ब्लॉगिंग टूल्स म्हणजे नक्की काय हा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे, सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर टूल्स तुमचे काम जास्त सोपे करतात. योग्य Tools द्वारे तुम्ही उत्तम प्रकारे ब्लॉगिंग करू शकता जर तुमचे लिखाण उत्तम असेल तर तुम्ही Search Engine वरती खूप लवकर रँक करू शकता, आणि तुमचा वाचक वर्ग वाढवू शकता,आणि कमी वेळामध्ये तुम्हाला जर का हि गोष्ट पूर्ण करायची असेल तर त्यासाठी टूल्स असणे खूप गरजेचे आहे.
आणि या लेखामध्ये तुम्हाला अश्याच काही Tools संदर्भात माहिती देणार आहे ज्याचा उपयोग तुम्हाला ब्लॉगिंग करताना होईल.
१. Canva ब्लॉगिंग टूल्स –
हे एक असे ब्लॉगिंग टूल्स आहे कि ज्याचा उपयोग करून तुम्ही images तयार करू शकता. वापरण्यास अत्यंत सोपे आहे. आणि फ्री मध्ये देखील तुम्ही त्याचे बरेच features वापरू शकता. ब्लॉग मध्ये किंवा वेबसाईट मध्ये कन्टेन्ट इतकेच महत्व हे images ला देखील असते. त्यामुळे तुमच्या images जितक्या उत्तम असतील तितके चांगले. त्यामुळे तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग उत्तम दिसेल आणि त्याची visibility देखील वाढेल.
याचे एक अत्यंत चांगले feature म्हणजे ते तुम्हाला उत्तम असे templates देते. ज्याचा उपयोग करून तुम्ही उत्तम काम करू शकता. Canva मध्ये images तयार करण्या व्यतिरिक्त तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता, जसे कि video, तुम्ही तयार केलेल्या images direct तुमच्या social media वरती scheduling करू शकता.
तुमची image वेगवेगळ्या प्रकारामध्ये download करू शकता. जसे कि PNG, JPG, PDF, GIF आणि अजून बऱ्याच काही.
२. Grammarly–
canva नंतर दुसरे महत्वाचे असे प्लॅटफॉर्म म्हणजे Grammarly ,अत्यंत उपयोगी असे हे tool आहे आणि वापरायला देखील खूप सोपे आहे. आणि विशेष म्हणजे फ्री आहे. कधी कधी लिखाण करताना आपल्या नकळत काही grammatical mistakes होत असतात.
आणि आपण तेच कन्टेन्ट आपल्या ब्लॉग मध्ये लिहितो, त्यामुळे काही issue येण्याचे chances असतात. अश्या वेळी Grammarly तुम्हाला खूप मदत करून जाते.
हे तुम्हाला तुमच्या लेखांमध्ये योग्य व्याकरण आणि शब्दलेखन सुनिश्चित करण्यात मदत करते!
हे ब्लॉगिंग साठी अत्यंत महत्वाचे असे प्लॅटफॉर्म आहेत. त्याच्या साहाय्याने तुम्ही grammatical mistakes काढू शकता. तुमच्या लिखाणामध्ये बरेच सुधार आणू शकता. Grammarly ची प्रीमियम आवृत्ती केवळ तुमचे शब्दलेखन, व्याकरण आणि विरामचिन्हे तपासणार नाही, तर ते शब्दसंग्रह सुधारण्याची शिफारस देखील करेल.
तुम्ही Grammarly google क्रोम ब्राउझर एक्सटेंशन मध्ये देखील इन्स्टॉल करू शकता. आणि त्याद्वारे तुम्ही Google Docs, Twitter, LinkedIn, आणि इतर Side मध्ये देखील काम करू शकता.
३. Yoast SEO –
SEO म्हणजे काय हे आपण मागील ब्लॉग मध्ये पहिले आहेच. तुमच्या वेबसाईट साठी असो किंवा ब्लॉगिंग साठी SEO खूप महत्वाचा आहे. Yoast SEO हे एक सर्वोत्तम ब्लॉगिंग साधनांपैकी एक आहे,
ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंग मध्ये काय चुका झाल्या आहे आणि त्या Recurrent कश्या करायच्या याबाबत माहिती देत असते.
मला Yoast SEO बद्दल जे आवडते ते म्हणजे त्याचा अत्यंत साधेपणा. तुम्ही एखादे पृष्ठ तयार केल्यानंतर किंवा पोस्ट लिहिल्यानंतर तुम्हाला फक्त त्यांच्या सूचनांचे पालन करायचे आहे आणि तुम्ही प्रत्येक पृष्ठावर मूलभूत SEO सुनिश्चित करायचा आहे.
Yoast SEO चा वापर कसा करायचा –
सर्वात प्रथम तुम्हाला हे टूल इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचा ब्लॉग वगैरे लिहू शकता आणि पूर्ण झाल्यावर सर्वात खाली स्क्रोल करून तुम्हाला Yoast काही गोष्टी ज्या SEO च्या दृष्टीने योग्य आहे कि अयोग्य हे दाखवेल,
आणि त्या प्रमाणे तुम्हाला बदल करावे लागतील. जो पर्यंत ग्रीन symbol येत नाही तो पर्यंत तुम्हाला बदल करावे लागेल नाहीतर तुम्हाला Red किंवा Orange असेच symbol दिसतील . त्याचा अर्थ तुम्हाला अजून काम करण्याची गरज आहे असा होतो.
४. All in One SEO (AIOSEO) –
ऑल इन वन एसइओ (AIOSEO) हे वर्डप्रेससाठी संपूर्ण एसइओ प्लगइन आहे. तुमच्या ऑन-पेज ऑप्टिमायझेशनचे सखोल विश्लेषण करण्यासाठी तुम्ही हे प्लगइन वापरू शकता. तुमच्या कन्टेन्ट मधील सगळ्या त्रुटी काढू शकते.
