what is a digital marketing

Digital Marketing meaning in marathi 2023 | History, Definition, Types And Skills | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

Digital marketing meaning in marathi

DIGITAL MARKETING meaning in marathi
DIGITAL MARKETING meaning in marathi

What is a digital marketing/ digital marketing meaning in marathi हे आपण बऱ्याचदा google वरती Search करतो. बरीच उत्तरे ही येतात पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत नाही.

आपल्या रोजच्या जीवनामध्ये देखील आपण ऐकत असतो कि सगळं जग हे digitalize झाले आहे…

आपण डिजिटल युगामध्ये प्रवेश केला आहे…

तर हा जो digital शब्द म्हणजे नक्की काय आहे?

आणि तो मार्केटिंगशी कश्या पद्धतीने जोडला गेलेला आहे, ते आपण पाहुयात.

का लोकांचा आजकाल smartphone चा वापर वाढलेला दिसतो?

रोजच्या जीवनातल्या कितीतरी गोष्टी आपण online करायला लागलो आहे.

उदाहरणच द्यायचं झालं तर हल्ली लोक grocery, shopping ,food या गोष्टी online मागवणे prefer करायला लागले आहे.

ही सगळी उदाहरणे ,आपण digital जगामध्ये राहत असल्याची आहे, म्हणजेच आपण इथे online marketing च्या आधारानेच या सगळ्या गोष्टी करत आहोत.

Image source: Pixabay

History of digital marketing (Digital Marketing in marathi) | डिजिटल मार्केटिंगची इतिहास

तसे बघायला गेले तर डिजिटल मार्केटिंग हा शब्द अगदीच हल्ली म्हणजे २००० च्या आसपास लोकप्रिय व्हायला लागला.

पण प्रत्यक्षात डिजिटल मार्केटिंगचा इतिहास हा खूप जुना आहे असे म्हणावे लागेल.

का ? ते सांगते,

आपण कल्पना देखील करू नाही, पण सुमारे १०० वर्षांपूर्वी डिजिटल मार्केटिंग जन्माला आले आहे.

इतिहासामधील प्रथम डिजिटल मार्केटरचे एक चित्र येथे आहे:

Image source: Wikipedia

नाव – Guglielmo Marconi.

27 जुलै 1896 रोजी,दोन पोस्ट ऑफिस इमारती दरम्यान सिग्नल पाठवून मार्कोनीने आपली वायरलेस तार प्रणाली“public transmission of wireless signals.” यशस्वीरित्या दर्शविली.

वायरलेस सिग्नल्सचे सार्वजनिक ट्रान्समिशन” प्रदर्शित करणारा तो पहिला मनुष्य होता.

या मुलाने रेडिओचा शोध लावला.

आणि इथूनच डिजिटल मार्केटींग स्ट्रॅटेजीचा जन्म झाला.

What a digital marketing? | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

डिजिटल माध्यमातून केलं जाणारे मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग. किंवा ज्या ज्या devise ला internet ने कनेक्ट केले आहे आणि त्या इंटरनेटच्या माध्यमातून केले जाणारे मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग.

Types of digital marketing । डिजिटल मार्केटिंग चे ७ प्रकार

1 Search Engine Optimization (SEO) –

आपण जेव्हा कोणत्याही search engine मध्ये काही सर्च करतो तेव्हा काही result आपल्या समोर येतात.

कधी विचार केला आहे का कि हेच result आपल्या समोर का येतात?

image source: Google

तर या नंबर एक page वर येऊन पहिल्या काही result मध्ये येण्यासाठी SEO चा वापर केला जातो. त्यामध्ये relevant keyword, Backlink quality आणि बऱ्याच गोष्टी मॅटर करतात.

2 Social Media Marketing (SMM)

Social Media म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यसमोर येते ते फेसबुक इंस्टाग्राम ,व्हाट्सअप ,ट्विटर ,लिंकडीन,आणि अजून बऱ्याच social networkin sites.
आपण यांचा वापर आपल्या मनोरंजनासाठी करतो.

पण तुम्हाला माहित आहे का, कि social media marketing चे खूप मोठे मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म बनले आहे.

होय.

उदाहरण : आपण फेसबुक हा प्लॅटफॉर्म घेऊयात, जेव्हा आपण फेसबुक चालू करतो तेव्हा आपल्याला काही post या sponsored या नावाने दिसतील,तर हा मार्केटिंग चाच एक प्रकार आहे.

Image source : facebook

आणि अश्याच प्रकारे youtube वरती vedio पाहताना adds येतात,एखादा ब्लॉग वाचत असताना आपल्याला काही adds दिसतात.

तर यालाच Social Media marketing असे म्हणतात.

Social Media प्लॅटफॉर्मस चा वापर करून जे मार्केटिंग केले जाते त्याला social media marketing असे म्हणता येईल.

3 Content Marketing

कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजेच एखाद्या विषयाबद्दल महत्वपूर्ण माहिती देऊन त्या माहितीच्या आधारे अप्रत्यक्षरीत्या आपल्या प्रॉडक्ट किंवा service चे महत्व लोकांना पटवून देणे असे असते.

online marketing मध्ये ते एखाद्या ब्लॉग, विडिओ, इमेज द्वारे केले जाऊ शकते.

