तीत जास्त नाव कमवू  शकू याचा नेहमीच creative पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागतो. 

निष्कर्ष
Career In Digital Marketing In India | Marathi Blog 2021 हा ब्लॉग वाचून मध्ये डिजिटल मार्केटिंग मध्ये असणारे करिअर चे किती तरी पर्याय तुम्हाला उपलब्ध असलेले दिसतील. ट्रॅडिशनल पर्यायांचा उपयोग करण्यापेक्षा ज्यामधून आपण उत्तम प्रकारचे करिअर बनवू शकूअसे पर्याय शोधणे खूप गरजेचे आहे. आणि त्यामधील एक पर्याय म्हणजे डिजिटल मार्केटिंग. हा ब्लॉग वाचून तुम्हाला नक्कीच तुमच्या करिअर साठी एक पर्याय मिळेल. ज्याच्या आधारे तुम्ही तुमचे करिअर उत्तम प्रकारे तयार शकता.

तुम्ही तुमचं मत आणि सल्ले मला नक्कीच खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मला पुढील पत्त्यावर मेल हि करू शकता digitalharshu@gmail.com

1 thought on “How to Start Career In Digital Marketing In India [Update 2023]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!