Why E-mail Marketing Is Important | ई-मेल मार्केटिंगचे महत्व

Why E-mail Marketing Is Important | ई-मेल मार्केटिंगचे महत्व |

ई-मेल हा शब्द आता तरी आपल्याला नवीन नाहीये. कारण तो आपल्या रोजच्या जीवनाचाच भाग झाला आहे असे म्हणावे लागेल.आपण कुठे जरी गेलो तरी ई-मेल Address आपल्याकडून मागितलाच जातो .मग ते कोणता फॉर्म भरायचा असेल. Resume पाठवायचा असेल कशाबद्दल माहिती मिळवायची असेल .किंवा एखाद्या गोष्टीशी तुम्हाला कनेक्ट राहायचं असेल, प्रत्येक ठिकाणी ई-मेल हा विचारला जातो. आणि तुम्ही जर डिजिटल किंवा इंटरनेट,IT अश्या ठिकाणी काम करत असाल तर ई-मेल चे महत्व अजूनच  वाढते , ते कसे काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर Why E-mail Marketing Is Important | ई-मेल मार्केटिंगचे महत्व ब्लॉग मध्ये तुम्हाला याच प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील. 

उदाहरणार्थ – जेव्हा एखाद्या शॉपिंग वेबसाईट वरून आपण शॉपिंग करतो त्यानंतर तुम्हाला अगदी रोज ई-मेल यायला सुरुवात झाली असेल, कधी निरीक्षण केलं आहे या गोष्टींचं ,नसेल तर नक्की करा . 

ई-मेल मार्केटिंगचे महत्व ।
Email Marketing

इतिहास –

तर मग कोणी शोधले असेल या प्रकारचे तंत्रज्ञान ,कधी शोध लागला असेल या गोष्टींचा असे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येणे सहाजिक आहेत,चला तर मग बघुयात.

Raymond Samuel Tomlinson हे आंतराष्ट्रीय ख्यातीचे अमेरिकन कॉम्पुटर प्रोग्रामर आहेत. ज्यांना ई-मेल चे शोधकर्ता असे म्हटले जाते.हा शोध त्यांनी १९७१ मध्ये लावला . Raymond यांनी पहिला ई-मेल प्रोग्रॅम ARPANET वरती इम्प्लिमेंट केला होता.

Raymond Samuel Tomlinson
Image Source – Wikipedia

ARPANET म्हणजे  Advance Research Project Agency Network जे ARPA {Advance Research Project Agency} ने स्थापित केले आहे जे कि युनाइटेड स्टेट ऑफ डिफेन्सच्या अंडर येते. 

ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय | ई-मेल मार्केटिंगचे महत्व ?

कोणत्याही व्यवसायासाठी ई-मेल मार्केटिंग हे महत्वाचे ठरते तसेच ई-मेल मार्केटिंग हे वेगवान, स्वस्त, आणि सहज पद्धतीने रिप्लाय करण्यायोग्य आहे. 

ई-मेल मार्केटिंग खरंच तितकेसे महत्वाचे आहे का ? किंवा Why E-mail Marketing Is Important | ई-मेल मार्केटिंगचे महत्व याचे बऱ्याच लोकांकडून उत्तर हे आपल्याला तितकेसे होकारार्थी मिळणार नाही.

परंतु जगाचा विचार केला तर ३४%लोक हे ई-मेल चा वापर करतात. म्हणजे २.५ Billion लोक आणि पुढच्या येणाऱ्या वर्षात हे २.८% Billion लोक ई-मेल User होणार आहे. असे बोलले जाते. दर दिवशी १९६ Billionइमेल्स हे business ई-मेल असतात. 

How many people use email
Image Source – Pixabay

लोकांशी कनेक्ट होण्याचे ई-मेल मार्केटिंग हे एक पॉवरफुल माध्यम आहे. आणि सध्या तर ई-मेल मार्केटिंग हा आपल्या जीवनाचा खूप मोठा भाग झाला आहे. 

ई-मेल मार्केटिंग या शब्दामधेच आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येईल. आपल्या व्यवसायासंदर्भात ग्राहकांना ई-मेल द्वारे माहिती दिली जाते. थोडक्यात आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग केले जाते.


विशेषतः ई-मेल मार्केटिंग चे काम हे ग्राहकांचा ग्रुप तयार करून मग ई-मेल पाठवले जातात. ज्याच्यामुळे वेळ,पैसे या दोनीही गोष्टी वाचतात.
मोठ्या मोठ्या व्यवसायांमध्ये ई-मेल मार्केटिंग अत्यंत महत्वाचे मानले जाते.

डिजिटल मार्केटिंग मध्ये ई-मेल मार्केटिंग महत्वाचे आहे का ? तर याचे उत्तर हो आहे. 

एक छोटी ई-मेल मार्केटिंग स्ट्रॅटिजि तुम्हाला तुमच्या टार्गेट ऑडीयन्स पर्यंत पोहचवू शकते.आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाला बराच फायदा देखील होऊ शकतो. 

