what is a blog

Blog meaning in Marathi | ब्लॉग म्हणजे काय? (Update 2023)

What is a blogging in Marathi/ blog meaning in marathi | ब्लॉग म्हणजे काय? हे जर समजायचं झालं तर,

आठवतंय का पूर्वी काही अडचण आली,
काय करायचं ते समजत नसेल
किंवा अगदी कोणाचं काही दुखलं, कोणाला काही त्रास होत असेल तर,
मोठी माणस आपल्या सोबत सावली सारखी असायची.
आजी आपल्याला घरगुती उपाय द्यायची…

पण आता जग बद्दल आहे,
कामधंदयासाठी एकत्र कुटुंब पद्धती वेगळी झाली तसेच शिक्षण, नोकरी आणि आणि अश्या अनेक कारणांसाठी माणसं विखुरली गेली आहेत.

आणि अश्यात आपल्याला कमतरता जाणवते, ती अनुभवी माणसांची,
त्यांच्या सल्ल्यांची, विविध उपायांची आणि त्यांच्या दृष्टीकोनाची…

आणि हीच आपली कमतरता भागवते ती आपल्या पिढीची आज्जी, म्हणजेच इंटरनेट…

आपण इथे काही विचारलं आणि त्याच पटकन असं उत्तर येत ना, ते म्हणजेच ब्लॉग…

अश्या करोडो ब्लॉग्स ने भरलेलं आहे हे इंटरनेट च झाळ…

तर चला या ब्लॉग मध्ये, बघुयात अश्या अनेक आश्चर्यजनक प्रश्नांची उत्तरे

जसे कि,

blog writing meaning in marathi? ब्लॉग म्हणजे काय ?
What Is Blog Post | ब्लॉग पोस्ट म्हणजे काय?
लोक त्याचा हल्ली एवढा वापर का करायला लागले आहेत?
त्याचे फायदे काय आहेत ?
त्यामधून पैसे कसे कमावले जाऊ शकतात ?
आणि बरंच काही …

blog writing meaning in marathi। ब्लॉग म्हणजे काय?

सोप्या शब्दामध्ये ब्लॉग म्हणजे काय किंवा blog writing meaning in marathi हे सांगायचं झालं तर..

अगदी काही वर्षांपूर्वी लेखक आणि तज्ञ् वेगवेगळ्या विषयांची माहिती, सल्ले, आणि लेख हे वर्तमानपत्र, पुस्तिका किंवा मासिकांमध्ये  मध्ये लिहित असत आणि मग ते वाचकांपर्यंत  पोहचत असे.

पण आज अश्याच  प्रकारची माहिती लेखक आणि तज्ञ् INTERNET च्या माध्यमातून वाचकांपर्यन्त पोहचवतात आणि ह्यालाच सरळ सोप्या भाषेत आपण ब्लॉग असं नाव देऊ शकतो. 

यावरून Meaning of blog in Marathi | ब्लॉग चा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे लक्षात आले असेल.

उदारणार्थ – आपण सर्च इंजिन मध्ये काहीही सर्च केलं तर जे result येतात ते म्हणजे ब्लॉगच असतात.

what is blog
What is blog
blog meaning in marathi

ब्लॉग च्या सोबत अजून आपण दोन शब्द सतत ऐकत असतो, ते म्हणजे blogger आणि blogging यांचा नेमका अर्थ आहे तरी काय ?  ते आपण आता पाहुयात.

BLOGGER म्हणजे काय?

जो व्यक्ती ब्लॉग लिहितो त्याला Blogger असे म्हणतात.

BLOGGING म्हणजे काय?

आपल्याकडे असलेले knowledge ,experience ,ideas ,solutions यांना वाचकांसमोर blog च्या माध्यमातून मांडणे म्हणजे Blogging करणे होय.

Origin of Blog । ब्लॉगचा उगम

१७ डिसेंबर १९९७ रोजी Jorn Barger यांनी  web blog हा शब्द प्रथम वापरला.

 John barger
Image source : Wikipedia

त्यानंतर Blog हा छोटासा शब्द Peter Merholz यांनी peterme.com या त्यांच्या ब्लॉग मध्ये वापरला आणि तो जगभर लोकप्रिय झाला.

Peter Merholz
Peter Merholz

यावरून आपल्याला समजलेच असेल कि ब्लॉग आणि वेबब्लॉग हे वेगळे नसून, ब्लॉग हा वेबब्लॉगचेच एक संक्षिप्त रूप आहे. म्हणजे त्या दोनही शब्दांचा अर्थ एकच आहे.

Blogging फक्त लिहिण्याचे नाही तर पैसे कमविण्याचे पण साधन आहे.

आता ते कसे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ?

तर.. इथे मी तुम्हाला भारतामधील काही टॉप च्या ब्लॉगर ची नावे  देत आहे त्यावरून तुम्हाला काहीसा अंदाज येईल कि हे लोक blogging मधून किती पैसे कमवतात .

what is mean blog in marathi
Top Indian Blogger

Blogging हा त्यांचा व्यवसाय आहे.

