फेसबुक पोस्ट Ideas फॉर Business म्हणजेच जर तुमचा Business असेल आणि फेसबुक इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स चा उपयोग तुम्ही तुमचा business वाढविण्यासाठी करताय तर मग या लेखाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संदर्भात आपण बोलणार आहोत. तुम्हाला माहित का तुम्ही तुमच्या फेसबुक पेज वरती ज्या प्रकारची ऍक्टिव्हिटी करत असतात तश्या प्रकारची ऑडियन्स तुमच्या पेज ला follow करत असते. आणि business च्या दृष्टीने बघायला गेलं तर तुम्ही कश्या प्रकारच्या पोस्ट टाकायला हव्यात कधी टाकायला हव्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करणे फार गरजेचे असते.
७ महत्वाच्या फेसबुक पोस्ट Ideas फॉर Business –
१. ऑफर आणि नवीन प्रॉडक्ट्स संदर्भातील पोस्ट –
तुमच्या फेसबुक वरील लोकांना तुम्ही कोणत्या प्रॉडक्ट ला नवीन ऑफर असेल किंवा तुम्ही ऑफर देणार असा तर अश्या प्रकारच्या पोस्ट तयार करून माहिती देऊ शकता.
तुमच्या प्रॉडक्ट संदर्भात विविध प्रकारची माहिती पोस्ट च्या स्वरूपामधून तुम्ही देऊ शकता.
या एका सिम्पल स्ट्रॅटेजि मुळे तुमच्या सेल मध्ये बराच पॉसिटीव्ह चांगले बघायला मिळेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच Facebook पोस्टमध्ये खूप तपशील देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा प्रत्येक पोस्टच्या एका पैलूवर लक्ष केंद्रित करा.तुमचे Facebook प्रेक्षक तुमच्या ईमेल प्रेक्षक किंवा तुमच्या Twitter प्रेक्षकांपेक्षा थोडे वेगळे दिसू शकतात, त्यामुळे प्रत्येकाला त्यांचा अनुभव घेण्याची संधी आहे याची खात्री करण्यासाठी तुमच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर डील आणि ऑफर जाहीर करणे फायदेशीर आहे.
प्रत्येक पोस्ट मध्ये तुमच्या कंपनीचा लोगो,डिसाइन , कलर कॉम्बिनेशन या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा. आणि पोस्ट तयार करा. कारण रंग लोगो शेप्स या गोष्टी मुळे लोकांना तुमची कंपनी देखील लक्षात राहते.
२. Sharing behind-the-scenes (BTS) –
म्हणजे काय हे मी काही सांगायला नको कारण सगळ्यांना ते माहित असेलच. कोणत्याही गोष्टीच्या मागेही एक गोष्ट असते. आणि बऱ्याच लोकांना ती मागची गोष्टच खूप आवडत असते.
तुमच्या कंपनीच्या मागेही काय काय बॅकेन्ड गोष्टी चालतात. हे तुम्ही लोकांना दाखवू शकता. आणि लोकांचा विश्वास मिळायला यामधूनच खूप मदत होते. फेसबुक ऑडियन्स ला कश्या प्रकारे अजून इंटरॅक्ट करता येईल याचा विचार करून तुम्ही तश्या प्रकारचे कन्टेन्ट तयार करा.
तुम्ही तुमचे प्रॉडक्ट तयार होतानाचे विडिओ ,फोटो, पॅकिंग करतानाचे विडिओ,काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्या प्रकारचे कन्टेन्ट असे तयार करून तुमच्या फेसबुक ऑडियन्स पर्यंत पोहचवू शकता.
किंमत
गुणवत्ता
टिकाऊपणा
शक्यता
अद्वितीय फायदे
या सगळ्या गोष्टी त्या पोस्ट मध्ये तुम्ही समाविष्ट करायला हव्यात.
३. स्टोरी आणि कन्टेन्ट share करा-
हा एक अत्यंत प्रभावी असा प्रयन्त आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण तुमच्या स्टोरी ला कधीही जास्त reach मिळत असते तुमच्या पोस्ट पेक्ष्या त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्टोरी share करणे गरजेचे आहे.
स्टोरी चा अजून एक फायदा असा कि फक्त तुम्ही तुमच्या business related स्टोरी टाकायच्या असतात असे काही नाही तुम्हाला योग्य वाटणाऱ्या किंवा तुमच्या कामाच्या संदर्भातील स्टोरी तुम्ही टाकू शकता.