ई-मेल मार्केटिंगचे प्रकार –

1. Newsletter Email

2. Special Offer Email

3. Milestone Email

4. Review Request Email

5. Welcome Email

6. Curated Contend Email

7. New Product Announcement Email

8. Progress Email

9. Confirmation Email

आणि अजून असे बरेच ई-मेल चे प्रकार येतात , आपण त्या प्रत्येक प्रकारची माहित येणाऱ्या ब्लॉग मध्ये पाहूच. 

ई-मेल मार्केटिंगचे फायदे | ई-मेल मार्केटिंगचे महत्व –

1. ई-मेल हे मार्केटिंगचे जुने माध्यम – 

ई-मेल हा मार्केटिंग चा खूप जुना प्रकार मनाला जातो. म्हणजेच लोक जवळ जवळ ४० वर्षांहुन अधिक काळ ई-मेल चा वापर करतात.

पुढे काही वर्षांनी ई-मेल हे कॉम्म्युनिकेशन चे माध्यम बनले. मग त्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटिजि वापरल्या गेल्या , जश्या कि To reply ,To Forward ,Delete, buy, sign  Up  अश्या प्रकारच्या शब्दांचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या ग्राहकांना website कडे वळवू शकता. बऱ्याच ठिकाणी call to action देऊ शकता. कारण या स्ट्रॅटेजि खूप फायद्याच्या ठरतात.

2. ई-मेल मार्केटिंग मोजण्यास सोपे-

बरेच ई-मेल मार्केटिंग टूल्स द्वारे आपण ट्रॅक करू शकतो की आपले campaign कश्या प्रकारे चालले आहे. जसे की send केलेले मेल्स ,Delivery Rates , Bounce Rate , Unscribe Rate ,Open  Rate , अश्या प्रकारच्या ट्रॅकिंग मुळे आपल्याला आयडिया येते कि आपले ई-मेल मार्केटिंग Campaign कश्या प्रकारे चालले आहे. 

आणि हो ,या ट्रॅकिंग मधून जो Result आपल्याकडे येतो त्यावरून आपण आपल्या स्ट्रॅटिजि मध्ये बदल करू शकतो ,किंवा अजून चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटिजि कश्या होतील यावरती काम करू शकतो. 

3. स्वस्तामध्ये मस्त- 

ई-मेल मार्केटिंग चा फायदा असा आहे कि कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचू शकता. 

ई-मेल मार्केटिंग च्या वेगवेगळ्या services च्या ऑफर्स वेगवेगळ्या असतात. 

जसे कि Send Grid  ची कॉस्ट ०.०००६ डॉलर प्रति message त्यांच्या प्लॅटिनम प्लॅन साठी आहे. mailchimp द्वारे तुम्ही २००० कॉन्टॅक्ट ला फ्री message पाठवू शकता. 

बऱ्याच मोठ्या कंपन्या ई-मेल मार्केटिंग campaign चालवण्यासाठी Agency कडे देतात , हे काहीसे वेगळे वाटेल परंतु Shout It Out ने काढलेल्या अंदाजानुसार तुमची कंपनी १५०० ई-मेल चा डेटा बेस तयार करण्यासाठी १५२ तास हे प्रत्येक वर्षाचे खर्च करत असते , मग त्यामध्ये ई-मेल तयार करणे त्याचे drafting .scheduling इमेल्स send करणे या सगळ्या गोष्टी येतात.

इतकेच नाही तर डेटाबेसे Maintaining , Adding , Deleting Members ,Updating Information आणि अजून बऱ्याच गोष्टी येतात. 

4. तुम्ही तुमच्या ऑडियन्स सोबत कनेक्ट राहू शकता –

ई-मेल मार्केटिंग चा सगळ्यात मोठा फायदा असा आहे कि ई-मेल द्वारे तुम्ही तुमच्या ग्राहकांची माहिती ठेवू शकता आपण त्यांच्याबद्दल विचार करत आहोत हि भावना आपण त्यांना देऊ शकता. ई-मेल द्वारे तुम्ही  त्यांना update बद्दल किंवा झालेल्या बदलांबद्दल माहिती देऊ शकता आणि त्याचा फायदा असा होईल कि तुमच्या व्यवसायाला त्यामुळे चालना मिळेल.

5. ब्रँड लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी –   –  

इंटरनेट मार्केटिंग मध्ये फक्त Social Media हे असे माध्यम नाहीये कि तुम्ही तिथे तुमचे ब्रँड Awareness वाढवू  शकता. 

तर ई-मेल मार्केटिंग हे देखील असे माध्यम आहे . ई-मेल मार्केटिंग चा उपयोग करून तुम्ही तुमच्या ब्रँड ची INTEREST LEVEL वाढवू शकता . ब्रँड बद्दल अवेरनेस वाढवू शकता . 