जसे कि काही error असेल कीवर्ड ठीक नसतील अश्या गोष्टी तुम्ही त्यामधून काढू शकता.
याद्वारे तुम्हाला तुमचा readability score जाणून घेता येईल आणि तुमचा Title Tag मध्ये काही बदलांबद्दल suggestions देईल त्यामुळे तुमचा क्लिक Rate वाढेल, आणि तसेच तुम्हाला image SEO, schema markup, social media integration, dynamic smart tags for titles and meta descriptions, अश्या बऱ्याच गोष्टींचे बदल देखील सांगेल.
5. Quora –
Quora या प्लॅटफॉर्म चा उपयोग 300 दशलक्ष लोक प्रश्न विचारण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी करतात.
तुम्हाला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते.
हे वापरण्याचे काही फायदे –
१. तुम्हाला ब्लॉग ideas येऊ शकतात.
२. आपल्याला हव्या असलेल्या ऑडियन्स पर्यंत पोहचणे आणि त्यांना समजून घेण्यासाठी या प्लॅटफॉर्म चा उपयोग होतो.
३. ब्लॉगचे प्रोमोशन करण्यासाठी
६. Google Sheet ब्लॉगिंग टूल्स –
Google च्या मोफत सुविधांमध्ये Google Sheet चा समावेश होतो. 2 अब्जाहून अधिक Monthly सक्रिय वापरकर्ते Google Sheet चे आहेत.Google sheets हे एक web-based spreadsheet आहे.
ज्याच्या मध्ये तुम्ही लिहू शकता इतरांसोबत Share करू शकता आणि edit देखील करू शकता.
Google Sheet वापरण्याचे फायदे –
१. वापरण्यास अतिशय सोपे
२. विविध device वरती तुम्ही सहज वापरू शकता. उदा. मोबईल ,टॅब , कॉम्प्युटर इत्यादी.
३. सर्वात महत्वाचे तुम्ही केलेले काम तिथे ऑटो save होत असते.
४. फिल्टर आणि टेबल्स वापरून विविध प्रकल्पांना प्राधान्य देऊ शकता.
५. Checklist म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता.
६. तुम्ही लिहिलेल्या लेखांचे शब्द मोजू शकता.
७.Stock Photo –
तुम्हाला तुमच्या वेबसाईट मध्ये किंवा ब्लॉग मध्ये फोटोस टाकायचे असतील तर तुम्ही डिरेक्टली गूगल फोटो नाही टाकू शकत,कारण कॉपी राईट होण्याचे चान्सेस असतात.
आणि त्यामुळे तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईट ला त्यामुळे हानी पोहचू शकते. तर असे प्रकार होऊ नयेत यासाठी, अश्या काही side आहेत ज्यावरून तुम्ही इमेजेस घेऊ शकता आणि त्यामुळे कोणताही issue देखील होण्याचे चान्सेस नसतात.
Editorial, Commercial आणि Personal गोष्टींसाठी रॉयल्टी फ्री असे हे फोटो तुम्ही वापरू शकता.
उच्च-गुणवत्तेचे आणि स्वस्त फोटो मिळविण्यासाठी स्टॉक प्रतिमा हे एक उत्तम स्त्रोत आहे जे तुम्ही तुमच्या डिझाइनमध्ये विविध हेतूंसाठी वापरू शकता.
Marketing आणि Advertising, Promotional work, Personal, किंवा Commercial creative projects, publishing, websites आणि blogs अश्या बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकता
८. Ubersuggest
ब्लॉगिंग करताना बरेचदा कीवर्ड research हा मुद्दा आपल्या लक्षात येत नाही. परंतु कीवर्ड Research हा ब्लॉगिंग मधील महत्वाचा असा पार्ट आहे.
परंतु फक्त २७ % ब्लॉगर्स हे कीवर्ड Research करताना दिसतात.
keyword Research साठी बरेचसे Tools उपलब्ध आहेत. त्यामधील बरेचसे Paid आहेत आणि काही टूल्स तुम्हाला फ्री मधील देखील सुविधा देतात.
Ubersuggest हे एक चांगले Tool आहे. परंतु फ्री मधील काही लिमिटेडAccessउपलब्ध आहेत.
हे वापरण्याचे काही फायदे –
१. तुम्ही त्याद्वारे Keyword Research करू शकता.
२. त्याद्वारे content ची Idea तुम्हाला येऊ शकते.
३. Keyword Ranking ट्रॅक करू शकता.
४. सीईओ ऑडिट करू शकता.
५. समजण्यास अत्यंत सोपे आहे.
६. तुमच्या competitor चा analysis करू शकता.
निष्कर्ष –
ब्लॉगिंग टूल्स In Marathi या ब्लॉगचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल, मी या लेखामध्ये जे काही टूल्स सांगितलेले आहेत त्यामधील बरेचसे फ्री उपलब्ध आहेत.
त्यामुळे तुम्हाला इथे पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही,तुम्ही ब्लॉगिंग करण्याचा जर विचार करत असाल तर यातील सगळ्याच ब्लॉगिंग टूल्स चा तुम्हाला खूप फायदा होईल.
यामधील सगळ्याच टूल्स चा उपयोग मी माझ्या कामासाठी करत असते. आणि त्यामुळे तुम्हाला देखील याचा फायदा नक्कीच होईल अशी खात्री आहे.
तुमचे मत आणि सल्ले माझ्यासाठी महत्वाचे आहे ,ते तुम्ही कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मेल देखील करू शकता.
digitalharshu@gmail.com
I am thinking to start a blogging, and this blog will surely help me . Thank you for information.
Thank You.