what is content writer

कन्टेन्ट रायटिंग म्हणजे काय? । Content Writing in marathi [Update 2023]

एक उत्तम content writer म्हणून जर तुम्हाला करिअर सुरु करायचे असेल,तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. लिखाण हे प्रत्येक व्यक्तीला जमतेच असे नाही ,परंतु तुम्हाला content writing शिकायचं असेल , या क्षेत्रांमध्ये पाऊल टाकायचं असेल तर तुम्ही या ब्लॉग चे वाचन करणे गरजेचे आहे. परंतु  content writer  घरातूनच काम करतात, त्यांचे स्वतःचे वेळापत्रक बनवतात आणि त्यांना जास्त काम नसते किंवा थोडे काम असते.

या गोष्टींचा विचार करून तुम्ही इथे येत असाल तर थोडे थांबा. कारण या दिसणाऱ्या गोष्टींबरोबर खूप साऱ्या न दिसणाऱ्या गोष्टी देखील सोबत असतात. जसे कि त्यांना दिलेले काम वेळेतच पूर्ण करावे लागते. टेकनॉलॉजिकल गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचेच आहे ,नाहीतर फक्त लिखाणाला काहींत अर्थ नसणार आहे.

तसेच तुम्हाला स्वतःच्या development वरती देखील तितकाच वेळ देणे गरजेचे आहे,जसे कि तुमचे वाचन,संशोधन या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत,तर What Is Mean by Content Writing in Marathi | Content Writer म्हणजे काय ? या लेखामध्ये तुम्हाला content writer म्हणजे काय?याची माहिती वाचायला मिळेल.

परंतु लोक कन्टेन्ट लिहितात कशासाठी हे देखील तितकेच महत्वाचे आहे ,मग ते ब्लॉग साठी असो किंवा एखाद्या आर्टिकल साठी असो , परंतु तुम्हाला लिहिण्यामध्ये आवड आहे आणि ब्लॉग लिहिण्याचा विचार करताय तर ब्लॉग म्हणजे काय ? हा लेख नक्कीच वाचा.

CONTENT WRITING नक्की कशासाठी ?

Content Writing in marathi
Content Writing in marathi

Content writer in marathi –

कन्टेन्ट चा अर्थ काय तर मजकूर म्हणजेच एका ठराविक पद्धतीचे लिखाण.

जेव्हा लोक content writer हा शब्द ऐकतात तेव्हा ते असा विचार करतात कि एखाद्या Article वगैरे चे लिखाण करणे. 

परंतु कन्टेन्ट लिहिणे म्हणजे फक्त तुमच्या Article साठीच लिखाण करणे असे नसते,किंवा तुमच्या ब्लॉग साठी पोस्ट लिहिणे असेही नसते , तथापी content writer हे सर्व स्थरावरील विशेषतः डिजिटल क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण असते. 

मग ते वेगवेगळ्या स्थरावरती असू शकते. 

१. विडिओ साठीची स्क्रिप्ट 

२. ई-मेल साठी Newsletter

३. social media post 

४. YouTube video description 

५. landing page 

६. web page copy 

७. podcast Title  

 शेवटी लिखाण हे डिजिटल फील्ड मधील पाया  मानले जाते. 

Content Writer म्हणजे काय? content writing meaning in marathi

content writer हे असे एक क्षेत्र आहे ज्याचा उपयोग डिजिटल क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाचा आहे 

content writer चे काम प्रामुख्याने डिजिटल क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाचे झाले आहे. 

त्यांचे काम बेसिकली फ्रेश आणि युनिक कन्टेन्ट ठराविक purpose साठी तयार करणे हे असते ज्याच्या मुळे बरेचसे ट्राफिक हे वेबसाइट आणि ब्लॉग कडे येईल आणि त्यामधून लोकांना सेल्स आणि लीड generate होतील. हा त्यांचा मुख्य हेतू असतो. एख्याद्या व्यवसायाबद्दल लोकांमध्ये जास्तीस्त जास्त माहिती आपल्या लिखाणामधून पोहचवणे हे देखील काम त्यांचे असते. 