तुमच्या वेगवेगळ्या सोशल मीडियाचे कन्टेन्ट फेसबुक वरती share करा, यामध्ये काहीही चुकीचे नाहीये. तुमच्या प्रत्येक सोशल मीडिया वरची ऑडियन्स वेगळी असते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या इंस्टग्राम ट्विटर किंवा linkedin या प्लॅटफॉर्म्स वरचे कन्टेन्ट फेसबुक वरती share करायला काहीच हरकत नाही.
४. ब्लॉग | फेसबुक पोस्ट Ideas –
तुमचे ब्लॉग्स कन्टेन्ट तुम्ही तुमच्या फेसबुक पेज वरती share करू शकता. त्यामळे अर्थात तुमच्या fb पेज चे ट्रॅफिक वेबसाइट वरती जाण्याचे देखील चान्सेस असतात.
ब्लॉग म्हणजे नक्की काय असते, ते कसे तयार केले जातात,कोणत्या विषयावरती तुम्ही लिखाण करू शकता याची माहिती तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय या लेखामध्ये मिळेल.
ब्लॉग इतकेच महत्व विडिओ कन्टेन्ट ला देखील आहे , जर सरासरी rate पहिला तर 0.26%, इतकी एंगेजमेंट विडिओ कन्टेन्ट ला मिळते. त्यामुळे या गोष्टींचा फायदा गया आणि विडिओ कन्टेन्ट तयार करा. हॅशटॅग वापरण्याप्रमाणे, ट्रेंडिंग विषयांबद्दल पोस्ट केल्याने तुम्हाला लोक आधीच करत असलेल्या संभाषणांमध्ये सहभागी होतात.
५. ग्राहकांच्या आवडी विचारात घेऊन पोस्ट तयार करा-
प्रत्येक वेळी जर फक्त तुमच्याच कंपनीचे गुणगान गात बसलात तर काही फायदा होणार नाही तुम्हाला इतर चांगल्या प्रॉडक्ट बद्दल देखील तुमच्या ग्राहकांना सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या पोस्ट मध्ये fakeness देखील वाटणार नाही आणि लोक देखील विश्वास ठेवतील.
तुमचे Facebook प्रेक्षक तुम्हाला प्लॅटफॉर्मवर फॉलो करत आहेत कारण तुम्हाला काय म्हणायचे आहे याची त्यांना काळजी आहे. हे लक्षात घेता, हे गृहीत धरणे सुरक्षित आहे की ते आपल्या उद्योगाशी संबंधित बातम्यांची देखील काळजी घेतात, म्हणून आपल्या Facebook पृष्ठावर या प्रकारची सामग्री पोस्ट करण्याचा विचार करा.
६. ग्राहकांकडून ideas जाणून घ्या-
तुम्हाला या गोष्टीचे नवल वाटेल परंतु तुम्ही लोकांना अश्या प्रकारचे प्रश्न विचारू शकता आणि लोकांचा देखील अश्या प्रश्नांना खूप चांगला रिस्पॉन्स येतो हे देखील तितकेच खरे आहे, कारण त्यांच्या मतांना तुम्ही विचारात घेता, आणि दुसरे तुम्हाला तुमच्या पुढच्या कन्टेन्ट ची देखील ideas येऊन जाते.
ग्राहक तुमच्या प्रॉडक्ट वरती किती विश्वास ठेवतो हे खूप महत्वाचे आहे, म्हणून ग्राहकांचा विचार आणि त्यांना का वाटते हे देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण ब्रँड कर्मचाऱ्यांपेक्षा ग्राहकाला त्या प्रॉडक्ट बद्दल काय वाटते हे खूप महत्वाचे आहे.
७. उत्तम ग्राफिक्स तयार करा-
तुमच्या facebook page वरती तुम्ही ज्या काही ग्राफिक्स टाकाल त्या चांगल्या प्रतीच्या असायला हव्यात. कारण तुमचे ग्राफिक्स तुमच्या business ची रूपरेषा ठरवत असतात. ते जितके चांगले असतील तितके उत्तम .
८. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग | फेसबुक पोस्ट Ideas –
८०% मार्केटरचे असे म्हणणे आहे कि influencer Marketing खूप महत्वाचे आणि आज खूप effective पद्धतीने वापरली जाणारी strategy आहे. कारण ४९% लोक influencer द्वारे सांगितलेले प्रॉडक्ट्स घेतात त्यावरती विश्वास ठेवतात.