ब्लॉगिंग तो प्रत्येक व्यक्ती करू शकतो , ज्याला लिहिण्याची आवड आहे. ब्लॉगिंग साठी खूप खर्च येतो अशीही  गोष्ट नाही.

तर ब्लॉगिंगसाठी  लागते तरी  काय काय ?

फारस असं काहीच नाही.

तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असायला हवे आणि चांगले Internet connection असेल तर तुम्हीही ब्लॉगिंग सुरु करू शकता.

काही फ्री platforms आहे जिथे तुम्ही फ्री मध्ये account सुरु करू शकता.

उदाहरण : Blogger.com, Medium, Silver Stripe, Wix , Joomla आणि अजूनही अशी बरीच आहे.

ब्लॉगिंग हि अशी गोष्ट आहे जी तुम्ही जगामधील कुठल्याही जागेवरून, तुम्ही तुमचे काम करू शकता ,ऑफिस मध्ये कामाच्या

जश्या deadline असतात तश्या इथे येण्याची गरज नसते ,कारण  तुम्हीच स्वतःचे मालक असता. तुम्हाला कामाचे पूर्णपणे 

स्वातंत्र्य असते, आणि यासाठी खूप मोठे भांडवल लागते अश्यातली ही गोष्ट नाही.

What Is a Blog Post in Marathi | ब्लॉग पोस्ट म्हणजे काय?

एखाद्या ब्लॉग मध्ये Image ,Video ,Graphics ,किंवा Text च्या स्वरूपामध्ये जे content लिहिले जाते त्याला Blog Post किंवा Blog Article असे म्हटले जाते. 

तुमच्या पहिल्या blog post वरून लोकांना याची Idea येते कि हा ब्लॉग कश्या संदर्भात असणार आहे. 

Blog post लिहीताना घ्यावयाची काळजी.

कोणतेही Article लिहिताना जे खूप कमी लोकांनी लिहिले आहे ते निवडा . 

Keyword research चांगल्या प्रकारे करा. 

इतर जे similar ब्लॉग्स असतील ते वाचा,त्या ब्लॉग्स मध्ये जी माहिती नाहीये ती देण्याचा प्रयन्त  करा. 

सोप्या आणि सहज भाषेमध्ये लोकांना समजेल अश्या प्रकारे तुमच्या लिखाणाची पद्धत  निवडा.

ब्लॉग वर regular पोस्ट टाकणेही तितकेच गरजेचे आहे, consistency महत्वाची. 

ब्लॉगिंग च्या २ प्रकाराबद्दल आपण बोलूयात | Blog meaning in Marathi

personal blog meaning in marathi –

याला Hobby blogging असेही म्हणतात,

पैसे कमावणे हा personal ब्लॉगिंग चा मुख्य उद्देश नसतो.

ज्या कोणाला लिहिण्याची आवड आहे अशी व्यक्ती आपले अनुभव, तिच्या रोजच्या जीवनातल्या घडामोडी  ब्लॉगिंग च्या स्वरूपामध्ये मांडते.

काही गोष्टी या वैयक्तिक असू शकतात तर काही काल्पनिक देखील.

Professional blogging –

Professional blogging मध्ये ब्लॉगिंगलाच आपले profession समजतात. यामध्ये वेगवेगळ्या strategy ,वेळ,आणि त्या

ठरावीक विषयाबद्दल  माहिती मिळवून ब्लॉगिंग केले जाते.

पैसे कमवणे हा उद्देश इथे असतोच पण वेगवेगळी माध्यमे त्यासाठी वापरली जातात.

जसे कि Affiliate Marketing, Google Ad Sense, Advertising ,Membership ,Website ,E-book , Donation इत्यादी.

एक professional Blogger हा Personal Blogger पेक्षा खूप वेगळा असतो.

पण जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता.

पण त्यासाठी  तुम्हाला खूप मेहनत, पेशन्स आणि चांगल्या planning ची गरज असते.

तुम्हाला माहिती आहे का ब्लॉग ला Digital Diary असेही म्हणले जाते.

तसेच Website च्या तुलनेत ब्लॉग छोटे असल्याने update करणे सोपे असते. 

आणि ब्लॉग एका वेळेपुरते मर्यादित नसून Blog regular update करावे लागतात. 

एक वाचक म्हणून ब्लॉग मध्ये recent बदल कधी झाले आहे हे तुम्ही पाहू शकता. 

तसेच ब्लॉग मध्ये recent Upload केलेल्या post या सर्वात वरती दिसतात. 

उदाहरण.. तुम्ही जर १,२, आणि ३, तारखेला post Upload केली,तर सर्वात आधी तुम्हाला ३ तारखेची पोस्ट दिसेल त्यांनतर २ आणि मग १ तारखेची. 

ब्लॉगिंग कोणकोणत्या विषयावर करू शकता? | Blog meaning in Marathi

आपली त्या विषयाबद्दल ची आवड आणि knowledge यांचा विचार करून तुम्ही ब्लॉग लिहू शकता. म्हणजेच blog writing (in marathi) करू शकता.

ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायचा याची यादी खूप मोठी आहे, उदाहरणच दयायच झालं तर

Food Blog ,

travel Blog ,

Music Blog

Lifestyle Blog

Fashion Blog ,

Parenting Blog ,

Political Blog ,

Finance Blog ,

Gaming  Blog ,

Car Blog ,

Movie Blog

News  Blog ,

Fitness Blog इत्यादी 

तर इथे तुम्हाला असा प्रश्न पडणे सहाजिक आहे कि लोक ब्लॉगिंग का करतात ?

प्रत्येक ब्लॉगिंग करणारा माणूस हा स्वतःच्या काही गोष्टी ठरवून ब्लॉगिंग करत असतो.

ब्लॉगिंग च्या माध्यमातून तो आपल्या कल्पना ,आपले सल्ले किंवा त्याला त्या विषयामध्ये असणारी माहिती , knowledge तो इतर लोकांसोबत share करत असतो.

मोठ्या कंपनी किंवा ब्रँड आपल्या Business चे ब्लॉग तयार करतात.

ब्लॉगिंग हा बऱ्याच Business मध्ये online Marketing Strategy चा एक अतिशय महत्वाचा भाग आहे.
त्याद्वारे ते आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स वेगवेगळ्या Varirty, seasonable offers अश्या बातम्या पोहचवत असतात.

ब्लॉगिंग करण्याचे काही फायदे | Blog meaning in Marathi-

Business त्यांच्या potential customers आणण्यासाठी ब्लॉगिंगचा उपयोग करतात.

बरेच ब्लॉगर्स कमाई करण्याच्या विविध पद्धती वापरुन त्यांच्या ब्लॉगवरुन पैसे कमवतात

आपले विचार आणि कल्पना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉगिंग एक चांगले प्लॅटफॉर्म आहे.

तुमच्याकडे असणारे skills, creativity, आणि talents दाखवण्याचे एक माध्यम उपलब्ध करून देते.

Difference between Blog and Website 

Blog हा website चा हिस्सा असू शकतो, पण Website blog चा नव्हे. 

Website ला static Side असेही म्हंटले जाते. कारण Website तोपर्यंत बदलण्याची गरज नसते, जोपर्यंत त्यावरील माहिती हि

जुनी होत नाही, किवा त्यावरील माहिती हि चुकली असेल.

ब्लॉग च्या तुलनेत website हा मोठा प्रकार येत असल्याने,

त्याला प्रत्येक वेळी Update करणे शक्य नसते, आणि तशी गरजही नसते. 

खालील उदाहरणावरून वरून तुम्हाला लक्षात येईल

Myntra हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. खूप मोठा ब्रँड आहे.

आता तुम्ही जर blog.myntra.com असे टाकले तर तुम्हाला त्यांच्या blog चा Result मिळेल.
जसे कि असा.

myntra blog
blog.myntra.com

पण तुम्ही जर myntra.com असे टाकले तर तुम्हाला त्यांच्या website चा मिळेल.

myntra.com

असे का बरे?

कधी विचार केलाआहे.

ब्रॅण्ड तर एकच आहे मग त्यांनी दोन वेगळ्या गोष्टी का तयार केल्या आहेत.

तर याचे उत्तर तुम्हाला मी वरती दिलेलेच आहे.

तर मग जास्त चांगलं काय आहे ? blog की website

असा विचार आपल्या डोक्यात येतोच.

पण अगदी खरे सांगायचे झाले तर या प्रश्नाचे उत्तर तुमचे ती गोष्ट करण्यामागचे ध्येय काय आहे यावर अवलंबून आहे

जगभरातील बर्‍याच लहान व्यवसायांमध्ये पारंपारिक वेबसाइट्स असतात ज्यात फक्त pages असतात आणि ब्लॉग नसतो.अशा छोट्या वेबसाइट्स बर्‍याचदा फक्त त्यांच्या Business बद्दल माहिती देण्यसाठी बनवल्या जातात.

पण दुसरीकडे बऱ्याच Business ला ही गोष्ट Realise झाली आहे कि ब्लॉग मध्ये हि किती जास्त potential आहे आणि त्यामुळेच ते आपल्या website मध्ये ब्लॉग नावाचा एक वेगळा section तयार करतात. आणि त्यामुळे त्यांचा website वरती जास्त लोक visit करतात.

निष्कर्ष –

ब्लॉगिंग ने जगभरात मानवी माहितीच्या देवाणघेवाण चे स्वरूप बदलून टाकले आहे.
ह्या जाळ्यात आपण एक एक माहिती घेणारा किंवा देणारा अश्या पद्धतीने याचा अविभाज्य भागच असतो,
म्हणून याची पूर्ण माहिती आपल्याला असणे गरजेचे असते.
मला आशा आहे कि आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे तसेच बरीच नवीन माहिती या ब्लॉग च्या आधारे इथे भेटलीच असेल.

तुम्ही तुमचं मत आणि सल्ले मला नक्कीच खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मला पुढील पत्त्यावर मेल हि करू शकता digitalharshu@gmail.com

8 thoughts on “Blog meaning in Marathi | ब्लॉग म्हणजे काय? (Update 2023)”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!