Content Writing मध्ये दोन प्रकार येतात | कन्टेन्ट रायटिंग म्हणजे काय? | Content Writing In Marathi

१. Basic / Fundamental Qualities – 

२. Technical Qualities – 

१. Basic / Fundamental Qualities – 

१. संशोधन कौशल्य –

जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचे लिखाण करता तेव्हा त्यासाठी त्या गोष्टींमधले ज्ञान असणे आवश्यक आहे,चांगले संशोधन हे चांगल्या कन्टेन्ट लिहिण्याचा पाया  मानले जाते. यामुळे विश्वासार्हता आणि मुख्य म्हणजे मूल्य जोडले जाते. तुमचे संशोधन जेवढे जास्त स्ट्रॉंग असेल तेवढे जास्त तुमचे लिखाण चांगले होते . आणि एकदा लोकांचा तुमच्या लिखाणावरती विश्वास निर्माण झाला कि ते पुढे तुमचेच लिखाण वाचणे देखील प्रेफर करतात. असे म्हंटले जाते कि  संयम आणि उत्कृष्ट संशोधन आणि विश्लेषक कौशल्ये [analytical skills] असतील तर आपण यशस्वी content writer होण्याची शक्यता जास्त आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन इथे करावे लागते जसे कि कीवर्ड रिसर्च, विषयाचे संशोधन, निष संशोधन आणि अजून बऱ्याच विषयांचे संशोधन देखील , आणि विशेष गोष्ट अशी कि इंटरनेट वरती संशोधन करणे हि काही सोपी गोष्ट नाहीये त्यासाठी खूप जास्त संयम ठेवून तुम्हाला काम करावे लागते. 

२.वाचन कौश्यल्य – 

content writer कडे लिखाणाचे कौशल्य असू शकते परंतु त्याचा ज्ञानाचा साठा मोठा असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. 

नियमित वाचन कन्टेन्ट लिखाण करणाऱ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे,

नियमित वाचन केल्याने शब्दसंग्रह सुधारण्यास मदत होते ,लेखनाचा स्वर समजण्यास सर्जनशील आणि प्रभावीपणे आपले विचार व्यक्त करण्यास वाचन खूप जास्त मदत करते. एक व्यावसायिक कन्टेन्ट लिखाण करणाऱ्यास तर नियमित पणे वाचन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. लिखाणासोबत वाचनासाठी देखील तितकाच वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे.  

३. लिखाण कौश्यल –

आता तुम्हाला वाटेल कि कन्टेन्ट लिखाण करणाऱ्याला लिखाण कौश्यल्याची काय गरज आहे?

परंतु वरील दोनही मुद्दे तुमच्या लिखाणामध्ये उतरत असतात.  कारण संशोधन नसेल आणि तुमचे वाचन चांगले नसेल तर तुमचे कन्टेन्ट हे उत्तम होऊच शकत नाही. 

मार्केट मध्ये लाखो कन्टेन्ट लिखाण करणाऱ्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतील परंतु त्या सगळ्या मध्ये आपण वेगळे कसे ठरू याचा विचार करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. उत्तम लिखाण करण्यासाठी शब्दभांडार मोठे असणे , भाषेवरती तुमची पकड असणे ,तुमच्या लिखाणाची वाक्यरचना सोपी असणे आणि तुमचे लिखाण हे वाचणाऱ्याला आपलेसे करणारे असावे . हा एक चांगल्या लिखाणाचा वास्तविक आधार आहे. 

आणि या गोष्टींची उणीव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला यावरती काम करणे अत्यावश्यक आहे. 

२. Technical Qualities – 

१. SEO चे उत्तम ज्ञान –

असे म्हंटले जाते कि उत्तम कन्टेन्ट लेखक हा गूगल च्या search result वरती नेहमी वरती दिसत असतो. 

डिजिटल मार्केटिंग मध्ये कन्टेन्ट लिखाण करणाऱ्या लोकांची काही कमी नाहीये परंतु तुम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे काम करता याला नक्कीच महत्व आहे. 