याचा अर्थ असा नाही कि तुम्ही तुमच्या ग्राहकांना रोज ई-मेल पाठवून irritate कराल. यामुळे लोकांमध्ये तुमच्या ब्रँड बद्दल अवेरनेस नाही तर तिरस्कार निर्माण होईल . बऱ्याच वेळा कंपन्या फक्त सेल्स वरती फोकस करतात आणि त्यामुळे त्यांच्या ब्रँड अवेरनेस कडे दुर्लक्ष होते. परंतु तुमचे योग्य प्रकारचे ई-मेल मार्केटिंग ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि व्यक्तिमहत्वाची भावना निर्माण करण्यासाठी महत्वाचे ठरतात. 

Why E-mail Marketing Is Important | ई-मेल मार्केटिंगचे महत्व ते आपण पहिले परंतु त्यासोबतच ई-मेल मार्केटिंग मध्ये काही टूल्स वापरले जातात ज्याच्यामुळे ई-मेल मार्केटिंग करणे अजून सोपे होते. तर मग असे कोणते टूल्स आहेत ज्याचा उपयोग आपण करू शकतो.

Email marketing tools
Image source- Pixabay

HubSpot Email Marketing

MailGenius

Litmus

Mail Chimp

Reach Mail

Target Hero

Drip

Mad Mimi

Cake Mail

Mailjet

यांसारखे अजून बरेच, परंतु प्रत्येक टूल्स हे एका पेक्षा वेगळे असेल त्यामधील सेटिंग वेगळ्या दिसतील आणि किंमत देखील वेगळी असेल. 

ई-मेल मार्केटिंग करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

१. तुमच्या ई-मेल लिस्ट मधील सगळ्या लोकांना सारखाच ई-मेल फॉरमॅट नसावा . 

२. तुमच्या ई-मेल लिस्ट मधील प्रत्येक व्यक्ती ई-मेल ओपन करेलच असे नाही. 

३. तुम्ही कोणत्या व्यक्तीस कोणता ई-मेल पाठवायला हवा हे समजणे अतिशय गरजेचे आहे. 

४. वरती जे  ई-मेल चे प्रकार सांगितले गेलेले आहेत त्यामधील प्रत्येक प्रकारचा ई-मेल पाठवण्यास त्या प्रकारचे कारण असावे लागते 

जसे कि New Product ई-मेल तुम्ही कधी पाठवायला हवे आणि स्पेशल ऑफर ई-मेल कधी पाठवायला हवे हे आपल्याला समजणे गरजेचे आहे.  

५. तुम्ही पाठवत असणाऱ्या ई-मेल ची quality कशी आहे हे ई-मेल पाठवण्यापूर्वी पाहणे गरजेचे आहे. 

email marketing tips
Image Source – pixabay

असे म्हणले जाते कि ई-मेल हा मार्केटिंग चा जीवलग मित्र आहे. ग्राहकांना ई-मेल हवे असतात मग ते ऑफर्स बद्दल असोत सेल्स बद्दल असोत , परंतु ढीगभर येणाऱ्या इमेल्स मुळे  आपला ग्राहक Irritate होण्याची शक्यता असते. 

तसेच तुमचे कन्टेन्ट जर ई-मेल मध्ये Irrelevant असेल तर असे ई-मेल हे स्पॅम मध्ये जाण्याची शक्यता देखील असते. बरेचदा तुमचे ई-मेल हे Unsubscribe होण्याची शक्यता असते अश्या वेळी तुमच्या कस्टमर साठी काय महत्वाचे आहे.आणि तुमच्या  Business साठी  काय याचा विचार करणे गरजेचे आहे. 

निष्कर्ष –

ई-मेल मार्केटिंग करताना आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये ठेवणे गरजेचे आहे आपले potential customer वेगवेगळ्या स्टेज वरती असू शकतो जसे कि कोणी consideration stage वरती, कोणी Research तर कोणी comparison तर ,काही लोक purchasing च्या, आणि या सगळ्या ग्राहकांना आपण सारख्याच प्रकारचे मेल नाही पाठवूं शकत नाही , प्रत्येक स्टेज वरच्या ग्राहकांसाठी त्या प्रकारचा मेल असायला हवा. आणि ई-मेल मार्केटिंग द्वारे हि गोष्ट करणे सोपे आहे. कारण तुम्ही ठराविक टार्गेट असणाऱ्या ग्राहकांना त्या-त्या प्रकारचे मेल पाठवू शकता.
Why E-mail Marketing Is Important | ई-मेल मार्केटिंगचे महत्व या ब्लॉग मध्ये ई-मेल मार्केटिंग कश्या प्रकारे गरजेची आहे, त्याचे प्रकार त्यासाठी वापरण्यात येणारे टूल्स या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि या ब्लॉग चा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल .

तुम्ही तुमचं मत आणि सल्ले मला नक्कीच खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मला पुढील पत्त्यावर मेल हि करू शकता digitalharshu@gmail.com

8 thoughts on “Why E-mail Marketing Is Important | ई-मेल मार्केटिंगचे महत्व |”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!