उदाहरण : जर समजा एखाद्या टूथपेस्टचे कन्टेन्ट मार्केटिंग करताना आपल्याला असे दाखवता येईल,कि आपल्या दातांची काळजी कश्या प्रकारे घ्यायला हवी, या विषयावरून आपण एक ब्लॉग, विडिओ किंवा इमेज द्वारे हि माहिती देऊ शकतो ज्यात अप्रत्यक्षपणे आपण आपल्या प्रॉडक्ट ची माहिती आणि महत्व ही पटवून देऊ शकतो.

जसे कि वरील उदाहरणात आपण त्या ब्लॉग मध्ये असा एक मुद्दा मांडू शकतो कि दातांची काळजी घेतांना आपण दिवसातून दोनदा ब्रश करणे गरजेचं आहे. या प्रकारे त्या प्रॉडक्ट चे महत्व लोकांना पटवून देता येते.

4 Search Engine Marketing (SEM)

जेव्हा सर्च इंजिन मध्ये आपण काही सर्च करतो तेव्हा येणाऱ्या result मध्ये तुम्हाला अगदी पहिल्या ३/४ result च्या इथे Add असे लिहिलेले दिसेल.

तर ते का असते?

Image source : Google

जेव्हा तुम्ही नवीन website तयार करता तेव्हा लगेच त्यावर ट्रॅफिक येणे possible नसते. अश्या वेळी पैसे लावून तुम्ही पहिल्या काही result मध्ये येऊ शकता.

campain run करून, टार्गेट audience ठरवून, ठराविक location टार्गेट करूनही तुम्ही add लावू शकता. आणि या सगळ्या गोष्टी निगडित असतात त्या Search Engine Marketing.

थोडक्यात पैसे लावून तुम्ही लोकांपर्यंत पोहचू शकता.

5 Pay-Per-Click Advertising (PPC)

PPC म्हणजे pay per click ,किंवा याला CPCअसेही म्हटले जाते , म्हणजे cost per click या दोनही शब्दांचा अर्थ सारखाच आहे.

याचा अर्थ असा आहे कि advertiser प्रत्येक क्लिक वरती pay करतो. यालाच PPC / CPCअसे म्हणतात.

डिजिटल मार्केटिंग मध्ये PPC ,Directly indirectly ,Indirectly खूप महत्वाचे काम करते.

SEM , SMM , Display ads , Affiliate Marketing या Technik मध्ये PPC चा खूप जास्त उपयोग होतो.

6 Affiliate Marketing

Affiliate Marketing म्हणजे इतर लोकांच्या किंवा कंपनीच्या प्रॉडक्ट ची जाहिरात करून,कमीशन मिळवणे.

आपण बऱ्याचदा विडिओ बघताना आपल्या याची लिंक description मध्ये मिळेल असेआपण ऐकतो.त्या लिंक वरती क्लिक करून जर ती वस्तू आपण घेतली तर ऍड करणाऱ्या व्यक्ती ला त्याचे कमीशन मिळते.

या process ला Affiliate Marketing असे म्हणतात.

Amazon Affiliate Marketing चा जास्त वापर केला जातो.

7 Email Marketing

ई-मेल मार्केटिंग हा मार्केटिंगचा खूप effective असा प्रकार मानला जातो.

तुमच्या ग्राहकाला तुम्ही ईमेलचा वापर करून डायरेक्ट मार्केटिंग करू शकता.

आपल्या ग्राहकांना आपल्या नवीननवीन वस्तू किंवा ऑफरबद्दल माहिती देण्यात हि मदत करू शकता.

आपल्या ब्रांडबद्दल लोकांना सांगण्यामध्ये मध्ये किंवा खरेदी दरम्यान व्यस्त ठेवण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकता.

Image source : Google

Digital Marketing करताना हे Skills असणे गरजेचे आहे.

skill of digital marketing
Image source : Pixabay

१. Marketing Skill –  Digital Marketing ची व्याख्या काय आहे, Inbound Marketing, Outbound Marketing इतक्या detail मध्ये माहिती नसली तरी काही हरकत नाही पण जी काही बेसिक माहिती जसे की आपले product हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसे जायला हवे. त्यासाठी लागणारी टार्गेट ऑडियन्स कशी असायला हवी याची माहिती असणे गरजेचे आहे.

. Sales Marketing – आपले product कसे विकले जाईल,आपल्या बोलण्यातून लोक त्याकडे कसे Attract होतील,इतरांपेक्षा त्यामध्ये काय खास आहे कि जास्तीत जास्त लोक ते घ्यायला तयार होतील. या सगळ्या गोष्टी sales चाच भाग आहेत.

. Design sense – एखाद्या वेबसाईट वरती लावले गेलेले फोटो,विडिओ,जर तितकेसे attractive नसतील,कलर बद्दल सेन्स नसेल तर एका चांगल्या digital marketer ला UI /UX  चे knowledge असणे गरचेजे आहे.

. Basic Tool  – Photo editing साठी Photoshop vedio editing साठी vedio editor, content साठी copywriting या बेसिक गोष्टींचे तरी knowledge असणे गरजेचे आहे.

. Creator Skill – डिजिटल मार्केटिंग हे क्षेत्र पूर्णपणे creativity वरती अवलंबून आहे. आपल्या स्पर्धकापेक्षा आपण जास्तीत जास्त चांगले काम करून टिकणे,सतत वेगवेगळ्या गोष्टींवर काम करत राहणे,आणि creativity आपल्या कामामधून मांडणे गरजेच असते.

6 thoughts on “Digital Marketing meaning in marathi 2023 | History, Definition, Types And Skills | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!