जर तुम्ही १०० आर्टिकल जरी तुमच्या ब्लॉग वरती पोस्ट केलेत तरी त्याला काही अर्थ नसणार कारण जर तुम्ही तिथे सीईओ चा तिथे उपयोगच केला नाही तर. 

जर तुम्ही कन्टेन्ट लिखाण करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सीईओ चे ज्ञान असणे गरजेचेच आहे, मग तिथे तुम्ही सीईओ फ्रेंडली headline , योग्य discription आणि कीवर्ड चा उत्तम प्रकारे उपयोग करायला शिकलात तरच तुम्ही उत्तम कन्टेन्ट writer बनू शकता. 

2. एडिटिंग चे ज्ञान –

केलेल्या लिखाणामध्ये तुम्ही जितकी सुधारणा करण्याचा प्रयन्त कराल तितकेच तुमचे लिखाण अजून उत्तम होत जाईल यामध्ये शंका नाही. 

तुमच्या लिखाणामध्ये तुम्हाला तुमच्याच त्रुटी शोधण्यास वेळ लागू शकतो परंतु जितके Effects तुम्ही तुमच्या त्रुटी शोधण्यावर लावाल तितकेच तुमचे कन्टेन्ट उत्तम बनेल. परंतु लक्षात ठेवा जितके  Efforts तुम्ही तुमच्या लिखाणावर घ्याल तितकेच ते effective होत जाईल. सतत काहीतरी तयार करण्यापेक्षा ,त्रुटीमुक्त high quality चे कन्टेन्ट लिखाण करणे कधीही चांगले. 

3. Organize skill –

जेव्हा तुम्ही कन्टेन्ट writer म्हणून तुमचे profession निवडता तेव्हा दिलेले काम तुम्ही वेळेत पूर्ण करणे हि तुमची जबाबदारी असते. 

दिलेल्या  गोष्टी जर तुम्ही वेळेत पूर्ण करू शकला नाही तर तुमच्या करिअर च्या दृष्टीने तो अत्यंत चुकीचा संदेश तुमच्या कस्टमर कडे जातो. 

organize स्किल कडे तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही तुमचा client गमवण्याच्या कदाचित जवळ असाल . Organize skill साठी planning, scheduling, वेगवेगळ्या strategy वापरणे गरजेचे ठरते. आणि एका कन्टेन्ट writer कडे Organize skill असणे गरजेचे आहे. 

3. कोणासाठी लिहिताय हे महत्वाचे | कन्टेन्ट रायटिंग म्हणजे काय? Content Writing In Marathi

तुमचे वाचक हे तुमच्या लिखाणाची शैली ,शब्दांची निवड ,आणि तुमच्या कन्टेन्ट चे फॉरमॅट याकडे लक्ष देऊन वाचन करत असतात म्हणून आपण कोणासाठी लिहीत आहोत हे समजून घेणे आपली जबादारी ठरते. content writing meaning in marathi याची सगळी माहिती तुम्हाला या लेखामध्ये वाचायला मिळेल.

कन्टेन्ट रायटिंग मध्ये देखील बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो जसे कि digital content writer, social media content writer इत्यादी. कन्टेन्ट रायटिंग हे असे क्षेत्र आहे जे तुम्ही freelancing म्हणून देखील करू शकता. [freelancing marathi content writer].

तुम्ही जर तुमच्या ब्लॉग साठी लिखाण करत असाल तर त्यासाठी तुमचे निष क्लिअर असणे गरजेचे असते. तुमच्या वाचकांना कश्या प्रकारचे लेखन आवडते त्यावरती तुमच्या लिखाणाची पद्धत ठरवावी. परंतु marathi content writer चे महत्व वाढत आहे . वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी देखील मिळत आहेत.

किंवा जर तुम्ही Freelancing लिखाण करत असाल तर ठराविक वेबसाईट किंवा ब्लॉग साठी तुम्हाला त्यांच्या मार्केटिंग टीम सोबत सल्ला मसलत करून त्यांची टार्गेट ऑडियन्स नक्की कोणती आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. 

१. Tone आणि Style –

बरेचसे कन्टेन्ट हे असफल झालेले दिसते कारण त्यांच्या लिखाणाची tone  आणि style ही व्यवस्थित नसल्यामुळे . 

जेव्हा तुम्ही कोणत्याही लँडिंग पेज वरती जात तेव्हा त्यावरील माहिती वाचून तुम्हाला त्यांचे प्रॉडक्ट घ्यावेसे वाटले पाहिजे. परंतु बरेचदा लिखाणाची tone व्यवस्थित नसल्यामुळे लोक लँडिंग पागे वरती जाऊन पुन्हा माघारी येतात. असेच ब्लॉग संदर्भात देखील सांगता येईल तुमचा ब्लॉग चे वाचन करून वाचन करणाऱ्या व्यक्तीला खरंच माहिती मिळाली पाहिजे. आणि त्याने तुमच्या पुढच्या ब्लॉग ची वाट पहिली पाहिजे तरच तुमच्या लिखाणामध्ये काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहे असे म्हणावे लागेल. 

2.वेगळेपण –

तुमचे लिखाण हे इतरांपेक्षा नेहमी वेगळे असायला हवे. तुम्ही जर इतरांचेच ब्लॉग कॉपी पेस्ट करणार असाल तर आत्ताच थांबा कारण तुमचे करिअर फार काळ नाही टिकू शकत. तुमच्या client ला तुमच्याकडून  काहीतरी valuable माहिती मिळू द्यात , तुमच्या कामामध्ये त्यांना वेगळेपण दिसले कि पुढे तुमचे त्यांच्यासोबत काम करण्याचे चान्सेस वाढण्याची श्यक्यता नेहमीच जास्त असते. 

3.Format – 

कन्टेन्ट writer ला आपले लिखाण एका ठराविक फॉरमॅट मध्ये लिहिणे आवश्यक आहे ,ज्याच्या मुले वाचन करण्याऱ्या व्यक्तीस ते लवकर समजते. लिखाण करताना काही बेसिक गोष्टींची माहिती असणे गरजेचे असते. 

१. लहान 3-4 ओळींमध्ये परिच्छेद लिहा

२. बुलेट किंवा नंबर्स चा उपयोग केला तर तुमचे कन्टेन्ट जास्त आकर्षित दिसते. 

३. तुमच्या आर्टिकल संबंधित इमेज ,ग्राफिक,चार्ट्स वापर. 

४. तुमचे लिखाण जे जास्तीत जास्त सुटसुटीत असू द्यात. 

निष्कर्ष –

तुम्ही जर content writing करण्याचा विचार करत असाल आणि जुन्याच पद्धतीने जात असाल तर आताच थांबा कारण तुमचे करिअर धोक्यात आहे असं समजा कारण ते गूगल च्या सर्च इंजिन वरती कुठेही दिसणार नाही .आणि त्यामुळे तुम्ही जी मेहनत करत आहात त्यालाही काही अर्थ नसेल. सद्या डिजिटल फील्ड मध्ये एवढी जास्त स्पर्धा झाली आहे कि तुम्हाला नवीन मार्गांचा उपयोग करून तुमचे करिअर सुरु करावेच लागणार आहे. तुम्हाला Content Writing in marathi आर्टिकल वाचून नक्कीच मदत होईल आणि content writer म्हणून तुम्ही तुमचे करिअर सुरु करत असाल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल . परंतु लोक कन्टेन्ट लिहितात कशासाठी हे देखील तितकेच महत्वाचे आहे ,मग ते ब्लॉग साठी असो किंवा एखाद्या आर्टिकल साठी असो , परंतु तुम्हाला लिहिण्यामध्ये आवड आहे आणि ब्लॉग लिहिण्याचा विचार करताय तर ब्लॉग म्हणजे काय ? हा लेख नक्कीच वाचा.

11 thoughts on “कन्टेन्ट रायटिंग म्हणजे काय? । Content Writing in marathi [Update 2023]”

    1. SEO बद्दल आणखी थोडं मार्गदर्शन केलं तर नवोदित लेखकांना फार मदत होईल..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!